Sanjay Dhangawhal

Inspirational

3  

Sanjay Dhangawhal

Inspirational

मांगल्याचा उत्सव दिपाव

मांगल्याचा उत्सव दिपाव

2 mins
198



दिपावलीचा सण

आला आनंदाला उधाण

सडा रांगोळीने सजले

माझे घर आंगण


सण म्हणजे भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे आणि प्रत्येक भारतीय हा सण श्रध्देने,मागंल्याने साजरा करतो 

देवदेवता ते ऋषीमुनींपासून चालतं आलेली ही परंपरा आजतागायत सुरूचं आहे.आजही तेव्हढ्याच श्रद्धेने दिवाळीचा सण साजरा करतो.

दिपावली हे सर्व सणांचं

 मध्यपर्व आहे असं म्हणतात आणि या पाच दिवसात देवलोकातही आनंदाचा सोहळा सुरू असतो.म्हणून आपल्याही घरात आनंद उत्साहाची रेलचेल असते घरात प्रसन्नंता भरूभरून वाहते.नविन कपडे ,फटाके,फराळ करण्याची धावपळ सुरू असते.गमंती जमती हाश्याच्या फुलझडी उसळत असतात. पाव्हणेरावळे,नातवंडांची घरात गर्दी असते.लेकी माहेरी येतात सुना त्यांच्या माहेरी जातात.या काळात देवही आपल्या घरी मुक्कामाला येतात. म्हणून दिवाळीला सणांच मध्यपर्व म्हटलं आहे.


दिवाळीचा सण

सुख सौख्याचे धन

दारावर लागते

 समृद्धीचे तोरण


खर आहे दिवाळीचा सण

सुखसौख्याच धन आहे.आणि हा सण मंगलमय होण्यासाठी दारावर तोरण लावून दिपावलीचे आनंदाने स्वागत करतो. दिपावली येण्याच्या आनंदात घराची साफसफाई होते मनाप्रमाणे घरही स्वच्छ करतो आणि घरावर रोषणाई करून घर कसे लख्ख प्रकाशाने लखलखीत दिसायला लागते त्या दिव्य प्रकाशात प्रकाशमय झालेल घर आणि अंगणात रांगोळी यामुळे घर आणखीन सुदंर दिसते.


अंगाणात माझ्या

 रांगोळी शोभून दिसली

इवलीशी पणती

खुदकन हसली


तसेच या दिवाळीच्या दिवसात पणतींना खुप महत्त्व दिले जाते ,पणती शिवाय दिवाळी साजरा होतचं नाही.या पर्वात पणत्यांच्या उजेडात घराच्या अवतीभवती चौफेर पणत्यांच्या लखलखाट असतो तेजोमय प्रकाशात सुखशांती,मगंल मांग्यलाची प्रखरता आपल्या सहवासात असते.तेंव्हा या छोट्याशा पणतीच्या प्रकाशात लक्ष्मी सोनपावलांनी भरभराटी घेवून घरात प्रवेश करते

म्हणून म्हणतो की


दिवाळीचा सण

पणती उजळली

मांगल्याच्या पावलाने

लक्ष्मी घरात आली


खरचं या चिमुकल्या पणतीच किती महत्त्व आहे.एक पणती म्हणजे

लखलखणारी चंदेरी दिपावली अस म्हटले तरी ते योग्यचं आहे.तिच्या त्या मिणमिणत्या प्रकाशात आपलं आयुष्यात आपसूकच परिवर्तन व्हायला लागते जणूकाही नव्या पर्वात नव्या दिवसाला सुरवात होते.एका पणतीचा उजेड चैतन्य निर्माण करतो तथा त्या पणतीमुळे नवि दिशा, नवी उमेद,नवा उत्साह, मिळत असतो.तसेच रांगोळी म्हणजे वास्तुदेवतेच्या कपाळावर लावलेला गंध वेगवेगळ्या रंगसंगतीने रांगोळी काडून अगंणाची सजावट केली जाते त्यामुळे अंगणात एक वेगळेपण येत असतो.शिवाय त्या रांगोळीच्या मध्यभागी पणती ठेवून रांगोळी आणखीनच सुंदर दिसते.आशी पणती काळोखात उजेड देवून अंधारातून तिमिराकडे नेते मग दिपावलीही हसतखेळत घरात प्रवेश करते.आणि माणसांच्या आयुष्यातला अंधार दुर करून लख्ख उजेडात आयुष्य प्रकाशमय होते.म्हणून तर आपण दिवाळीची आतुरतेने वाट पहात असतो आणि दिवाळीच्या निमित्ताने मनामनातली मळभ दुर होवून एकमेकांप्रती जिव्हाळा निर्माण होतो,आपलेपणा व प्रेम वाढते. अशी दिपावली घरात स्नेहभाव प्रज्वलीत करून कायम प्रसन्न ठेवते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational