शब्दसखी सुनिता

Tragedy Inspirational Others

3  

शब्दसखी सुनिता

Tragedy Inspirational Others

माणुसकी

माणुसकी

4 mins
311


      सत्यजित एका खेड्यात राहायच. त्याच घर वगैरे होत. ते गाव खुप लहान होत. दुष्काळी भाग संपूर्ण. कधी काम आहे तर कधी नाही. रोजगाराची तिथे पंचायतच होती. पण सत्यजितला काम मिळायची. तो दुरवर कामासाठी जायचा. त्याची तिन्ही मुले व बायको शहरात राहायचे. तो महीन्यातुन एकदा किॅवा दोन महीन्यांनी बायको आणि मुलांना भेटायला जायचा. पण नेमका कोरोना विषाणु आला. जगात कोरोनाचे रूग्ण वाढले. भारतातही या जीवघेण्या आजाराने शिरकाव केला. बघता बघता रूग्णसंख्या खुप वाढली. जास्तच कोरोना पाॅझिटीव्ह रूग्ण सापडत होते. सरकारने लाॅकडाउन जाहीर केला. जिल्हाबंदी झाली. सत्यजितला लाॅकडाउन मध्ये गावीच राहाव लागल. नाही मुलांशी भेट गाठ होत होती. त्याचही काम बंद झाल. त्यात थोड वय

असल्यामुळे तो जास्त काळजी घेत होता. त्यात मुलेही सांगत होती.... " बाबा, तुम्ही खुप काळजी घ्या, बाहेर पडू नका. मास्कचा वापर करा. न विसरता घालून जात जा... आणि सगळ काही एकदाच आणुन ठेवत जा... " अस मुल त्याला फोनवर सांगायचे. तोही घरी टीव्ही पाहू लागला. बातम्यांमुळे त्याला या आजाराबद्दलसगळ समजल. खेड्यातील लोक कसेही वागत होते. तरीदेखील सत्यजित सगळ व्यवस्थीत आपली काळजी घेत होता. सत्यजीत रोजच मुलांना फोन करायचा. त्याची मुलेही दोनदा फोन करायची. एकटेपणा वाटु नये म्हणुन, त्यालाही बर वाटायच. संवाद व्हायचा. असेज दोन महीने झाले पण लाॅकडाउन अजुनही तसाच होता. निर्बंध काही हटवले गेले नव्हते. उलट दुसर्‍या राज्यांत जाणार्‍यांचे अतोनात हाल झाले. सत्यजितला मुलांना भेटायला जाव वाटायच तो घरात एकटाच कंटाळला होता. पण करणार काय? तो ही आणि मुलेही काही करू शकत नव्हती. परीस्थितीच तशी होती. गाड्या वगैरे सगळ काही वाहतुकीची साधने बंद होती. बस आणि रेल्वेही बंद होत्या. ऑफीस, कार्यालये, शाळा, मंदीरच, लाॅटेल, माॅल्स सगळ बंदच होत. सत्यजित आठवड्यातुन एकदा त्याला लागणार सामान आणि बाजार आणत होता.       


असेच दिवस चालले होते. कोरोनामुळे भयानक परिस्थिती देशात निर्माण झाली होती. बाहेर गेल की कोरोनाची भिती असायची. आणि त्यावर योग्य अस औषध कींवा लस बाजारात आली नव्हती. त्यामुळे अजुन जास्त जनता घाबरत असे. सूरूवातीला कोविड म्हटल की सगळेच खुप घाबरत होते. लोकांमधील माणुसकी लोप पावली. कोरोनामुळे माणसां मधील माणुसकीच हरवली होती. काही ठिकाणी माणुसकी जिवंत असल्याच बघायला मिळाल. बातम्या, वर्तमानपत्रातुन बर्‍याचश्या घटना वाचायला मिळत होत्या. असेच दिवस चालले होते. सत्यजितला मुल रोज काॅल करून पहीले " तब्येत कशी आहे ? " हे विचारायची. सत्यजितही आपल्या मुलांना लाॅकडाऊन मध्ये त्रास नको, मूलांना काळजी नको म्हणुन त्याने त्याच दुखत असताना सांगितल नाही. मुलांना आपली खुप काळजी आहे ते काही करतील आणि येतील परत त्यांना हा सगळा त्रास असे खुप सारे विचार त्याच्या गर्दी करू लागले. तो हाॅस्पिटलमध्ये गेला. डाॅक्टरांनी गोळ्या दिल्या. त्याने थोडा फरक वाटला. पण पाच सहा दिवसांनी परत त्रास व्हायला लागला. तो स्वतःची काळजी घेत होता. जेवण बनवून खात होता. पण त्याला अचानक चक्कर यायला लागली, अशक्तपणा सारख वाटायच. त्यात उन्हाळा खुप कडक उन्ह होत. त्यामुळेही त्रास व्हायचा. मुलांचा फोन आला, तरी त्याने हे सगळ काहिच सांगितल नाही. मग शेजार्‍यांना समजल. त्या नवरा बायकोने त्यांना सांगितल. "तुम्हांला आम्ही जेवण देऊ, आराम करा, काही बनवू नका..." आणि त्यांनी खरच जेवण दिल. इतरांनाही माहीती झाल की सत्यजितला बर नाही. त्यावेळेस इतका कोरोना वाढला होता. शहरात तर लोक समोर चक्कर येऊन पडलेल्या माणसाला उचलत नव्हते पण त्या खेड्यागावातील अशिक्षीत पण मनाने मोठ्या असणार्‍या लोकांनी माणुसकीच्या नात्याने सत्यजितला मदत केली. अगदी एक छोटी मुलगीही सत्यजितला पिण्यासाठी पाणी भरून ठेवत आणि सांगत काही लागल तर मला आवाज द्या. कुणीही त्यांना विचारतु असत. सगळे त्यावेळेस त्यांना विचारायचे. लक्ष द्यायचे. 


पण त्यांना हाॅस्पिटलला दाखववा लागणार होत. त्यावेळस तालुक्याला सगळीकडे प्रायव्हेट हाॅस्पिटल हे कोविडचे पेशंट घेत होते. दुसर्‍या पेशंटला घेत नसे. खुप लोकांना याचा त्रास व्हायचा. त्यात गाड्याही चालू नव्हत्या. कस दुर जायच दाखवायला. हाच प्रश्न सत्यजितला पडला. तरीही त्याला लागणारे मेडीसीन शेजारच्या मुलांनी गाडीवर जाउन आणुन दिले. आजुबाजुचे सगळेच त्यांची काळजी घेत होते. त्यांना माहीती होत लाॅकडाउनमध्ये याची मुले आणि बायको कसे येतील, मनाने खुप मोठे असणार्‍या या लोकांनी मनापासून निःस्वार्थी सेवा केली. सत्यजितचे त्या लोकांशी संबंध चांगले होते. सत्यजितचे नातेवाईक गावात होते, तर त्याच्या आजुबाजुच्या लोकांनी सांगीतल, की तुमचा पाहूणा सत्यजित तो थोडा आजारी आहे, आम्ही हाॅस्पिटलला नेल होत. थोड त्यांना बर वाटतय. तुम्ही येउन बघुन जा...." दोन तीन जवळच्या नातेवाईकांना निरोप दिला तरी ते आले नाहीत. का तर त्यांना वाटल की संशय आला, सत्यजितला कोरोना तर नसेन झाला ना, त्याच्यामुळे आपल्याला होईल. पण त्या नातेवाईकांमधल कूणीही त्याला भेटायला आल नाही. हे सर्वांना समजल. तेव्हा त्यांना खुप वाईट वाटल. सत्यजितलाही समजल. त्यालाही मनाला खुप लागल. त्याच्यावर अशी परिस्थिती असताना नातेवाईक असुन मदत केली नाही, त्याला याच खुपच मनाला वाईट वाटल. शेवटी परकी माणस बर ! हे त्याला समजल होत. माणुसकी ही रक्तातच असावी लागते. इच्छा असेल ना आपण कुणालाही माणुसकीच्या नात्याने मदत करू शिकतो. सत्यजितला त्याच्याच बाबतीत अस झाल तेव्हा वाटल खरच या कोरोनामुळे माणुसकी लोप पावली. आपलीच माणसे आपल्यापासून कशी दूर होतात वेळ आली की हे त्याला सनजल होत. त्या सर्व लोकांनी माणुसकीच्या नात्याने मदत केली आणि सत्यजितला बर केल. " रक्ताच्या नात्यापेक्षा परकी माणसेच जास्त माणुसकीच दर्शन घडवतात.... "  


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy