Dhanraj Gamare

Children Stories Inspirational Children

3  

Dhanraj Gamare

Children Stories Inspirational Children

माय मराठी

माय मराठी

2 mins
288


एक शहर असते . त्या शहरात एक इंग्रजी माध्यमाचे महाविद्यालय असते . त्या महाविद्यालयामध्ये एक प्राध्यापक नुकताच नोकरी करण्यासाठी आलेला असतो . प्राचार्याच्या केबिनमध्ये मध्ये प्राचार्य बसलेले असतात . तो प्राध्यापक मराठी विषयात पी. एच. डी. झालेला असतो पण त्याला इंग्रजी पण चांगले येत असते . त्या दोघांमध्ये संवाद सुरू होतो .


प्राचार्य : बोला सर , मी तुमची काय मदत करू शकतो ?


प्राध्यापक : सर माझी मराठी विषयात PHD झालेली आहे . मी इंग्रजी विषय पण उत्तमप्रकारे शिकवतो . माझी अशी इच्छा आहे की मला आपल्या महाविद्यालयात इंग्रजी विषयासोबत मराठी भाषा पण शिकवायची आहे .


प्राचार्य : सर तुमचे म्हणणे बरोबर आहे पण मी तुम्हाला

आमच्या महाविद्यालयात मराठी भाषा शिकवायची परवानगी देऊ शकत नाही . तुम्ही फक्त आमच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयातच अध्यापन करू शकता .


प्राध्यापक : सर मला एकदा शिकविण्याची संधी तरी देऊन पहा .


प्राचार्य : अजिबात नाही . तुम्हाला जर आमच्या महाविद्यालयात इंग्रजी विषय शिकवायचा असेल तर तुम्ही ही नोकरी करू शकता नाहीतर आपण दुसऱ्या महाविद्यालयात जाऊ शकता .


प्राध्यापक: अहो सर पण असे का ? तुम्ही जर आपली जुनी संस्कृती विसरत असाल तर आपण आपल्या भावी पिढीला काय वारसा ठेवणार .


प्राचार्य : अहो ! सर तुम्हाला एकदा सांगितल तर कळत नाही का . आम्हाला ही मराठी भाषा नको . 


प्राध्यापक : सर ऐका जर का आपण आपली गौरवशाली संस्कृती आणि भाषा यांची जाणीव भावी पिढीला करून दिली नाही तर त्यांना आपला इतिहासच कळणार नाही. सर मला एक संधी देऊन तरी पहा मी इंग्रजी भाषेसोबतच मराठी भाषेची गोडी आणि आपुलकी मुलांमध्ये निर्माण करीन आणि मराठी भाषा शिकवण्यासाठी मी जास्तीची फी सुद्धा घेणार नाही .


प्राचार्य : ठीक आहे ! मी तुम्हाला एक संधी देऊन पाहतो .


प्राध्यापक : सर मग चला .


प्राचार्य : हा चला सर . तर मग बघूया तुम्ही इंग्रजी सोबत कशी मराठी भाषा शिकवता .


दोघेजण वर्गात जातात . सर्व मुले आदराने दोघांना शुभ प्रभात असे म्हणतात . त्या नंतर प्राचार्य विद्यार्थ्यांना नवीन प्राध्यापकांची ओळख करून देतात . प्राचार्य विद्यार्थ्यांच्या सोबत बाकावर बसतात आणि प्राध्यापक शिकवायला सुरुवात करतात . सर्वप्रथम प्राध्यापक मुलांना इंग्रजी शिकवतात आणि उरलेल्या वेळेत ते मुलांना मराठी भाषेचे महत्त्व पटवून देतात . सर्व मुले टाळ्या वाजवतात . प्राचार्य खूप खुश होतात आणि अश्यातरेने प्राध्यापकांना नोकरी मिळते . रोज प्राध्यापक मुलांना इंग्रजी सोबत मराठी पण शिकवतात . 



Rate this content
Log in