Arun Gode

Tragedy

3  

Arun Gode

Tragedy

पोरके पोर

पोरके पोर

6 mins
343


    एका साधारण छोट्या शहरातील एका नवीन वस्तीमधे एक साधारण संपन्न परिवार राहत असे. त्या परिवारात चार भाऊ आणि एक बहीण राहत होती. बाजुच्या जवळ्या गांवामध्ये त्यांची शेतिवाडी वगैरे होती. गांवा वरुन, कधी इंधनाचे लाकड तर कधी अन्य-धान्य येत असे. हंगामात नेहमी हुरडा व तुरीच्या शेंगा घेवुन गडी येत असे. घरातील सर्वच भाउ-बहीन हे शिक्षन घेत होते. सर्वात लहान मुलगा पण शाळेत जात असे .त्याचे अभ्यासात फार जास्त लक्ष नव्हते. पन तो बुध्दीने फार हुशार होत. त्यामुळे तो फारसा अभ्यास करित नव्हता. पण घरात लहान असल्यामुळे सर्वांचा लाडका होता.त्यामुळे त्याला कोणी घरातील फारसे रागवत वैगरे नव्हते. त्याचे शाळेचे मित्र तर होतेच, पण चाळीत पण वयाने मोठे मित्र अनेक होते.


       असाच एक मित्र ,प्रकाश त्याच्या घराच्या रांगेत शेवटी राहत असे. त्याच्या घराच्या बाजुनेच एक छोटे व एक मोठे असे दोन पटांगन होते. त्यामुळे तो नेहमी कंचे, इटी-डांडु, चेंडु क्रिकेट व अन्य खेळ खेळन्यासाठी जात असे. कधी-कधी प्रकाश पण सोबत खेळण्यासाठी येत असे. त्यामुळे दोघांची चांगली मित्रता झाली होती. प्रकाशचे घर जवळ असल्यामुळे त्याच्या कडे ताहान लागल्या वर पाणी पिण्यासठी जात असे. त्याला आई नव्हती. वडिल होते. पन त्यांना दमा होता. ते कसे तरी घर चाल विण्यासाठी सुत गिरणीत कामाला जात असे. खायला कोंडा व राहयला धोंडा अशी परिस्थिति होती. सुत गिरनीत जितके दिवस काम करित होते तेवढ्याच दिवसाचा पगार मिळत असे. प्रकाशचे वडिल, त्याचा मित्र अरुण -च्या वडिला सोबत कधी-कधी गप्पा- गोष्टि करत असे. त्यांची एक सवय होती कि गोष्टि संपत आल्या की ते वडिलांना काही पैसे उधार मागत असे.व नंतर ते वापस करुन देत होते. माझ्या वडिलांना खात्री पटली होती कि ते गृहस्थ अडचण असली म्हणजेच पैसे उधार मागतात. चाळीत बहुतेक मला कोणी कधी काही बोलत नसे. वडिलांचा तसा दरारा होता. प्रकाश पण शाळेत जात असे. त्याची आणी माझी शाळा वेग-वेगळी होती. त्याचेपण अभ्यासात फारसे लक्ष नव्हते. तो कसा तरी वर-पास होवुन पुढच्या वर्गात जात होता. मुलगा शिकत आहे याचे प्रकाशच्या वडिलांना समाधान होते. ते बिना आईच्या मुलाचे कसे तरी संगोपन करत असे.म्हातारी गेल्याचे दुःख नव्हते पण काळ सोसावत होता. मुलाकडे लक्ष देने ही त्यांची जवाबदारी होती.


      आम्ह्ची मित्राता फार पक्की होती. आठवी नंतर त्याने शाळा सोडुन दिली होती. वा तो घर काम किंवा गावात फिरत असे. नाही तर त्याच्या शाळेतील मित्राच्या शेतात जात असे. चोराच्या मनात चांदणं. चाळीत त्याच्या विषयी, चाळीतील लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोण फारसा चांगला नव्हता. त्या विषयी काही जवळचे शेजारी त्याच्या वडिलांना बोलत असे. पन त्याचे वडिल माझा मुलगा ज्याच्या सोबत राहतो किंवा खेळतो त्याच्यात काही अवगुण आहे कां ? असा प्रश्न नेहमी प्रतिउत्तर म्हणुन करित असे. या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या जवळ नव्हते. पन ते म्हणायचे अरे तो श्रीमंत घरचा मुलगा आहे. त्याच्या सोबत राहुन प्रकाशचे काही भले होणार आहे कां ?. ते हसत म्हणतं, अरे ती श्रीकृष्ण सुदामाची मित्राता आहे !.


        नंतर चाळीमधे एक-दोन ठिकाणी, छोट्या- मोठ्या घरघुती चो-या झाला होत्या. पण हा त्यांच्या कडे बहुतेक कधीच जात नसे. तरी चाळीतील लोकांना प्रकाश वर शंका होती. पण त्याचा मित्र अरुण मुळे अर्थातच माझ्या वडिलामुळे कोणी त्याच्या वर आपक्षेप घेत नसे. एक वेळेस , त्यांच्या जातीच्या घरोबा असलेल्या घरीच चोरी झाली होती. तो त्यांच्या कडे जात असे. संबंध खुपच जवळचे होते. ते त्यांचे घर मालक पण होते. त्यामुळे त्याच्यावर आरोप लावण्यात आला होता.बाजारात तुरी आणी भट भटणीला मारी. आरोप लावणारे जवळचेच असल्यामुळे प्रकाशच्या वडिलांनी त्याची शाहानिशा करण्याचे ठरविले होते. प्रथम त्यांनी त्याची चांगली झडती घेतली होती.त्याच्या जवळ काही असी रक्कम मिळाली नाही. मी अनायशे त्याच्या घरी गेलो होतो. माझ्या मित्राचा व्यवहार हा नेहमी सारख माझ्या सोबत नव्हता. वडिलांनी आपल्या वर चोरीचा आरोप लावला त्यामुळे त्याची पायाची आग मस्तकात गेली होती. त्या काकांचा माझ्या वर फार विश्वास होता. त्यांनी मला सहज विचारले कि प्रकाश काल कुठे होता. त्यानी वेळ पण सांगितली होती. मी त्यांना प्रामाणिक पणे सांगितले कि काल जीतेंद्र या कलाकाराचा नविन सिनेमा लागला होता. तो आमच्या दोघांचा ही आवडता नट आहे, त्या काळात पहिल्या दिवशी जीतेंद्र सारख्या प्रसिध्द नटाच्या सिनेमाला फार गर्दी होत असे. बहुतेक टिकिट साधार मुलाला रांगेत राहुन मिळत नसे. म्हणुन मी त्याला सिनेमा बघण्यासाठी घेवुन गेलो होते. परिस्थितिमुळे त्याकडे कधीच पैसे राहत नव्हते. त्यामुळे बहुतेक मी त्याला सिनेमा बघण्यासाठी घेवुन जात असे. ही गोष्ट कांकाना माहित होती.त्यांना मी लगेच दोन अर्ध्या टिकिटा पण दाखविल्या होत्या.त्यांचा माझा वर विश्वास पण होता. त्यामुळे आपला मुलगा दोषमुक्त आहे याची त्यांना खात्री पटली होती. नंतर मी माझ्या मित्राला खुप-खुप खोदुन- खोदुन विच्यारण्याचा प्रयत्न केला. पण त्याने मला काही सांगितले नाही.मग मी त्यात विशेष रुची दाखवली नाही.


      नगरात सारख्या चोरिंच्या घटना घटत असल्यामुळे काही कुंटुंब फार जागृत व चौकस झाले होते.अशाच एका कुंटुंबातील काकुंनी त्या चोर मुलाला चोरी करतांना रंगे हात पकडले होते. त्या चोर मुलाच्या आईचे बरेच ठिकानी चांगले घर-घुती डाट संबंध होते. त्यामुळे तीचा मुलगा अशा घरी घरच्या सारखा वावरत असे. चाळीत जेव्हा कधी चोरी झाली कि चोरीची चर्चा करण्यात तीचा नेहमीच पुढाकार असायचा. स्वतःचे लपवुन अन दुस-याचे वाकुन अशी तीची प्रवृत्ती होती. पण तीला आपल्या मुला विषयी कदाचित काही माहिती नसावी !. ती इकडे-तिकडे सारखे बोट दाखवतं असे. तीचा नेहमी इशारा प्रकाश कडे असे. तीला पण आपला मुलगा चोर आहे यांची जाणीव पहिले कदाचित नव्हती. पण तीच्या मुलाला चोरी करतांना पकडल्या मुळे. व त्याने मान्य केल्यामुळे तीची फार फजिहत झाली होती. सुर्य लाजेल व चद्र लपेल अशी त्या मुलाची थोरवी उघडकिस आली होती. या घटने मुळे तीच्या तोंडला काळिख लागली होती. आता तीचे वजन घटले होते. बरेच गृहस्थांनी प्राकाशच्या वडिलांची माफी पण मागितली होती. त्यांनी त्यांचा स्वतःच्या मुला वर असलेल्या विश्वासाची पण प्रशंसा केली होती. मेलेल्या म्हशीचे पाच शेर दुध. ते म्हणत होते. माझ्या मुलाला आईचे मार्गदशन, प्रेम व सहवास लहान पनापासुनच मिळाला नाही.हे खरे आहे.तो शिक्षणात फारसा चांगला नाही. त्यामुळे तुम्हचे आरोप करणे योग्यच होते.पण मला पूर्ण विश्वास होता कि ज्याच्या सोबत तो राहतो, तो काही असे त्याला करु देणार नाही. मी त्या मुलाला अगदी लहान पणा पासुनच पाहत आणी ओळखत आहो. त्याच्या मित्राला आई नाही याची जाणीव त्याला आहे. आम्हची आर्थीक परिशिति पण वाईट आहे हे त्याला माहित आहे. त्याचे वडिल अडि-अडचणीच्या वेळस आमची मदत करतात. त्याला तो नेहमीच सिनेमा, नास्ता किंवा आपल्या खेड्यावर घेवुन जात असतो.त्यामुळे माझा ,माझ्या मुला पेक्षा त्याच्या मित्रा वर जास्त विश्वास आहे. तो खोटा बोलनार नाही. याची जाणीव मला आहे. मी मागच्या चोरीच्या वेळ्स , माझ्या मुलावर बरेच लोकांनी बोट दाखवले होते.पन मी त्याच्या मित्रा कडुन शाहानिशा केल्या वरच तुम्हा सर्वांचा आरोप फेटाळून लावला होता.आज ते सत्य उघडकिस आले आहे.


       वेळ आणी समुद्राच्या लाटा कधी कोणासाठी कधीच थांबत नाही.मी पुढच्या शिक्षणासाठी गांव सोडुन मोठ्या शहरात गेलो होतो.नंतर विज्ञान शाखेत स्नातकोत्तरची पदवी मिळाल्या वर लगेच सरकारी नौकरी करु लागलो होतो. त्यामुळे आमच्या भेटी-गाठी कमी-कमी होत गेल्या होत्या. प्रकाश ने नंतर शाळा सोडुन दिली होती. तो सुत गिरनीच्या कॅटिंग मध्ये काम करायला लागला होता. बहुतेक तीथेच राहत असे. त्यामुळे भेट होत नव्हती. काकांनी अस्थमाचा त्रास वाढल्यामुळे नौकरी सोडली होती. नकटिच्या लग्नाला सत्राशे साठ विघ्न. कालांतराने सुत गिरणी पण बंद पडली. त्यामुळे काका मोठ्या झालेल्या मुलाला सोडुन कुठे तरी, बहुतेक हरिव्दार ला संत बनुन ईश्र्वर सेवेत लागले होते. असेल माझा हरी तर देईल खटल्यावरी. प्रकाश पोट-पाण्याच्या शोधात गांव सोडुन दूर निघुन गेला होता. शेवटी त्याचा शोध घेण्याचा मी खुपच प्रयत्न केला होता. माझी पण केंद्र सरकारची नौकरी असल्यामुळे मी सारखा पर-प्रांतात कुंटुंबा सोबत भ्रमण करित राहलो होतो. नंतर मी नागपुरचा स्थाई रहिवाशी झालो होतो. पण माझा लाहान पनीच्या मित्राचा शोध अजुन लागला नव्हता. तो पृथ्वी तळावर भेटनार की नाही याची पूर्ण खात्री नाही !. बोचापाशी आरी अन् चांभार पोरांना मारी. क्दाचित तो माझ्या जवळ- पास असेल ,पण आमची भेटण्याची वेळ आली नसावी. पण तो नक्कीच माझ्या  हृदयात बसला आहे. लहान पणी त्याने निभवलेल्या मित्रतेचा मी आजही त्याचा ऋणी आहो. संकटांनी व काळाने पिता, पुत्र व मित्राला वेळेच्या आधीच पोरके केले होते.आई बिना तिन्ही लोकांचा स्वामी भिकारी कोणी उगच म्हनतं नाही. बिना आईच्या मुल व बायको बिना पति जगात कसा पोरके होतात याची जाण मला झाली होती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy