shubham gawade Jadhav

Abstract

2.5  

shubham gawade Jadhav

Abstract

प्रसारमाध्यम

प्रसारमाध्यम

2 mins
183


धावपळीच्या जीवनात माणसाला प्रत्येक गोष्टींची खबर ठेवण हे कोणालाच शक्य नाही. जगात अगणित गोष्टी घडत असतात ज्या आपल्याला माहीत नसतात. मग यांची माहिती नक्की आपल्याला मिळती कुठून.... तर जनता आणि घडणाऱ्या गोष्टी यातला दुवा किंवा या दोन गोष्टींना जोडणार माध्यम म्हणजे... प्रसारमाध्यम.आता या शब्दातच त्याचा अर्थ दडलाय प्रसार म्हणजे पसरवणे.

मग जगात कुठे काय घडतंय याची धावती झलक किंवा इतंभूत माहिती आपल्याला यातून भेटते.


    तशी खूप सारी प्रसारमाध्यम आहेत जसं की रेडिओ, दूरदर्शन,अलीकडे सगळ्यांकडे असलेला आणि सगळ्यांचा आवडता मोबाईल, वृत्तपत्रे हे सगळे आपल्याला विविध घटकांची माहिती देतात ही झाली प्रसारमाध्यम. मग आता प्रश्न असा की खरच हे आपल्याला योग्य माहिती देतात कां की आपली फसवेगिरी होती. याचा आपण कधी पाठपुरावा केला कां? की सगळे जसे नंदिबैलासारखी मान हलवतात गुबूगुबू वाजलं की तसं आपण करतो. काही वेळा आपली फसवणूक होऊ शकते.


    प्रसारमाध्यमांच काम आहे की खरी खुरी माहीत आणि योग्य ती माहिती तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहचवायची. मग ती माहिती कोणत्याही क्षेत्रातली असो. राजकारण, हवामानचा अंदाज, क्रीडाक्षेत्र, बाजारभाव वगैरे. पारदर्शकता ठेवणे,गैरप्रकारांना आळा घालणे, समाजाला प्रत्येक गोष्टीत जागरूक करणे, कोणावर अन्याय होत असेल तर त्यांना न्याय मिळवून देण, सगळ्यांना एका धोरणात काम करायला लावणं.अशी सगळी काम प्रसारमाध्यम करत असतात.


    पण मग ही प्रसारमाध्यम कोणाच्या दबावाखाली काम तर नाही ना करत किंवा एकतर्फी म्हणजे कोणा एकाचीच बाजू तर नाही ना घेत. काही काही प्रश्न इतके कठीण असतात की भल्याभल्यांची बत्ती गुल होते. कोण बडा नेता किंवा पैशावाला यांची चमचेगिरी तर नाही ना करत असे प्रश्न प्रत्येकाला पडत असतील. साहजिकच आहे पडणं.


    मला तर हे सगळं पारदर्शी वाटत. यान सगळं कसं सुरळीत चालत. आपल्यावर कोणत्या कारणाने अन्याय होतो का नाही हे समजतं. विविध क्षेत्रातली माहिती मिळते. अन्याय करणारे थोडा कां होईना घाबरून असतात. ही माध्यमे नसती तर उगी अंधाधुंद माजली असती परिणामी आपला कुठेच टिकाव लागला नसता.ही जर एकतर्फी असती तर न्याय हा शब्दच बुडाला असता. अन्यायाला वाचा फोडणारी ही प्रसारमाध्यम मानवाच्या जीवनातले अविभाज्य घटक/अंग आहेत.ज्याच्याविना माणसाचं आयुष्य अधुरं आहे.

    आजकालची माध्यम खूप जलद गतीने काम करत आहेत त्यामुळे लवकरात लवकर गोष्टी समोरं येतात.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract