Sneha Kale

Drama Romance Tragedy

4  

Sneha Kale

Drama Romance Tragedy

ऋणानुबंध

ऋणानुबंध

24 mins
357


"चला आजचा दिवस संपला.. उद्या रविवार मस्त लोळत पडायचा दिवस. उद्या मी उशिरा उठणार, आईच्या हातच मस्तपैकी जेवणार आणि पुन्हा लोळणार.."

ऑफिसच्या लिफ्टमधून खाली येताना स्वराच्या डोक्यात उद्याच्या दिवसाचे प्लॅंनिंग चालू होते..गेले आठवडाभर work load मुळे तिची म्हणावी तशी झोप झाली नव्हती..उद्या फक्त आराम करायचा म्हणून तिच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या...

स्वरा प्रधान..नावाप्रमाणेच आवाजात माधुर्य असलेली, मनमिळावू स्वभावाची, परोपकारी वृत्तीची आणि सतत हसतमुख असणारी..एका finance company मध्ये जॉबला होती..सर्वकाही तिने ठरवल्याप्रमाणे तिच्या आयुष्यात घडत होतं.शिक्षण आणि नंतर नोकरी..सर्वकाही उत्तम सुरू होत.पण तिच्या बाबांना (जयवंत प्रधान) मात्र वेगळीच चिंता सतावत होती..जसजसं दिवस जात होते तसतसं स्वराच्या वयासोबत त्यांची चिंताही वाढत चालली होती..आपल्या लाडक्या लेकीचं लग्न कधी होणार याच विचारात ते सतत असायचे..तिला अनुरूप जोडीदार मिळावा यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न ते करत होते..स्वरा मात्र याबाबतीत relax होती..तिला काही घाई नव्हती..

घरी गेल्यावर पर्स कोचवर टाकत स्वतःचे शरीर सुद्धा तिथेच टाकले..

"अगं उद्या तुला सुट्टी ना..हे बोलत होते उद्या ते माने आहेत ना बाबांचे मित्र त्यांनी एक वधू- वर सूचक मंडळ सांगितलंय , तिथे जायचय..सकाळी लवकर उठून आवरून बस..", आईने (आरती प्रधान)आल्या आल्या बॉम्ब टाकला..

"अग आई तुम्हाला रविवारच मिळतो का हे सगळं करायला..मला ना जाम कंटाळा आला होता..उद्या मस्तपैकी ताणून देणार होते..आणि तुमचं हे मधेच काय", स्वरा वैतागून बोलत होती..

"आमच्यासाठी चाललंय का हे सगळं..आम्हीच काळजी करायची का की तुझं लग्न कधी होणार..तुला काहीच कस वाटत नाही ग..आता नको मग अस करत करत 25 शी ओलांडली तुझी..आता स्थळ बघायला सुरुवात केली तर कुठे 1-2 वर्षात जमत..ते काही नाही उद्या गपचूप यायचंय आमच्यासोबत...आणि माझ्यासमोर बोललीस बाबांसमोर हे सगळं बोलू नकोस..उगाच चिडचिड करतील..", आई म्हणाली..

आईने स्वराला काही बोलायला जागाच ठेवली नाही..नाईलाजाने ती उद्या आई बाबांसोबत जायला तयार झाली..

दुसऱ्या दिवशी स्वराचे आई बाबा लवकर उठून आवरायला लागले. स्वरा अजून अंथरुणातच होती..आई बाबांच्या आवाजाने ती जागी तर झाली पण तिला उठावेसे वाटत नव्हते. सुट्टीच्या दिवशी अंगावर पांघरून घेऊन लोळायचा तिचा मनसुबा धुळीत मिळाला होता..म्हणून ती थोडी नाराज होती..स्वरा उठली का हे पाहायला तिची आई आली..आईला बघताच तिने पांघरून डोक्यावर ओढून घेतलं.आईने तिला जबरदस्ती उठवलं...नाही हो करत शेवटी स्वरा उठली आणि आंघोळीला गेली..

आवरता आवरता तिच्या मनात विचार सुरू होते..

'आई बाबा पण रविवारीच हे असले कार्यक्रम ठरवतात...काय गरज आहे एवढ्या लवकर उठवायची..'

एक लांब उसासा सोडत तिने आई बाबांचा चेहरा समोर आणला..'किती स्वार्थी आहेस तू स्वरा..जी काही धडपड चालू आहे ती कोणासाठी...माझ्यासाठीच ना..माझं लग्न लवकरात लवकर पार पाडाव यासाठीच तर त्यांची खटपट चालू आहे..मी जायला तयार झाले म्हणून किती खुश आहेत दोघे..माझं लग्न जमलं तर त्यांना किती आनंद होईल..कधीतरी त्यांचा विचार पण करत जा..

अस नाही की मला लग्न करायचं नाही..पण भीती वाटते..आपली माणस आपलं घर सोडून एका अनोळखी व्यक्तीच्या घरी जाऊन त्याला, त्याच्या कुटुंबियांना आपलं मानायचं..बर ती मंडळी चांगली असली तर ठीक..नाहीतर कशीही असली तरी आपलं नशीब मानून गप्प बसायचं..लहानपणापासून आईला कष्ट करताना पाहतेय.आजी किती त्रास द्यायची तिला..आजही जेव्हा आई ते सांगत असते तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी येत..आईने ते सारं सहन केलं पण माझ्यात तेवढी सहनशीलता नाही..माझ्या बाबतही तसच घडलं तर...विचार करूनच अंगावर काटा येतो..म्हणून माझ्या मनाची तयारी होत नाहीये..'

"स्वरा आवरलस का, लवकर ये नाश्ता करायला.." आई म्हणाली..

"आले झालंच माझं",स्वरा.

तिघांनी नाश्ता केला आणि निघाले..

काही वेळातच ते वधू- वर सूचक मंडळात पोहोचले..बाबांनी सगळे documents आणि स्वराचे फोटो सोबत आणले होते..रविवार असल्याने मंडळात नेहमीपेक्षा जास्तच गर्दी होती..बराच वेळ वाट पाहिल्यानंतर त्यांना आत बोलावले..त्यांना फॉर्म दिला ..स्वराच्या बाबांनी सगळी माहिती भरली..तिथे आलेल्या एक दोन जणांनी स्वराच्या बाबांकडून स्वराची माहिती घेतली..बाबांनीही त्यांचा फोन नंबर दिला..तिकडचे काम झाल्यावर ते तिघे अजून दोन मंडळात जाऊन स्वराचे नाव नोंदवून आले..

संपूर्ण रविवार नाव नोंदवण्यात गेला..संध्याकाळी सगळी घरी परतली..स्वरा फ्रेश होण्यासाठी रूममध्ये गेली..तिची पर्स बाहेर राहिली म्हणून ती पुन्हा हॉल मध्ये येत असताना बाबांचे बोलणे तिच्या कानावर पडले..

"आज एक मोठं काम झालं..निदान नाव नोंदवायला तरी पोरगी तयार झाली म्हणून आज बर वाटतंय..आता बघच तू कशी चांगली चांगली स्थळ येतात माझ्या पोरीला..एकदा का ती तिच्या घरी गेली की मी मोकळा..लग्न हे योग्य त्या वयातच व्हायला हवं..वय वाढत गेल की चेहऱ्यावरच तेज कमी व्हायला लागत...आणि पुढे अडचणी आहेतच", अस म्हणत बाबांनी आपल्या डोळ्यातलं पाणी पुसलं..

आईच्या डोळ्यातही पाणी तरळलं..

बाबांचे बोलणे ऐकून स्वरालाही भरून आलं..

तेवढ्यात बाबांच्या मित्राचा फोन आला..त्यांच्या मुलीचं ,सुखदाच, लग्न ठरलं होतं..ही बातमी ऐकून बाबा खूप खुश झाले..सुखदा आणि स्वरा एकाच वयाच्या..एकाच शाळेत आणि एकाच वर्गात शिकलेल्या.. स्वरा आणि सुखदाचा बरेच दिवस काहीच संपर्क नव्हता..बाबांनी स्वराला ही आनंदाची बातमी सांगितली..सुखदाच लग्न एका matrimonial site वरून जुळलं होत.बाबांनी सुखदा च्या बाबांकडून matrimonial site बद्दल सर्व माहिती विचारून घेतली..

"हल्ली सारख सारख वधू वर सूचक मंडळात जायला कोणाला वेळ नसतो. हा online चा जमाना आहे..वधू वर सुचक प्रमाणे लग्न जमवणाऱ्या अनेक sites असतात..या sites वर आपण आपले नाव register करायचे असते..आपली माहिती भरायची..आपल्या जोडीदाराकडून ज्या काही अपेक्षा आहेत ते तिथे नमूद करायचं..आपला एक फोटो टाकायचा..आणि मग त्या sites वर register केलेले आपल्याला अनुरूप असे match ते दाखवतात..", सुखदाच्या बाबांनी सांगितले..

"पण मुलींचे फोटो असे कुठे पण पोस्ट करायचे म्हणजे risk आहे ना..हल्ली काय काय अभद्र प्रकार चालू आहेत माहीत आहे ना..", स्वराच्या बाबांनी शंका व्यक्त केली..

"मुलींचे फोटो विशिष्ट password ने protect केलेले असतात..त्यामुळे ज्यांना तुम्ही तो password देणार तेच फोटो पाहू शकतात...", सुखदाच्या बाबांनी माहिती दिली..

"पण आपल्याला जर एखादं स्थळ आवडलं तर आपला contact कसा होणार", स्वराच्या बाबांनी प्रश्न केला..

"त्यासाठी तुम्हाला काही रक्कम भरावी लागते..ती भरली की तुम्ही त्यांचे contact number पाहू शकता.. जर तुम्हाला रक्कम न भरता contact करायचा असेल तर Express Interest feature असते..त्याद्वारे तुम्ही संपर्क करू शकता..

सुखदाच्या बाबांनी सांगितल्या प्रमाणे स्वरा आणि बाबांनी लगेचच site open करून registratiom करून टाकलं..सर्व माहिती, अपेक्षा वगैरे भरलं..आणि लगेचच matching profile समोर आले..बाबांना हे खूपच आवडलं की आता घरी बसून स्थळ पाहायला मिळतील..

साधारण महिन्याभरात जवळजवळ 20 स्थळ पाहून झाली...काही site वरची, काही वधू वर सूचक मंडळातली तर कोणी ओळखीच्यानी सुचवलेली..

एकही पसंत पडत नव्हते..कोणी पसंत पडले तर पत्रिका जुळायची नाही किंवा अन्य काही कारण...

एके दिवशी स्वरा site वर profile पाहत असताना..तिला एक फोटो दिसला..बघताक्षणी तिला आवडला..त्याची सगळी माहिती पाहिली.. आणि लगेच आई बाबांना बोलावून त्याची माहिती दाखवली..आई बाबांनाही तो आवडला..

रोहित राजाध्यक्ष..स्मार्ट, हँडसम, उच्चशिक्षित, मुंबईतला पण पुण्यातली नोकरी, उच्च मध्यम वर्गीय कुटुंबीय..आई गृहिणी तर बाबा रिटायर....एकुलता एक...

आई बाबांना हे स्थळ पसंत पडलं..स्वराच्या बाबांनी profile वर असलेल्या नंबरवर कॉल केला..एका महिलेने फोन उचलला..

"नमस्कार, मी जयवंत प्रधान बोलतोय..रोहित राजाध्यक्ष यांचे profile पाहिले..माझ्या मुलीसाठी स्वरासाठी स्थळ पाहतोय..त्यासंदर्भात बोलायचे होते.." , प्रधान म्हणाले..

"हे बघा, आमचा मुलगा इंजिनिअर आहे आणि आम्ही त्याच्यासाठी कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली, उच्चशिक्षित आणि नोकरी करणारी मुलगी पाहतोय..या आमच्या बेसिक अटी आहेत..अस असेल तरच पुढे बोलू..नाहीतर वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही..", राजाध्यक्ष बाईचे बोलणे ऐकून बाबांनी "बर" म्हणत फोन ठेवून दिला...

"कोण समजते कोण स्वतःला ती बाई..हीचा मुलगा काय राजकुमार लागून गेलाय..एवढा मोठेपणा करून बोलतेय.. बाबा तुम्ही काहीतरी बोलायचं ना तिला..", फोन स्पीकरवर असल्याने स्वराने सगळं बोलणं ऐकलं..

"अगं अस काहीपण बोलून चालत नसत..आपली मुलीकडची बाजू आहे..आपल्याला प्रत्येक शब्द सांभाळून बोलावा लागतो..जाऊ दे..तू एवढं मनावर घेऊ नकोस..अजून बरीच स्थळ पाहायची आहेत आपल्याला..अश्या बोलण्याची सवय करून घ्यायला हवी..आणि त्यांच्या बोलण्यावरूनच लक्षात येत होतं की त्या महिलेचा स्वभाव कसा असेल...नाही तिला आपलं ऐकून घ्यायचं तर विषय सोडून द्यायचा...अजून स्थळ पाहू", बाबा सकारात्मकतेने म्हणाले...

' मुलीचा बाप होणं म्हणजे खूप मोठा गुन्हा असल्यासारखे बाबा वागतात कधी कधी...कोण कुठली ती बाई..काही पण बोलली माझ्या बाबांना.. आणि बाबांनी ऐकून घेतलं..का..इतकी लाचारी का..एकअर्थी बरच झालं..असल्या घरात जायचंच नाही मला..जिथे मुलींच्या स्वभाव आणि वागणूक यापेक्षा तिचे उच्चशिक्षण आणि तिची भरपूर पगाराची नोकरी याला महत्व दिल जात...' स्वरा मनात विचार करत होती...

स्वराने झालेला प्रकार विसरून पुन्हा वर संशोधनाला सुरुवात केली..

एक महिन्यांनंतर....

'एकही चांगला मुलगा नाही, या site वर..देवा , चांगली मुलं बनवण्याचं बंद केलंस का ...आहे की नाही कोणी माझ्या नशिबात...', असा विचार करत स्वरा लॅपटॉप समोर बसली होती...

शेवटी कंटाळून तिने लॅपटॉप बंद केला..रात्री जेवताना बाबांनी सांगितलं की त्यांना सर्वांना कुलदेवीच्या जत्रेला गावी जायचं आहे..स्वराने 4 दिवसांची रजा घेतली..दुसऱ्या दिवशी पहाटेच्या गाडीने प्रधान कुटुंब गावी पोहोचलं..गावी त्यांचं घर होत..घरी जाऊन सामान ठेवलं..आईने देवीचा नैवेद्य घरूनच करून आणला होता तो सोबत घेतला आणि तिघे दर्शनाला निघाले..देवळात फारशी गर्दी नव्हती..लोक यायला सुरुवात झाली होती..आई बाबा आणि स्वरा यांनी देवीचं दर्शन घेतलं..आई आणि बाबांनी स्वराच लग्न लवकरात लवकर जमू दे अशी देवीला प्रार्थना केली....देवाचं सगळं काही करून ते तिघे घरी परतले..सगळ्यांची जेवण आटोपली आणि आई बाबा विश्रांती घेण्यासाठी रूममध्ये गेले..स्वरा जरा पाय मोकळे करायला थोडा वेळ गच्चीवर गेली..

 रात्रीपासून तिने मोबाईल जास्त पाहिला नव्हता..त्यात गावी network problem मुळे range जात येत होती..आता जरा निवांत वेळ मिळाला तर तिने पाहिलं की बऱ्याच notifications आल्या होत्या...

   

  तिच्या facebook च्या messenger वर एका unknown व्यक्तीचा 2 दिवसांपूर्वी तो msg आला होता

तो - Hello

स्वरा - hi, do u know me??

तो - i saw ur profile on matrimonial site...Like it. Want to get in touch wid u...

 Msg होता अभिमन्यू परांजपेचा..गोरा रंग, उंच बांधा, workout करून कमावलेली बॉडी,clean shave look, उच्चशिक्षित (मास्टर्स) अंबरनाथ येथे नोकरी आणि कुटुंब पुण्यात..

 Msg वाचून स्वराने त्याचा profile नंबर विचारून घेतला..आणि लगेच site वर check केलं.

'कसला भारी दिसतोय..', स्वराच reaction...Love at first sight...नुसतं ऐकलं होतं तिने आज प्रत्यक्ष अनुभवत होती..तिला तो खूप आवडला..शिवाय शिक्षण, family background या गोष्टी देखील तिच्या अपेक्षेप्रमाणे होत्या..आई बाबांना लगेच तिने अभिमन्यूबद्दल सांगितलं..बाबांनी देखील सर्व माहिती वाचली..त्यांना पण तो आवडला..स्वराने बाबांना कोणाशी बोलू दिल नाही कारण मागच्या वेळेचा त्या बाईचा अनुभव होता म्हणून तिने स्वतःच त्याच्याशी बोलायचे ठरवले...दोघांनी नंबर exchange केले...3 दिवस ते दोघे फक्त chatting करत होते...

    

चौथ्या दिवशी सकाळी त्यांचं जास्त बोलणं नाही झालं...प्रधान कुटुंब गावावरून मुंबईला जायला निघाले..स्वराने अभिला तसे सांगितले की ते मुंबईला जायला निघालेत..सकाळी 6 ची train होती..लवकर उठून सगळे निघाले..स्टेशनवर train लागलीच होती..आपली बोगी शोधून प्रधान कुटुंब आत जाऊन बसले..सकाळी लवकर उठल्यामुळे train सुरू झाल्यावर स्वराचा डोळा लागला...काही वेळाने एका स्टेशनवर गाडी थांबली...Train च्या काळ्या काचांमुळे तिला कळलं नाही कोणतं स्टेशन आलंय..स्वराला जाग आली...डोळे चोळत तिने सहज मोबाईल पाहिला तर अभिचा msg आलेला...

अभि -कुठे आहेस

स्वरा - train मध्ये आहे...आता थांबली आहे train एका स्टेशनला

अभि - कोणतं स्टेशन??

स्वरा - (तिने बाबांना विचारलं )कर्जत

अभि - मी पण त्याच स्टेशनला आहे.. तू कोणत्या बोगीमध्ये आहे..

स्वरा खाडकन जागी झाली..कोणत्या platform ला train आहे.. बोगी कोणती सगळं सांगितलं..योगायोगाने अभि त्याच ठिकाणी उभा होता जिथे त्यांची train थांबली होती..

स्वरा खूप excite झाली होती..ती पटकन उठली..कपडे आणि केस नीट केले...आई बाबांना सांगितलं की अभि याच स्टेशनवर उभा आहे..त्याला भेटायच्या ओढीने धावतच trainchya दाराजवळ गेले....platform वरच्या त्या गर्दीत ती त्याला आतुरतेने शोधत होती आणि तो दिसला..निळ्या रंगाचे tshirt, black jeans ,पाठीवर अडकवलेली बॅग, clean shave look आणि चेहऱ्यावर हलकीशी smile..स्वरा तर बघतच बसली..तो जसजसा जवळ येत होता तिच्या हृदयाचे ठोके जलद गतीने होऊ लागले...सगळं जग slow motion मध्ये चाललंय अस वाटत होतं..

अभिमन्यूची अवस्था काही वेगळी नव्हती...

उसकी एक नजरने क्या जादू कर दिया

पलभरमे ही मुझे उसका दिवाना कर दिया

असच काहीस झालं होतं अभिमन्यूच जेव्हा पहिल्यांदा त्याने स्वराला पाहिलं..दिलवाले दुलहानिया ले जाएंगे मधला सिन आठवला..पण इथे उलट होत..स्वरा राज च्या जागी आणि तो सिमरनच्या जागी..

त्याला वाटत होतं आता ट्रेन सुटेल आणि स्वरा मला हात देईल तसा मी धावत जाऊन स्वराचा हात पकडेन..स्वरा उभी असलेल्या बोगीजवळ जाईपर्यंत अभिमन्यूने तर एक movie सीनच मनात तयार केला..तो बोगीजवळ आला आणि तिला पाहताच त्याची बोलती बंद झाली..इतक्या दिवसात msg वरच दोघाचं बोलणं झालं होतं..काहीही पूर्वतयारी नसताना दोघे अचानक भेटल्यामुळे त्याला काही सुचत नव्हते..तसा मूलतः तो लाजरा..स्वरा मात्र बिनधास्तपणे त्याच्याशी बोलत होती.ते बोलत असतानाच स्वराचे आई बाबा बाहेर आले तिने अभिमन्यूशी त्यांची ओळख करून दिली..थोडक्यात बोलणं झाल्यावर train ने निघण्याचा इशारा दिला..दोघांनीही मनात नसताना एकमेकांना निरोप दिला...

त्याने लगेच घरी आज घडलेल्या सुखद भेटीबद्दल कळवले..आणि तो घरी जायला निघाला..प्रवासात सतत तो स्वराचाच विचार करत होता..तिचा हसरा चेहरा त्याच्या डोळ्यांसमोरून जात नव्हता...

तेरी सादगी पे तो मर मिटे है हम

वरना जमानेमे हुस्नकी कमी नही

दुसऱ्या दिवशी स्वराच्या बाबांना अभिच्या बाबांनी कॉल करून 2 दिवसांनी घरी लग्नाची बोलणी करायला येतो असे कळवले..आई बाबा खूप खुश होते...मनासारखा जोडीदार मिळाला म्हणून स्वरा आणि अभिला तर आकाश ठेंगणे वाटत होते.

2 दिवसांनी अभि आणि त्याचे कुटुंब प्रधानांच्या घरी आले..स्वराने हलक्या गुलाबी रंगाची साडी नेसली होती..साधासा मेकअप, हातात दोन बांगड्या आणि कानात डूल..त्या साध्या रूपातील तिचं सौंदर्य अभि बघतच बसला..त्याच्या आईची नजर त्याच्याकडे गेली तो आल्यापासून तिलाच पाहत होता..बोलणी झाल्यावर लगेचच पुढच्या आठवड्यात साखरपुडा करण्याचे ठरले आणि 6 महिन्यांनी लग्न करायचे ठरले..आई, बाबा आणि स्वरा तयारीला लागल्या...

बघता बघता साखरपुड्याचा दिवस उजाडला...संध्याकाळचा मुहूर्त होता..परांजपे कुटुंब आणि त्यांचे नातेवाईक पुण्यावरून 11 वाजता निघाले..स्वराच्या घरी पाहुणे मंडळी येऊ लागली होती...तिच्या मावस बहिणींनी तिला छान तयार केले..मरून कलरची साडी,केसांची वेणी,गळ्यात एक नाजूकसा नेकलेस, कानात मॅचिंग छोटे कानातले, चांदण्यांसारखी चमकणारी टिकली, मेहंदी लावलेल्या हातात दोन दोन बांगड्या आणि हलकी लिपस्टिक... या रूपात तीच सौंदर्य उठून दिसत होतं...

मुहूर्ताची वेळ जवळ येत होती..घरातली मंडळी हॉलवर जायला निघाली..गुरुजी साखरपुड्याची तयारी करत असतानाच परांजपे आणि नातेवाईक आले..अभिच्या नजरा स्वराला शोधत होत्या...ती रूममध्ये बसली होती...तो ही change करायला दुसऱ्या रूममध्ये गेला..थोड्या वेळाने गुरुजींनी दोघांना बोलावले..दोघांचे आई बाबा समोरासमोर बसले...स्वराला पाहून अभिची विकेटच पडली..इतकी सुंदर आजपर्यंत ती कधीच दिसली नव्हती..त्याची नजरच हटत नव्हती तिच्यावरून गुरुजी काय बोलत आहेत याकडेही त्याचे लक्ष नव्हते...अभिच्या आईने तिच्यासाठी साडी आणि इतर वस्तू आणल्या त्या दिल्या आणि साडी बदलून यायला सांगितले..

दोन्हीकडची पाहुणे मंडळी येऊ लागली होती..अगदी मोजक्याच लोकांना बोलावले होते...

काही वेळाने स्वराच्या बहिणी स्वराला घेऊन आल्या..

अभि तर तिच्याकडे बघतच बसला...पाहुणे ही बघत बसले इतकी ती गोड दिसत होती...

हिरव्या रंगाची काठापदराची साडी, केसांच्या वेणीवर माळलेले खांद्यावर सोडलेले मोगऱ्याचे गजरे,कपाळावर चंद्रकोर, नाकात सोन्याची नथ, हलका मेकअप,गळयात पारंपरिक ठुशी आणि बोरमाळ,कानात सोन्याचे झुमके, हातात हिरवा चुडा आणि पायात पैंजण..

तिच्या या रूपाने अभि घायाळ झाला..नव्या नवरीच तेज आतापासूनच तिच्या चेहऱ्यावर झळकत होतं..आताच्या आता स्वराला आपल्या मिठीत घ्यावं अस अभिला वाटत होतं..स्वराने हे बरोबर हेरलं..

आता एकमेकांना अंगठी घालण्याचा विधी होणार होता..दोघे उभे राहिले...आयुष्यभर साथ देण्याचे वचन घेतलेला तो हात कधीच सोडू नये असे वाटत होते..अंगठी घालताच दोघांवर फुलांचा वर्षाव झाला...दोघेही खूप आनंदात होते...

अंगठीचा कार्यक्रम झाल्यावर स्वराच लक्ष सहजच जमलेल्या लोकांकडे गेलं..आणि समोर पाहते तो काय ..रोहित राजाध्यक्ष..

त्याला पाहून तिच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले.. हा इथे काय करतोय....

रोहित अभिला शुभेच्छा द्यायला आला तेव्हा त्याने स्वराशी त्याची ओळख करून दिली..

"स्वरा, हा रोहित..रोहित राजाध्यक्ष... माझ्या आत्याचा मुलगा...नात्याने आम्ही भाऊ असलो तरी माझा जिगरी दोस्त आहे...आमचं एकमेकांशिवाय पान हालत नाही...आणि आज बघ...साखरपुडा झाला आणि आता उगवलाय", अभि जरा नाराजीच्या सुरात म्हणाला...

"काय यार, अरे आज working day होता...half day घेऊन आलो..आणि traffic किती होत..म्हणून late झाला...लग्नाच्या दिवशी बघ.तुझ्या घरीच येणार आहे राहायला...मग तर झालं..", रोहित म्हणाला.

रोहित आणि त्याची आई जेवत असताना स्वराच्या बाबांचे काका जे रोहितच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये रहात होते ते येऊन त्याच्या बाजूला बसले..

"खरच खूप लकी आहे अभि..स्वरासारखी मुलगी त्याला मिळाली..माझं ऐकलं असत तर आज स्वरा आणि तुझा साखरपुडा होत असत..हे ऐकून रोहित आश्चर्याने त्यांच्याकडे बघू लागला..

" म्हणजे मला नाही कळलं..", रोहित म्हणाला

"स्वराच स्थळ आधी तुला आलं होतं पण तुझ्या आईने ते नाकारलं. जयवंतने मला सांगितले त्यांचं काय बोलणं झालं ते...मी तुझ्या आईशी बोललो स्वराबद्दल...पण त्यांनी माझंही ऐकून घेतलं नाही..त्या तर तिचा फोटोही पाहायला तयार नव्हत्या..", काका रोहितला म्हणाले..

"आई हे खरं आहे का..",रोहित रागावून म्हणाला..

"हो त्यांनी कॉल केलेला मला.. मी आपल्या बेसिक अटी सांगितल्या आणि पुढे काहीच बोलण नाही झालं.", रोहितची आई थोडीशी चाचरत म्हणाली...

"अगं आई तिचा फोटो तरी बघायचा..न बघताच तिला नकार दिलास.नेमका मी घरी नव्हतो..निदान फोटो तरी मागवून घेतला असता.."., रोहित चिडून बोलत होता..

स्वराला नकार दिल्याचा पश्चाताप आता रोहितच्या आईला होत होता..पण त्यांनी तस भासवले नाही..

"आपण तुझ्यासाठी हिच्यापेक्षा चांगली मुलगी शोधू", अस म्हणत त्यांनी रोहितला शांत केलं..

स्वराला गमवण्याचं खापर रोहित सतत आईवर फोडत राहिला..

स्वरा आणि अभिच नात दिवसेंदिवस खुलत होत..एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते...रोज नाही पण आठवड्यातून एकदा दोघे भेटायचे..कधी गार्डन , कधी चौपाटीवर फिरायला जायचे..फिरताना नकळत झालेल्या स्पर्शाने दोघाचं शरीर शहारून जायचं..

"स्वरा खरं सांगू साखरपुड्यानंतर मला वाटत होते आताच्या आता तुला घेऊन जावं..त्या दिवशी इतकी सुंदर दिसत होतीस तू तुझी तारीफ करायला शब्दच नाहीयेत माझ्याकडे..संपूर्ण प्रवासात मला तुझा चेहरा आठवत होता....माझ्या संपूर्ण कुटुंबाला तू आवडलीस..तुझ्यासारखीच सहचारिणी हवी होती मला..आणि मला खात्री आहे तू आयुष्यभर अशीच राहशील.." अभि स्वराचा हात हातात घेऊन म्हणाला..

"तू साथ देशील तर मी देखील तुला काहीच कमी पडू देणार नाही..तुझं प्रेम कधी कमी होऊ देऊ नकोस...मी खूप ऐकलय लग्नानंतर पुरुष बदलतात..मला खात्री आहे की तू बदलणार नाहीस...जसा आज माझ्यावर प्रेम करतोयस तसाच आयुष्यभर करशील..." स्वरा म्हणाली...

दोघांनी एकमेकांना वचन दिलं आणि एकमेकांच्या मिठीत विसावले...

2 महिन्यांनी रोहितच लग्न ठरल्याची बातमी आली..

अभिच्या बाबांनी स्वराला रोहितच्या साखरपुड्याला येण्याचं निमंत्रण दिल..जेणेकरून सर्व नातेवाईकांशी ओळख होईल..अभि आणि स्वराने एकत्र भेटून मग साखरपुड्याला जायचे ठरवले..

तिथे पोहोचल्यावर अभिच्या भावंडांनी होणाऱ्या वहिनीला गराडा घातला..आणि खेचत आपल्यासोबत घेऊन गेले..प्रत्येकाने आपापली ओळख करून दिली.त्यांना आपली होणारी वहिनी खूप आवडली..रोहितच लक्ष स्वराकडून हटत नव्हतं..त्याचा साखरपुडा होत असला तरी त्याच्या मनात स्वराने घर केलं होतं...

रोहित आणि गार्गीचा साखरपुडा पार पडला... त्यांच्या लग्नाचा मुहूर्त 2 महिन्यानंतरचा निघाला...

गार्गी देशपांडे... उच्चशिक्षित,कॉन्व्हेंटमधलं शिक्षण, भरपूर पगाराची नोकरी म्हणजे अगदी जशी रोहितच्या आईची होणाऱ्या सुनेकडून अपेक्षा होती तशी...

2 महिन्यांनी दोघांचे लग्न झाले..

स्वरा आणि अभि देखील त्यांच्या लग्नाच्या खरेदीत आणि इतर तयारीत व्यस्त होते..

दिवस भुर्रकन निघून गेले आणि लग्नाचा दिवस उजाडला..

दोन्ही घरी मांडव सजले..दोन शहरे आता एकमेकांशी नात जोडायला सज्ज झाली होती..पुण्याहून मंडळी पहाटेच निघाली...इथे मुंबईत हळूहळू मंडळी हॉलवर जमू लागली होती..पुण्यातली मंडळी हॉलवर आली तेव्हा वधुकडचा विधी सुरू होता..स्वराच्या मामीने अभिला ओवाळून त्याच स्वागत केलं..थोड्या वेळाने वराकडच्या विधींना सुरुवात झाली..स्वरा पुढची तयारी करायला गेली...

आदल्या दिवशी दोन्ही घरी हळदीचा कार्यक्रम पार पडला होता पण दोघांना एकत्रित हळद लावण्यासाठी दोघे आवरून आले..पिवळ्या रंगाची साडी नेसलेल्या गोऱ्यापान स्वराची कांती हळदीने अजूनच उजळून निघाली होती..दोघांच्या कुटुंबातील मंडळीने स्वरा आणि अभिला हळदकुंकू लावून हळद लावून घेतली..त्यानंतर पुढच्या विधीसाठी दोघे आपआपल्या रूममध्ये निघून गेले..

मंगलाष्टक आणि सनाईच्या मधुर सुरांनी सभागृह भरून गेला होता..एव्हाना सगळी मंडळी आली होती.. हॉलमध्ये आलेल्या सगळ्यांना अक्षता वाटल्या गेल्या..स्वराचे बाबा मानाने होणाऱ्या जावयाला मांडवात घेऊन आले.अभिचे डोळे स्वराला पाहण्यासाठी आतुर झाले होते..

गुरुजींनी," वधूच्या मामांनी वधू ला आणा, असे म्हटल्यावर हलक्या पावलांनी स्वरा स्टेज वर आली..

कपाळावर चंद्रकोर, केसांचा खोपा, जांभळ्या रंगाची आणि सोनेरी काठ असलेली नववरी साडी, गळ्यात पारंपरिक दागिने, नाकात नथ,बाजूबंद, हातभर हिरवा चुडा आणि सोन्याचे तोडे..मुंडावळ्या बांधलेला तिचा चेहरा अधिकच खुलून दिसत होता..

दृष्ट लागण्याजोगी दिसत होती आज स्वरा..

अंतरपाटा आडून स्वराची वाट पाहणाऱ्या अभिच्या चेहऱ्यावर स्वराला पाहण्यासाठीची आतुरता पाहून त्याच्या बहिणी त्याला चिडवू लागल्या.

मंगलवाद्यांच्या कडकडाटात,डोक्यावर अक्षता पडत अंतरपाट दूर होताच दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले..लग्न लागलं..स्वराच्या आई बाबांच्या डोळ्यात पाणी आलं.. कन्यादानाच्या वेळी मात्र एवढा वेळ बांधलेला धीर सुटला..स्वराला त्यांची अवस्था पाहून भरून आलं..

म्हणतात की कन्यादान करणं हे जगातलं सगळ्यांत मोठं पुण्य असतं...हे पुण्य मिळवण्यासाठी प्रत्येक आई वडिलांना आपल्या पोटच्या गोळ्याला दुसऱ्याच्या हवाली करावं लागतं..किती कठीण आहे हे पुण्य कमावणे.

आणि मग तो नको असलेला क्षण आला ...पाठवणी..सभागृहातून बाहेर पडतानाच स्वराचा गळा दाटून आला..मोठ्यांचा आशीर्वाद घेत आणि लहानांची गळाभेट घेत ओल्या डोळ्यांनी स्वराने सगळयांचा निरोप घेतला..

अशाप्रकारे स्वराचा नवीन आयुष्याच्या दिशेने प्रवास सुरु झाला..

काही तासांनंतर सर्व मंडळी पुण्याला येऊन पोहोचली.. नवीन सुनेचे जंगी स्वागत झाले..तांदळाचे माप ओलांडून स्वरा आत आली.. सगळी मंडळी दिवसभर दमली होती आणि दुसऱ्या दिवशीच्या तयारीसाठी लवकर उठावे लागणार म्हणून पटापट झोपून गेली...

सकाळी हळद उतरवण्याचा कार्यक्रम झाल्यावर नवीन जोडपं कुलदेवीच्या दर्शनासाठी निघाले..अभिची बहीण आणि आजी सोबत होत्या..

त्यादिवशी जवळच्या नातेवाईकांनी सर्वांना जेवायला बोलवले...नव्या जोडप्याला मात्र घरीच थांबायला लावले...घरातली सर्व मंडळी जेवायला गेली...आता घरात ही दोघे..दिवसभर फिरल्यामुळे स्वरा थकली होती ...तिला कपडे बदलायचे होते..पण अभि रूममध्ये होता..त्याला रूममधून बाहेर जायला कस सांगायचं म्हणून ती एक एक दागिने काढू लागली म्हणजे त्याला कळेल की तिला कपडे बदलायचे आहे आणि तो स्वतःहून बाहेर जाईल..दागिने काढून ती टेबलवर ठेऊ लागली तस तिच्या एका हाताला धरून त्याने जवळ ओढलं..तिच्या कमरेत हात घालून घट्ट पकडून ठेवलं..तिचा स्वतःला सोडवायचा अयशस्वी प्रयत्न चालू होता..तशी त्याने मिठी अजूनच घट्ट केली...स्वराला त्या मिठीतून सुटू नये असेच वाटत होते..तिने लाजून त्याच्याकडे पाहिलं..नजरानजर होताच दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले.त्यांच्या हृदयाची धडधड इतकी जलद होते की ती एकमेकांना जाणवत होती..अभि स्वराच्या ओठांजवळ हळूच ओठ नेताच स्वराने लाजून डोळे मिटले. चुंबनासाठी आसुसलेले त्यांचे ओठ जवळ येतच असतात इतक्यात दाराची बेल वाजली.

आता कोण कडमडल ..अभि मनात चरफडत म्हणाला..

स्वराला हसू येऊ लागलं तिने पटकन दार उघडलं.

नातेवाईकांनी दोघांसाठी जेवण पाठवलं होत..जेवण आल्यावर दोघांनी जेऊन घेतलं..

दुसऱ्या दिवशी लग्नाची पूजा, गोंधळ आणि संध्याकाळी reception असा कार्यक्रम ठरला होता..सकाळी सगळे लवकरच उठले..अभिची आई आणि काकू सगळ्यांच्या नाश्ताच्या तयारीला लागल्या..पटापट सगळ्यांनी अंघोळया आणि नाश्ता आवरून घेतलं..स्वरा आणि अभि सुद्धा आवरून बसले..काही वेळातच गुरुजी आले..यथासांग पूजा झाली..गोंधळ झाला..लागोलाग जेवणाच्या पंगती उठल्या..प्रसन्न वातावरणात पूजा आणि सर्व विधी पार पडल्या..सगळे खूप आनंदात होते..लहान मंडळींनी आपल्या लाडक्या वहिनीला घेरून मुद्दाम अभिपासून दूर नेलं..वेगवेगळ्या पोस देत सगळ्यांनी तिच्यासोबत फोटो काढले..अभि मनातून खूप खुश होता..आपल्या लोकांसोबत मिळून मिसळून राहणारी, सगळयांना आपलसं करणारी अशीच बायको त्याला हवी होती..त्याने मनोमन देवाचे आभार मानले..

संध्याकाळी reception चा कार्यक्रम ही चांगल्या पध्द्तीने पार पडला..स्वराचे आई बाबा मामा आणि आजी कार्यक्रम झाल्यावर आपल्या लाडक्या लेकीचा निरोप घेत घरी जायला निघाले..

दुसऱ्याच दिवशी स्वरा आणि अभि हनिमूनसाठी मनालीला गेले..अभिने आधीच सर्व booking करून ठेवले होते..दोघांनी एकत्र खूप enjoy केलं..मनसोक्त फिरले..फोटो काढले...त्या काळात ती दोघे अधीकच जवळ आली..दोघांची मने तर आधीच जुळली होती आता त्यासोबत शरीरही जुळले..

नव्या संसाराची सुरुवात करण्याची स्वप्न उराशी बाळगून ते घरी परतले..

दुसऱ्या दिवसापासून अभिने ऑफिस पुन्हा जॉईन केले...स्वरा मात्र घरीच होती..सासुसोबत काम शिकून घेत असे...पण नुसते घरी बसून राहणे तिला पटत नसे..म्हणून तिने नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केली...तिला परवानगी मिळाली ...काही दिवसातच तिला नोकरी मिळाली..

साधारण 2 वर्षांनंतर स्वरा आणि अभिच्या संसाराच्या वेलीवर एक सुंदरसे फूल उमलले...गरोदरपणाच्या काही महिन्यांपर्यंत स्वरा नोकरीला जात असे..पण नंतर तिला बाहेर पडणे अडचणीचे वाटू लागले..शेवटी तिने नोकरी सोडली..7 व्या महिन्यात ती आईकडे गेली..आई बाबांनी तीच डोहाळे जेवण फार थाटामाटात केलं..2 महिन्यांनंतर बाळाचे आगमन झाले... बाळ 3 महिन्याचे झाले तेव्हा त्याच बारसंही खूप छान केलं..बाळाचं नाव ठेवलं 'अथर्व'...

बारसं झाल्यावर स्वरा बाळाला घेऊन पुण्याला आली.. बाळाच्या संगोपनातच तिचा संपूर्ण दिवस जात असे..

बघता बघता बाळ 2 वर्षांचे झाले..

एके दिवशी स्वराच्या सासूची तब्येत बरी नव्हती म्हणून त्या आणि स्वराचे सासरे डॉक्टरांकडे गेले होते..त्या दिवशी स्वरा घरातली सर्व काम आटोपून अथर्वला झोपवत होती..सकाळपासून खूप खेळल्यामुळे अथर्व पडल्या पडल्या झोपून गेला..मग स्वराने पाठ टेकली..तेवढ्यात दाराची बेल वाजली..आता दुपारच्या वेळेत कोण आलं म्हणून जराशी नाराजीनेच तिने दार उघडलं..समोर रोहित उभा..

"अरे रोहित, ये ना आत..", स्वराने त्याला आत बसायला सांगून पाणी घ्यायला आत गेली..

स्वरा पाणी घेऊन आली..

"मामा आणि मामी झोपलेत का..", रोहितने विचारलं..

"आई आणि पप्पा दवाखान्यात गेलेत...आईंची appointment होती आज..", स्वरा म्हणाली..

"आणि अथर्व", रोहित

"हे काय आताच झोपला..सकाळपासून खूप मस्ती करत होता ..लगेच झोपला..बाकी तुझं कस काय चाललंय..तुझा जॉब कसा चालू आहे", स्वरा

"आहे इथेच आहे.. ठीक चालू आहे सर्व", रोहित

"आणि गार्गी ..ती कुठेय..मुंबईला जातोस का..", स्वरा

"नाही ग..हल्ली इच्छा होत नाही..", रोहित उदास होऊन बोलत होता..

1 वर्षांपूर्वी...

रोहित आणि गार्गीच लग्न झाल्यावर काही दिवस आनंदात गेले..पण हळूहळू गार्गीचा स्वभाव रोहितला आणि त्याच्या घरच्यांना लक्षात येऊ लागला..एकुलती एक आणि लाडात वाढल्यामुळे तिला घरातील कामाची सवय नव्हती..सकाळी उठून ऑफिसला गेल्यामुळे आणि घरी उशिरा आल्यामुळे घरातल्या कामात तिचा हातभार नसायचा..रोहितची आई सगळी काम करायची..त्यामुळे त्या आजारी पडल्या..रोहितने यासाठी गार्गीला जबाबदार ठरवलं..तो शनिवारी रविवार मुंबईला येत असे..त्यातही त्यांची भांडणे होऊ लागली..यावर उपाय म्हणून आईला मदतीला बाई लावायचे ठरले..तरीही सासू सुनेमध्ये भांडण सुरूच असायची...या भांडणाला कंटाळून शेवटी रोहितने मुंबईला जाणेच सोडून दिले..कधी आईचा कॉल आला तर तो तिला भेटायला जायचा...गार्गी आणि रोहितमध्ये सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींवरून खटके उडू लागले..आणि मग एके दिवशी ती घर सोडून आईकडे निघून गेली..

वर्तमान....

"तू नको टेन्शन घेऊस..होईल सगळं नीट..लग्न होऊन जोडलेले ऋणानुबंध असे सहजासहजी तुटत नाहीत..गार्गी समजूतदार आहे ..मला खात्री आहे ती नक्की परत येईल..", स्वरा म्हणाली...

रोहित स्वराकडे एकटक बघत तिचे बोलणे ऐकत होता..तिच्या बोलण्यात जणू गुंग झाला होता..तिचे मधुर हास्य, त्याला पाहणारे तिचे डोळे तो असा काही हरवला की स्वरा काय बोलतेय याकडे त्याचे लक्षच नव्हते..

"किती समजूतदार आहे ही..mature आहे..ही का नाही आहे माझ्या आयुष्यात...का माझी नाही झाली ही...खरं तर माझंच नशीब खराब..त्या ट्रिपला गेलो काय आणि तिच्या बाबांनी कॉल केला काय...आणि आईने पण हिला न बघताच कस नापसंत केलं..सगळी आईचीच चूक आहे..मी नाही तर स्वतः तरी पाहायची हिला..पाहिलं असत तर आज ही माझी असती...", रोहित विचार करत होता..

"अरे कुठे हरवलायस..कधी पासून मी एकटीच बडबड करतेय..तुझं लक्ष कुठेय..", स्वरा म्हणाली

"काही नाही..", रोहित म्हणाला..

"नको जास्त विचार करुस..थांब मी तुझ्यासाठी चहा बनवून आणते..अस बोलून ती किचनमध्ये गेली..

तिने चहाच आंदण ठेवलं..

काय अवस्था होते एखाद्याची..गार्गी पण ना..छोट्या छोट्या गोष्टींवरून काय भांडायचं.. पण टाळी एका हाताने तर वाजत नाही ना..दोघांची चूक असेल..विचार करत असतानाच चहा उकळून वर आला तिने दूध ओतले..कप घ्यायला वळली तेव्हा मागे रोहित उभा होता..अचानक त्याला समोर पाहून ती थबकली..

"झालाय चहा मी घेऊन येते..तू बस बाहेर..", असे बोलून तिने चहा कपमध्ये गाळला..

ती कप उचलणार इतक्यात रोहितने स्वराला मागून घट्ट मिठी मारली..हे काय होतंय हे कळायच्या अगोदर रोहितने मिठी अजूनच घट्ट केली..

"सोड मला रोहित तू हे काय करतोयस..", अस बोलून महत्प्रयासाने तिने आपली सुटका करून घेतली..आणि त्याच्या कानशिलात लगावली..

"रोहित लाज वाटत नाही तुला..हे काय करत होतास", स्वरा चिडून बोलत होती..

"मला माफ कर स्वरा..माझा ताबा नाही राहिला स्वतःवर...I am extremely sorry..काय करू ग..पश्चाताप होतोय मला.. सगळं काही व्यवस्थित झालं असत तर आज तू माझ्या आयुष्यात असतीस..हा विचार माझं मन खात असत", रोहित म्हणाला..

"आताच्या आता चालता हो इथून...मला तुझं तोंड ही बघायची इच्छा नाहीये ", स्वरा रागावून म्हणाली...

"स्वरा, याच चेहऱ्यावर तर भुलली होतीस ना तू..आणि आता इतका द्वेष करतेस", रोहित म्हणाला..

"तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना तेव्हा माझ लग्न नव्हतं झालं..आणि तुझ्यावर भुलली वगैरे नव्हते मी...फक्त तुला पसंत केलेलं..आणि एका अर्थी बरच झालं..तू माझ्या आयुष्यात नाही आलास..तुझ्या आईने अपमान केला माझ्या वडिलांचा...pls आता तू जा इथून मला तुझ्याशी बोलायचं नाहीये ", स्वरा चिडून बोलली...

स्वरा रागाने लालबुंद झाली होती..त्याही परिस्थितीत रोहित तिच्याकडेच पाहत होता..याचा तिला जास्त राग येत होता..तिने अक्षरशः त्याला हाताला धरून घराबाहेर काढलं..आणि दार लावून घेतलं..रोहित तिला आवाज देत होता..

"स्वरा pls माझ जरा ऐकून घे...माझी चूक झाली स्वरा.. मी अस नव्हतं करायला हवं होत..मला माफ कर pls", रोहित म्हणाला..

" तू जा इथून मला तुझं काही एक ऐकायचं नाहीये..", स्वरा

नाईलाजाने रोहित तिथून निघाला..घरी येऊन बेडवर आडवा झाला..त्याला स्वतःचीच लाज वाटत होती...हे काय करून बसलो मी.. काय बोलत होतो.. स्वरा काय विचार करत असेल माझ्याबद्दल..

स्वरा..काही केल्या तीच सौंदर्य त्याच्या डोळ्यासमोरून जात नव्हत..तिच्या शरीराचा गंध, तिचा उबदार स्पर्श आठवून तो वेडापिसा झाला होता..त्याला कळत होतं ती आपल्या भावाची बायको आहे..पण शेवटी तो पुरुषच आणि तिने अस झिडकारणे त्याला पचल नाही..

रोहितच्या अश्या अनपेक्षित वागण्याने स्वरा घाबरली होती..इतक्या वर्षांनंतर त्याला ही काय थेर सुचत आहेत..गार्गीला सांगावं का.. नको...आधीच त्यांचं नात डळमळीत झालंय.. त्यात याची भर नको...आणि अभिला सांगावं तर तो विश्वास ठेवेल का माझ्यावर..की माझा राग करेल..देवा काय करू मी... काहीच कळत नाहीये..असा विचार करत ती डोकं पकडून बसली होती..इतक्यात दाराची बेल वाजली..दार उघडायला तिचा धीर होत नव्हता..तिने की होल मधून पाहिले तिचे सासू सासरे आले होते...तिने पटकन चेहऱ्यावरचा घाम पुसला..एक लांब श्वास घेत , काहीच घडलं नाही असं दाखवत दार उघडलं..

त्या दिवशी तिची मनस्थिती ठीक नव्हती.. विचार करून करून डोकं जड झालं..जे झालं ते विसरून जाण्याचा आणि याबाबत कोणाला काही न सांगण्याचा तिने निर्णय घेतला..

काही दिवसांनी स्वरा स्वयंपाक करायला लागली तेव्हा स्वराच्या सासूने तिला 2-4 पोळ्या जास्त करायला सांगितल्या ..

"कोणी येणार आहे का", स्वराने विचारले..

" अग रोहित येतोय जेवायला..तो म्हणत होता , मामी खूप दिवस झाले तुझ्या हातच जेवलो नाही..म्हटलं ये कधीही..", सासू म्हणाली..

रोहितच नाव ऐकताच स्वराच्या छातीत धस्स झालं..त्या दिवशीचा प्रसंग एकदम डोळ्यांसमोर आला..तिला काही सुचत नव्हते..त्याच स्थितीत तिने स्वयंपाक आवरला..

थोड्या वेळाने दाराची बेल वाजली..सासूने दार उघडलं..रोहित आला..सासूने स्वराला पाणी आणायला सांगितले..इच्छा नसतानाही तिला त्याच्या समोर जावे लागले..स्वराला पाहून रोहितचा चेहरा खुलला..पाणी पिताना त्याची नजर स्वराच्या संपूर्ण शरीरावर फिरत होती..त्याच्या नजरेतील वासना स्वराला अस्वस्थ करत होती..स्वरा किचनमध्ये गेली..तशी रोहित पण ग्लास ठेवायच्या निमित्ताने आत गेला..रोहितला पाहून स्वराला चीड आली.रोहित मात्र स्वराकडे लांबूनच पाहत होता..त्याची ती किळसवाणी नजर नकोशी वाटत होती..हात न लावता फक्त नजरेने केलेला बलात्कार काय असतो ते ती अनुभवत होती..तिला वाटत होतं, आताच्या आता रोहितला घराबाहेर काढावं..पण सासू घरात होती म्हणून रोहित काही करणार नाही याची खात्री तिला होती...

स्वरा रोहितला जेवण वाढत असताना स्वराला स्पर्श करण्याचा रोहितचा प्रयत्न चालू होता..पण स्वराने त्याला एकही संधी दिली नाही..त्याला जेवण वाढून अथर्व रडतोय याचे निमित्त करून ती रूममध्ये गेली..

जेवण झाल्यावर तो तिथेच हॉलमध्ये बसून राहिला..स्वराच्या सासू झोपायला त्यांच्या रूममध्ये गेल्या ..आणि स्वरा पण अथर्व ला झोपवून थोडं आराम करत होती..तेवढ्यात तिच्या मोबाईल वर msg आला..

"जेवण छान झालं होतं",

रोहितचा msg बघून तिने न बघितल्यासारखं केलं..

"आज तू खूप छान दिसत होतीस" पुन्हा त्याचा msg..

शेवटी कंटाळून स्वराने मोबाईल बंद करून ठेवला..

थोड्या वेळाने तिच्या शरीरावर हाताचा स्पर्श जाणवला..ती खडबडून जागी झाली..तिला भास झाला होता...ती संपूर्ण घामाने डबडबली होती..पाणी पिण्यासाठी उठली आणि किचनमध्ये गेली..पाणी पिताना तिला सासूचा आणि रोहितच्या बोलण्याचा आवाज आला..रोहित अजून घरीच होता..सासूने स्वराला आवाज देऊन बोलावलं..

"तुझा फोन बंद आहे का..अभि कधीपासून कॉल करतोय तुला..बघ काय म्हणतोय..आणि चहा पण ठेव..रोहित, आता येईलच अभि..", सासू म्हणाली..

स्वराने अभिला कॉल केला..त्याने सहजच कॉल केला होता..अभिशी बोलत बोलतच तिने चहा ठेवला..थोडा वेळ बोलून फोन ठेवला..तिघांसाठी चहा गाळला आणि बाहेर घेऊन आली..स्वतःचा कप तिथेच ठेऊन दोघांना चहा देऊन आत येऊन चहा पित बसली..

तासाभरात अभि आला..स्वराला हायस वाटलं..अभि फ्रेश होऊन रोहितशी गप्पा मारत बसला.. स्वराने त्याला चहा नेऊन दिला..रात्रीचे जेवण ही रोहितने तिथेच केले..रोहित कधी जातोय या विचाराने स्वरा कासावीस झाली होती..

दिवस असेच चालले होते..रोहित अधून मधून स्वराला भेटायला घरी यायचा.पण घरी स्वराची सासू असायची त्यामुळे तो काही करू शकत नव्हता..त्याच वागणं दिवसेंदिवस विक्षिप्त बनत चाललं होतं..त्याला फक्त स्वराला मिळवायचे होते..त्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकत होता..रोहित एवढा बेलगाम झाला होता की त्याला नात्यांचे सुद्धा भान नव्हते...

एकदा स्वरा जेवण बनवत असताना अभिने मागून येऊन स्वराला मिठी मारली..तेव्हा तिने मागे वळून अभिच्या कानाखाली मारली..दुसऱ्याच क्षणाला ती भानावर आली आणि आपण हे काय केलं याच तिला वाईट वाटलं..अभि मात्र झालेल्या प्रकाराने खूपच दुःखी झाला आणि रूममध्ये निघून गेला..स्वराने त्याच्या मागे जाऊन त्याची माफी मागितली..आता ती हे कसं सांगणार की त्या दिवशी रोहितने तिला मागून पकडले तसेच आज अभिने ही येऊन मिठी मारली..तिच्या डोक्यात सतत तेच विचार होते म्हणून आज तिच्याकडून अभिला कानशिलात लगावली गेली...

दुसऱ्या दिवशी अभि सकाळी उठल्यापासून स्वराशी तुटक वागत होता..नीट बोलत ही नव्हता..स्वराला कळत होते की तिच्या चुकीमुळे अभि आपल्याशी अस वागत आहे..ती सारख त्याची माफी मागत होती.पण अभि तिच्याकडे लक्ष देत नव्हता..

2 वर्षांच्या संसारात आज प्रथमच स्वरा आणि अभि मध्ये अस काही घडलं होत..आणि त्याला अप्रत्यक्षपणे कारणीभूत होता रोहित...

अभि ऑफिसला निघून गेल्यावर स्वरा खूप रडली..तिला आपल्या कृतीचा पश्चाताप होत होता..अभिच तिच्याशी न बोलणं तिला त्रास देत होत..या सगळ्याला जबाबदार रोहित होता..

एके दिवशी रोहित पुन्हा घरी आला..त्याला आलेला पाहून स्वराच्या डोक्यात तिडीक गेली..

"का आलास इकडे..का त्रास देत आहेस मला..आताच्या आता चालता हो इथून..", स्वरा रागातच बोलत होती

"कसा जाऊ मी स्वरा..तुला मिळवल्याशिवाय..त्या दिवशीचा स्पर्श अजूनही आठवतो मला..तुझा गंध आजही माझ्या श्वासात आहे..मी नाही विसरू शकत तुला", रोहित म्हणाला..

"बंद कर तुझं हे किळसवाणे बोलणे..अरे थोडीशी तरी लाज बाळग..कोणाशी आणि काय बोलतोयस याच..मला वाटलं होतं तू सुधारशील पण नाही आता मात्र हद्द झाली..अभिला तुझ्याबद्दल सांगावेच लागेल..त्या शिवाय तुझी गुर्मी उतरणार नाही.." , स्वरा रागात बोलली..

"अभिला तू सांगणार आणि तो तुझ्यावर विश्वास ठेवणार..तुझ्यापेक्षा जास्त विश्वास त्याचा माझ्यावर आहे..तो तुझ्या बोलण्याला फारस seriously घेणार नाही..तो माझा भाऊ आहे..", असे म्हणून जोरजोरात हसू लागला आणि मागे वळून पाहताच त्याच हसणे एकदम थांबले..

दारात अभि उभा होता..त्याला बघून रोहितच्या तोंडचं पाणी पळालं..अभिला पाहून स्वराने धावत जाऊन त्याला मिठी मारली..

अभिने रोहितच्या जोरात कानाखाली मारली..त्याने दोघांचं बोलणं ऐकलं होतं..

"रोहित तू असा वागशील अस वाटल नव्हतं..तुझी नजर इतकी वाईट आहे, यावर माझा विश्वास नाही बसत..आणि स्वरा तू मला नसत सांगितलंस तरी मला कळलं असत की तू कोणत्यातरी टेन्शन मध्ये आहेस..कारण तुझ्या डोळ्यातले भाव बघूनच मला तुझ्या मनाची अवस्था समजते...काही दिवसांपासूनच्या तुझ्या वागणुकीतील बदलामुळे मला कळून चुकले काही तरी problem नक्कीच आहे..

(रोहितकडे पाहून) तुझं वारंवार घरी येणं, स्वराला कॉल आणि msg करणं, तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करणं या सगळ्या गोष्टी माझ्या नजरेतून सुटल्या असतील असे वाटले का तुला..मला हे खूप आधीच कळलं होतं..पण मी हे तुला जाणवू दिल नाही कारण मला तुला red hand पकडायच होत..इतका कसा निर्लज्ज झालास..आपल्या नात्याला कलंक लावलास तू..आताच्या आता निघून जा घरातून आणि आमच्या आयुष्यातून पण.. तुझ्या या विकृत मानसिकतेमुळेच गार्गी तुला सोडून गेली असणार भांडण वगैरे हे तर वरवरचे कारण आहे..तुला समज देऊन सोडतोय मी नाहीतर पोलिसात दिल असत तुला.."

स्स्वराकडे पाहून "ज्या वेळी पहिल्यांदा रोहितने तुला स्पर्श केला तेव्हाच तू मला सांगायला हवं होतंस..काय वाटलं तुला, मी विश्वास नाही ठेवणार तुझ्यावर..अगं, नवरा बायकोच नात प्रेम आणि विश्वास या गोष्टींवर टिकून असत..तुम्ही बायका अस सगळं सहन करता म्हणून रोहित सारख्या विकृतींना चेव येतो..अत्याचार करणारा जेवढा गुन्हेगार असतो तेवढाच अत्याचार सहन करणाराही असतो..कारण त्याबद्दल कोणाकडे वाच्यता न केल्याने अत्याचाराला खतपाणी दिल्यासारखे असते..यासगळ्याचा परिणाम आपल्या नात्यावरही झाला ना.. "

स्वराने मुसमुसत म्हणाली, " बर झालं तू लवकर आलास नाहीतर या विकृताने पुन्हा संधी साधली असती.."

" मीच त्याला घरी बोलावलं होतं..एकत्र dinner चा plan केला होता आणि सांगितलं की मला उशीर होणार आहे तू घरी जाऊन बस..त्या दिवशी तू मला call केला होतास आणि मी कॉल उचलला तेव्हा तू रोहितला घरी का आलास म्हणून ओरडत होतीस आणि हा निर्लज्ज हसत होता. तेव्हा मला तुझ्या वागण्याचा संदर्भ कळला.. त्याने स्वतःहुन कबूल करावे म्हणून हे सगळं नाटक करायचं ठरवलं.."

रोहित खाली मान घालून सगळं ऐकत होता.. त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप होत होता..दोघांची हात जोडून माफी मागून निघून गेला त्याच्या आयुष्यात कधी न परतण्यासाठी..

"माझं चुकलं मी तुला सांगायला हवं होतं",अस बोलून स्वरा अभिच्या गळ्यात पडली आणि रडू लागली..

अभिच्या आश्वासक मिठीत तिला सुरक्षित वाटू लागलं..



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama