Mayur Bagul

Others

3  

Mayur Bagul

Others

ऋणानुबंध

ऋणानुबंध

2 mins
391


नमस्कार मी स्वलिखित ऋणानुबंध ह्या लेखन मालिकेतून स्वप्नील आणि स्वाती ह्या दोन पात्रांच्या मदतीने मी समाजजीवनाचे धडे, माणुसकी, विज्ञान, जग त्यांच्यातील घडामोडी संवादात्मक,चर्चा, वादविवाद, प्रेम, माणसाचं जीवन, हे सगळं काही माझ्या ऋणानुबंध ह्या लेखन मालिकेतुन तुमच्या भेटीला पोहोचवणार आहे,

ऋणानुबंध (भाग 1)

"Good morning, आई"

"अरे! उठलास का ? एवढ्या लवकर.. आज सूर्यदेव पश्चिमेला उगलेत की काय? 'बघू दे आधी बाहेर मला.

"आई काय मस्करी करतेय का माझी?"

"छे मी आणि तुझी मस्करी नाही रे बाबा, असो. ते टेबलावर्ती मी तुझे कपडे ठेवलेत, ते घे आणि अंघोळ कर बघू,"

" हो ग आई!"

" स्वाती, आग स्वाती कुठेय तू, ही मुलगी पण ना खूपच आळशी झालीये दिवसेंदिवस. ना नाष्टा, ना देवबाप्पाच दर्शन" आधी मोबाइल लागतो तिला.

"काय ग आई उगाच ओरडते माझ्यावर.. तुझा लाडका स्वप्नील बघ अजून गोधडीतच असेल, त्यालापण बोलत जा की, तो बघ आला तुझा लाडोबा" - स्वाती

"काय ग काय चुगल्या करतेय माझ्या, आई जवळ" - स्वप्नील

"अरे रे! भांडतात का विनाकारण, सकाळी सकाळी लोक देवाचं नाव घेतात आणि तुम्ही...काय खर नाही तुमचं, असो स्वाती मी तुझा चहा टेबलावर ठेवलाय" - आई

"आणि स्वप्नील तुझा नाष्टा पण तयार आहे, तो खा आणि जा बघू कॉलेज ला,"

"आग आई किती वाढतेस बस झालं आता माझं पोट भरलय, " - स्वप्नील

"काय हा मुलगा सकाळी सकाळी पोटभर नाष्टा केला म्हणजे, माणूस अगदी टवटवीत असतो. अन याच आपलं काहीतरीच, स्वप्नील sanitizer आणि मास्क आठवणीने घेऊन जा, मागच्या वेळेस विसरला होता तू ,अरे स्वतःसाठी नाही पण कमीतकमी दुसऱ्यांसाठी तरी वापरत जा" -

"हो आई घेतलंय सर्व, तू काळजी नको करू" -स्वप्नील

" अंग स्वाती" तू नाही येत का कॉलेज ला? " - स्वप्नील

"अरे नाही आज माझ ऑनलाईन लेक्चर आहे, so मी आज नाही येणार" - स्वाती

"बर आई येतो मी by " - - स्वप्नील

नमस्कार लवकरच येतील तुमच्या भेटीला स्वप्नील आणि स्वाती,

Swapnil and Swati will be coming to visit you soon.


Rate this content
Log in