Mayur Bagul

Inspirational Others

3  

Mayur Bagul

Inspirational Others

ऋणानुबंध : आई

ऋणानुबंध : आई

2 mins
236


"गुड मॉर्निंग, आई"

अरे! उठलास का ? "एवढ्या लवकर" आज सूर्यदेव पश्चिमेला उगलेत की काय? 'बघू दे आधी बाहेर मला. आई काय मस्करी करतेय का माझी,

"छे मी आणि तुझी मस्करी नाही रे बाबा, असो

ते टेबलावर्ती मी तुझे कपडे ठेवलेत, ते घे आणि अंघोळ कर बघू, " हो ग आई!

स्वाती, आग स्वाती कुठेय तू, ही मुलगी पण ना खूपच आळशी झालीये दिवसेंदिवस. ना नाष्टा, ना देवबाप्पाच दर्शन" आधी मोबाइल लागतो तिला,

"काय ग आई उगाच ओरडते माझ्यावर" तुझा लाडका स्वप्नील बघ अजून गोधडीतच असेल, त्यालापण बोलत जा की, "तो बघ आला तुझा लाडोबा" काय ग काय चुगल्या करतेय माझ्या, आई जवळ


अरे रे! भांडतात का विनाकारण, सकाळी सकाळी लोक देवाचं नाव घेतात आणि तुम्ही. काय खर नाही तुमचं, असो स्वाती मी तुझा चहा टेबलावर ठेवलाय आणि स्वप्नील तुझा नाष्टा पण तयार आहे, तो खा आणि जा बघू कॉलेज ला, आग आई किती वाढतेस बस झालं आता माझं पोट भरलय, काय हा मुलगा सकाळी सकाळी पोटभर नाष्टा केला म्हणजे, माणूस अगदी टवटवीत असतो. अन याच आपलं काहीतरीच, स्वप्नील सॅनिटायझर आणि मास्क आठवणीने घेऊन जा, मागच्या वेळेस विसरला होता तू ,अरे स्वतःसाठी नाही पण कमीतकमी दुसऱ्यांसाठी तरी वापरत जा, "हो आई घेतलंय सर्व, तू काळजी नको करू,

अंग स्वाती" तू नाही येत का कॉलेज ला

अरे नाही आज माझ ऑनलाईन लेक्चर आहे, सो मी आज नाही येणार, बर आई येतो मी बाय.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational