PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

स्वप्नांची किंमत

स्वप्नांची किंमत

10 mins
303


“हो, हीच आहे तुझ्या स्वप्नांची किंमत !” आरती डिवोर्से पेपर बेडवर आदळून राहुल ला म्हणाली. तीन महिन्याच्या संसारात शेवटच्या टोकाला गेले भांडण. आता ती त्याला म्हणाली, “हे बघ राहुल तुला जर माझ्यासोबत राहायचे असेल तर याशिवाय तुला दुसरा कुठलाही पर्याय नाही. तुला तो पर्याय मान्य करावा लागेल.” “अगं पण आरती आपल्या लग्नाला अवघे तीन महिने झाले आहेत आणि तू एकदम टोकाचा निर्णय घेतेस त्याचे परिणाम तुला माहिती आहे का? आपण ज्या जगात राहतो त्यात अशा निर्णयाने होणारे भयंकर दुष्परिणाम याची जाणीव तरी तुला आहे का?” “हे बघ राहुल या जगात फुकट काहीच मिळत नाही. प्रत्येक गोष्टीची किंमत ठरलेली असते, तुझ्या स्वप्नांची किंमत तुला ठरवावी लागेल. स्वप्ने काही बाजारात फुकट मिळत नाहीत. मी हे मान्य करते की तुझ्याशी लग्न करणे हा माझा जीवनातला सर्वात मोठा मुर्खपणा होता परंतु त्या मुर्खपणाच मी आता पुर्ण आयुष्य काढणार नाही तुला जर माझ्यासोबत राहायचे असेल तर हाच एकमेव आणि शेवटचा पर्याय आहे. तुझ्या आई वडिलांना तुला खेड्यात सोडून द्यावे लागेल व कायमचे माझ्यासोबत माझ्या घरी राहावे लागेल कारण तुझ्या आई-वडिलांच्या जुन्या खुळचट खेडवळ कल्पनांना आणि लेक्चरला मी खूप कंटाळली आहे. नको तेव्हा मला ते लेक्चर देत असतात त्यांना म्हणा खेड्यात जाऊन सुखी राहा. आणि तसही तुझ्या बापाशी तुझं पटतं तरी किती? जगावेगळे मतभेद आहे तुमच्या मध्ये आणि तुझी आई तरी किती दिवस जगणार आहे, काही दिवसाने जाईल म्हातारी जग सोडून. मग तुला माझ्या सोबतच राहावे लागेल काही दिवसांनी त्यापेक्षा आजच त्यांना खेड्यात सोडून दे. माझ्यासोबत आनंदाने आयुष्य जग बघ मी तुझ्या स्वप्नांची किंमत आहे. तुला आयुष्यात प्रीती, समृद्धी आणि श्रीमंती हवी होती ना? ते सर्व माझ्याकडे आहे त्या बदल्यात तुला सर्व मिळणार आहे. प्रीती समृद्धी आणि श्रीमंती सुद्धा. माझ्याकडे वडिलोपार्जित गडगंज संपत्ती आहे तू एका आलीशान बंगल्‍यात राहतो आहेस जो माझ्या वडिलांच्या मालकीचा आहे आणि तू नोकरीसुद्धा माझ्या वडिलांच्या खाजगी संस्थेवर करतोस तू एका विमानात प्रवास करत आहेस, राहुल. जीवनातील सर्व सुखे तुझ्यापुढे हात जोडून उभे आहेत आता निर्णय शेवटी तुझा आहे तुला ते गरीब म्हातारे आई वडील हवे आहेत की एक श्रीमंत, समृद्ध प्रीती आणि त्या मधली शेवटची सीमा रेषा हे डिवोर्से पेपर. त्या डिवोर्से पेपर वर सही केल्यास तू माझ्या बंधनातून कायमचा मोकळा होणार आहेस आणि विमानातून थेट तू त्या सडकेवर जाऊन पडशील आणि पुन्हा ते गरीब क्रूर असलेले आयुष्य जगत बसशील. तीच आहे प्रीती ची किंमत आज तुला मोजावी लागणार आहे.”


          फ्रीज मधील थंड पानी पित राहुल शांतपणे बोलला, “लग्न आपण समाजासमोर केलं तर समाजात आपली बदनामी होईल, त्याचा आपल्या जीवनावर किती परिणाम होईल याचे तुला काहीच वाटत नाही का? लग्न म्हणजे एक पोरखेळ होता दोन दिवस मांडाला आणि खेळून खेळून थकल्यावर सोडून दिला. हे बंधन जन्मांतरीचे असते आणि तसेही लग्नानंतर मुलीने सासरी जायचे असते ना माहेरी नवऱ्याला बोलवून घ्यायचे नसते ही परंपरा तुला माहिती नाही का?


     झटक्यात उठत आरती बोलली, “हे बघ तू प्राध्यापक आहेस इंग्रजीचा त्याचा आज येथे आणू नकोस. तुझा साहित्यातला शेक्सपियर मला सांगू नकोस साहित्याने काय मिळते माणसाला? मान्य आहे तू एम. ए. इंग्रजी साहित्य पदवी प्राप्त आहेस. परंतु आयुष्यभर कविता करत राहिल्यास किंवा साहित्य लेखन करीत राहीलास असं काय मिळतं रे या जगात। जगायला पैसा लागतो हे मी एम. एस. सी. फिजिक्स झालेली आरती बोलते जगात भावनांना किंमत नाही. राहुल किंमत आहे पैशाला. पैशाने तुला काहीही खरेदी करता येईल जगातील प्रत्येक गोष्ट ही पैशात खरेदी करता येईल, कळलं का तुला?”


     समजावण्याच्या सुरात राहुल म्हणाला, “तुला प्रीती काय बाजारात विकत मिळणारी वस्तू वाटली का, की पैशाने विकत घेता येईल? प्रीती ही आयुष्याचा सार आहे, सुगंधी बाग आहे, दरवळलेला परिमल आहे गुंजलेला आसमंत आहे. जीवनाचा आधार आहे, प्रीती हीच खरी जीवनाची आस आहे.”


    त्यावर सडेतोड उत्तर देत आरती बोलली, “अरे हे बघ या जगात कोणतीही गोष्ट घ्यायची असेल तर काही तरी त्याची किंमत चुकवावी लागते हा न्यूटनचा नियम सांगतो फिजिक्स मधला प्रत्येक गोष्टीची किंमत दिल्याशिवाय ती गोष्ट तुम्हाला मिळत नाही न्यूटनचा तिसरा नियम असाच आहे कृती आणि प्रतिकृती यासारख्या मोलाचे असतात आणि जर तुला त्याची किंमत चुकवता येत नसेल तर तो मोकळा होऊन जा. आणि मी समाजाने चार अक्षदा टाकून मांडलेल्या खेळाला संसार समजत नाही. संसार तोच असतो की जिथे आपल्या कल्पनांना वाव आहे आयुष्य जगताना आनंद मिळवता येते माझ्या जीवनात स्वातंत्र्याला खूप महत्त्व आहे. स्वतंत्र नसेल तर ते पारतंत्र्यात आयुष्य जगण्यात, नवऱ्याचे ताटाखालचे मांजर बनून जगण्यात मला इंटरेस्ट नाही मला सासू-सासर्‍यांची आदर्श सुन व्हायचे नाही. मी सुद्धा एक प्राध्यापिका आहे चांगले काम करते म्हणून माझे आयुष्य निवडण्याचा व माझ्या मर्जीप्रमाणे जगण्याचा मला संपूर्ण अधिकार आहे आणि तो अधिकार मी मिळवणारच आणि त्यानुसारच मी जगेल. ही जीवनाची माझी फिलोसोफी आहे माझ्या जीवनात भावनांना थारा नाही. तर माझ्या जीवनात कल्पनाही थारा नाही. खरं आहे ते फिजिक्स! भौतिकशास्त्र!


भौतिकशास्त्राच्या नियमा पलीकडे जग सुद्धा चालत नाही मिस्टर राहुल. समजून घ्या तुम्ही आणि तुम्ही जर पैशाचा हव्यास सोडला आणि साहित्यातच रममाण झालात ना तर तुमच्या शेक्सपिअरच्या हॅम्लेट सारखे वेडे होऊन फिराल आई-वडिलांच्या प्रेमात आणि कराल एके दिवशी आत्महत्या ‘टू बी ऑर नॉट टू बी ऑर नॉट टू बी’ असे म्हणत. अरे तेच सत्य आहे फिजिक्स शिवाय जीवनाला अर्थ नाही॰ राहुल हां आता आता मला त्या कटकटी पुन्हा जीवनात नको मला त्यापासून दूर राहायचे आहे. आज शेवटचा क्षण आहे आणि याच क्षणी तुला तुझा निर्णय घेऊन मोकळा व्हावा लागेल मी ऑलरेडी डिवोर्से पेपर वर सही केलेली आहे.

     

राहुल बोलला, “अगं पण ऐक तर, हा निर्णय तू भावनेच्या भरात घेत आहेस. कोण कुठल्या वकीलाला आपल्या मध्ये आणून तू आपल्या मध्ये भिंत उभी करते आहेस अगं तुला काय बोलायचे होते माझ्याशी बोलायचे होते ना उगाच वकिलाकडून डिवोर्से पेपर बनवून हे काय केलेस आणि हा प्रश्न आहे साहित्याचा तर सांगतो अगं साहित्य म्हणजे जीवनाचा गाभा आहे, जीवन जगण्याचा आत्मा आहे, हे जीवन एक महान असे काव्य आहे आणि त्या काव्यात वसलेली सुंदर बाग म्हणजे साहित्य. साहित्याबाबत तू अशी कशी बोलू शकतेस त्या हॅमलेटचे आपल्या वडिलांविषयी असणारे प्रेम जरा आठव. तो वेडा नव्हता जर त्याला वेडं म्हणतात काही जण. पण त्याला समजून घेताना किती शतके गेली जगाची परंतु हॅम्लेट अजूनही समजू शकला नाही कुणाला? का वेड्यासारखा वागत होता? खूप भावनिक आघात झालेत त्याच्यावर त्यामुळे तो रडत होता. त्याचे ते संवाद त्याचे स्वगत संवाद, त्याचे स्मशानातील स्वतःची संभाषणे हे कोडं बनुन आहेत गं अजून जाणकारांसाठी ? किती गांभीर्य लपलेलं आहे त्याच्या बोलण्यामध्ये? जाऊदे तुला मीच कळलो नाही तर तो हॅमलेट कसा कळणार? आणि तुझ्याकडून तेवढी अपेक्षा ही मी करू शकत नाही कारण हे तुला समजून घ्यायला आधी तुला मनाने खूप मोठे व्हावे लागेल.


खूप भावनिक माणसाचा प्रश्न आहे तो. तुझ्यासारख्या न्यूटनचे नियम मानून जगणाऱ्या व्यवहारी बाईला जन्मात कळणे शक्यही नाही. हो मान्य आहे मला तुला माझ्या आई वडिलांचे वागणं बोचत आहे त्यांचं तुला आयुष्याबद्दलची अनुभव ऐकणे पटत नाही पण त्याचा अर्थ असा नाही की माझ्या आई-वडिलांना कायमचे मी सोडून द्यावे आणि तुझ्या घरी राहायला यावे. माझे स्वप्न होते ही श्रीमंती, समृद्धी, प्रीती माझे स्वप्न होते आणि त्याच स्वप्नांची परिपूर्ती तू करणार होतीस. काही एकतर्फी प्रेम नव्हते माझे तुझ्यावर तुझे वडील आले होते काही अडचणी घेऊन माझ्याकडे आपण दोन कुटुंबे जर एक झालो तर दोघांच्याही अडचणी सुटतील असे म्हणत होते. जाऊदे पण तुझ्या अडचणी बद्दल मला आज बोलायचे नाही कारण निर्णय हा माझा स्वतःचा होता की माझी स्वप्नांची पूर्तता होणार होती. श्रीमंती समृद्धी प्रीती मला मिळणार होती म्हणून मी निर्णय घेतला तुझ्याशी लग्न करण्याचा. परंतु आरती पाठीत खंजीर खुपसला आज तू माझ्या. एवरेस्ट शिखराच्या टोकावर नेऊन हात सोडलास तू माझा तिथून कोसळणार आहे मी! खोल दरीत कोसळणार आहे कदाचित! वणवा लागेल माझ्या आयुष्याला जळून खाक होईल मी कदाचित! पण तुला हे सांगावे लागेल की माझं माझ्या आई-वडिलांशी काय नातं होतं ते बरोबर आहे तुझ माझ्या वडिलांशी माझ जरासही पटत नाही माझं। पण तुला माहिती आहे का आरती जेव्हा घरी जायला उशीर होत होता मला तेव्हा माझा बाप हातात बॅटरी घेऊन गावाच्या वेशीवर चकरा मारत राहायचा माझ्यासाठी थोडी तब्येत खराब झाले ना तर दहा वेळा मला सांगायचा अरे दवाखान्यात जाऊन ये, अरे दवाखान्यात जाऊन ये.


बाबा मला काही मानसिक ताणतनाव असला तेव्हा दहा वेळा फोन करायचा मला ऑफिसात जेवला की नाही? जेवला की नाही? विचारायला कुठे बाहेर कामानिमित्त उशीर झाला तर फोनची रिंग येवढ्या वाजायच्या का उशीर होतोय? का उशीर होतोय? असं म्हणायचा तो माझा बाप. अरे परीक्षा देत जा हिंमत सोडू नकोस स्पर्धा कठीण आहे म्हणून हिम्मत सोडायची नसते अशा शब्दांनी आधार मिळायचा मला. जगायला बाप म्हणजे काय असतो हे मी अनुभवले नोकरीसाठी मुलाखत द्यायला फिरायला पैसे कमी पडायचे तेव्हा गावातल्या राजकारण्यांकडून कर्ज काढून द्यायचा बाप मला. म्हणायचा नोकरीवर लागल्यावर माझं बाळ देईल पैसे वापस तुम्हाला पाटील. पाटील पैसे द्यायचे माझ्या बापाला मी नोकरीवर लागणार आहे म्हणून नाही आरती तर माझा बाप खूप प्रामाणिक होता त्याचा स्वभावाकडे पाहून. कधी एक रुपया मिळवला नाही त्याने कोणाची फसवणूक करून. स्वाभिमानाने जगला माझा बाप. माझी आई घरी होती शेतात कामाला जायची लोकांच्या पण दररोज संध्याकाळी शाळेतून आल्यावर फक्त एकच घाई असायची आईची सगळे भावंडे दारात बसून आईची वाट पाहत असायचो. थकून भागून आलेली आहे आमच्याकडे कडे पाहून हसायची तेव्हा आकाशातल्या चांदण्या पडल्यासारखे वाटायचं. मला अजून सांगायचे आहे अग प्रीती हे नितांत सुंदर आहे प्रीती जीवनाचे स्वप्न आहे प्रिती तारुण्याची पहाट आहे पण तिची किंमत नसते आरती. प्रीती म्हणजे फुलांचा दरवळलेला सुगंध आहे हवे सारखा त्याची किंमत मागतेस?


    आरती त्यावर उत्तरली, “मान्य आहे मला राहुल तुझं तुझ्या आई वडिलावर खूप प्रेम आहे. तू तुझ्या आई वडीलाचे शिवाय जगू शकत नाहीस पण माझं मन घूटत आहे तुझ्या आई वडिला सोबत राहताना याचाही तू विचार करायला हवा. मला तुझ्यासोबत राहण्यास कुठलाही प्रॉब्लेम नाही माझी तुझ्याशी कुठलेही भांडत नाही. माझा तुझ्या जीवनपद्धतीवर कुठलाही आक्षेप नाही. मी तुझ्यावर जिवापाड प्रेम करते, राहुल परंतु मला तुझे आई-वडील कायमचे नकोत हेही सूर्यप्रकाशा एवढेच सत्य आहे. जास्त भांडण लांब होतं आहे. आता हो किंवा नाही एका शब्दात उत्तर देऊन मोकळा हो तू आणि तुझा अंतिम निर्णय सांग मला.”


    राहुल निर्वाणीचे बोलत म्हणाला, “आरती आज अशी गोष्ट टोकावर चालली आहे तर मी सांगतो, तुझ्याच विज्ञानाच्या भाषेत तू जे म्हणतेस की मी तुझ्यासोबत राहावा आणि आई-वडिलांना कायम खेड्यावर सोडून द्यावा हीच माझी स्वप्नांची किंमत आहे तर लक्षपूर्वक ऐक या जगात माझ्या मालकीची असे काहीही नाही. जे काय आहे ते माझ्या आई वडिलांच्या मालकीचे आहे विज्ञानाच्या शुद्ध भाषेत सांगतोय लक्ष देऊन ऐक मला 23 गुणसूत्रे हे आई कडून आणि 23 गुणसूत्रे हे वडिलांकडून प्राप्त झालेली आहेत 46 गुणसूत्रा पैकी एकही गुणसूत्र माझे नाही शरीरातील वाहणारा रक्त प्रवाह वर सुद्धा माझा हक्क नाही सर्व माझ्या आई-वडिलांची देण आहे. मी कधीही मनाने माझ्या आई-वडिलांपासून दूर झालेलं नाही मी कबूल करतो की प्रीती ही नितांत सुंदर असे जीवनातील स्वप्न आहे. परंतु प्रीती ची किंमत आई-वडिलांच्या एवढी कधीही नाही. प्रीती एक काव्य आहे प्रीती एक अलगद स्वप्न आहे पहाटे पडलेले. आरती तू माझे पहिले प्रेम आहेस, तुझ्या इतके प्रेम मी जगात कुणावरही करत नाही. म्हणून तुझ्या निर्णयाचा सन्मान ठेवणे हे मी माझी कर्तव्य समजतो व आपल्या मरणासन्न असलेल्या विवाहाबंधनाच्या गाठींना कायमची मूठमाती देऊन मोकळा होतो. सत्य हे पण आहे मायबाप हेही विसरून चालणार नाही. माझी माझ्यासाठी मुलगी शोधणारे आणि मला तुझ्याशी विवाह बंधनात अडकवणारे हे सुद्धा माझे आई-वडील होते. आरती तू माझ्या जीवनात आली ती आई वडिलांमुळे आणि तुझ्यामुळे मी आईवडिलांना माझ्या जीवनातून वगळणार नाही मी मान्य करतो की मी पाहिलेले जीवनातील सर्वात मोठी स्वप्न मी उद्ध्वस्त करून जात आहे.


पण तू माझ्या समोर दुसरा पर्याय ठेवलेला नाही माझे स्वप्न हे तुटलेल्या काचेचे तुकडे यांसारखे जमिनीवर तुकडे-तुकडे होऊन पडलेली आहे आणि त्याच काचेच्या तुकड्यावरून मी आता जाणार आहे पण मी स्वप्ने पाहणे नाही सोडणार. स्वप्न पाहणे हा मानवाचा धर्म आहे तो पूर्ण होवो अथवा नाही हे आपल्या हातात नसते कदाचित. तू म्हणालीस ते सुद्धा सत्य आहे की मी आता थेट विमानावरून सडकेवर पडणार आहे कदाचित माझ्या नितांतसुंदर स्वप्नाच्या बागेत वणवा लागून माझे पंख जळून मी खाली पडलेला असेल पण मी फिनिक्स पक्षाची गोष्ट कुठेतरी पाहिलेली आहे ऐकलेली आहे. फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेण्याचा प्रयत्न करेन आयुष्यात. कारण माझे आयुष्य अजून संपलेलं नाही. एक गोष्ट तुला सांगतो आरती मला फुटबॉलची मॅच शेवटच्या मिनिटापर्यंत पाहण्याची आवड आहे कारण शेवटच्या मिनिटापर्यंत मी आशा सोडत नाही. शेवटच्या मिनिटात मारलेला गोल सामन्याचा निकाल फिरू शकतो मग हे तर जीवन आहे जीवनात जगाचे शेवटच्या क्षणापर्यंत लढेन. स्वप्नं शेवटच्या क्षणापर्यंत संपणार नाही तुटलेल्या स्वप्नांच्या काचेच्या तुकड्यावरून दुसऱ्या स्वप्नांच्या मागे धावेन. पुन्हा एकदा स्वप्नांचा पाठलाग कारेन तुझ्याविना ही.”


     एवढे बोलून राहुल डिवोर्से पेपरवर सही करून नम्रपणे पेपर तिच्या हातात देत म्हणाला, “हे तुझे पेपर आणि हा माझा राजीनामा तुझ्या वडिलांच्या संस्थेवर मी नोकरी करत होतो, तुझ्याशी डिवोर्से झाल्यानंतर माझा स्वाभिमान गुंडाळून मी तुझ्या वडिलांची चाकरी करणार नाही माझ्यासाठी दुसरा जॉब शोधणे माझ्या स्वप्नांसाठी तू मागितलेली किंमत मला मंजूर नाही. तुझा करार मला मंजूर नाही. प्रीती, समृद्धी, श्रीमंतीसाठी तुझा हा सौदा मला अजिबात मंजूर नाही.” एवढे बोलून राहुल दरवाजातून पायरीवर उतरून घराबाहेर जाऊ लागला। तो इंग्रजीचा प्राध्यापक आरतीचा पहिला प्रियकर कॉलेजला जायचा त्या खिडकीतून आरती बघायची पण आज तो निघाला कधीही न परतण्यासाठी दुसऱ्या स्वप्नांच्या शोधात एका स्वप्नांना मूठमाती देऊन कायमची...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy