Tanuja Dhere

Tragedy Action

3  

Tanuja Dhere

Tragedy Action

तांडव

तांडव

4 mins
110


पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता. महिन्यावर आलेला गणपतीचा उत्सव सर्वजण हात जोडून गणरायाचा धावा करत होते. 'तुच विनायक तू विघ्नहर्ता तार भक्तांना.' पाच सहा वर्ष दुष्काळ अनुभवलेल्या गावकऱ्यांना पहिला पाऊस पडला तेव्हा कितीतरी आनंद झाला. तो आनंद त्यांच्या डोळ्यात मावत नव्हता. तो डोळ्यावाटे आनंदअश्रूच्या रुपाने बाहेर पडत होता. मात्र हा आनंदही जास्त काळ टिकला नाही. दोनतीन दिवसातच सततच्या रिपरिप पावसाने गावाच्या कडेने वाहणारी नदी तुडूंब भरून वाहू लागली. शेतकऱ्यानीं भर पावसात पेरणीची तयारी चालु केली. आनंदाला उधाण आलं. सगळीकडं हिरवं रान फुलून आलं. डोंगर-घाट, माळ सगळा हिरवागार नजर फिरवल तिथं हिरवळ पसरली होती. मात्र एक महिना झाला अन् कहरच झाला पाऊस थांबायचं नावच घेईना, सर्वत्र बातम्या येऊ लागल्या आजुबाजूची धरणं, नद्या तुडुंब भरल्या आहेत. धरणांनी धोक्याची पातळी ओंलाडली आहे त्यामुळे आज उद्या धरणाची तोंडं उघडावी लागतील. सर्वांनी दक्षता घ्यावी. तेव्हा सगळीकडे काळजीचं वातावरण पसरलं.

नदीचं पात्र गावापासून दूर होतं ते पाय पसरत पसरत गावाजवळ येऊ लागलं. अन् एक दिवस धो धो मुसळधार कोसळणारा पाऊस थांबायचं नावच घेईना. नदीचं पाणी हा हा म्हणता गावात शिरलं. लोकांच्या तोंडचं पाणीच पळालं. काय करावं ते कुणालाच सुचत नव्हतं. जो तो आपला व आपल्या संसाराचा लेकराबाळाचा विचार करत होता. लहानमुलं, बायका-पोरं जीवाचा अकांताने ओरडू लागली. काही थोर माणसं एकमेकांना आधार देऊन गावाबाहेरच्या उंचावरच्या महादेवाच्या मंदिराकडे बोट दाखवून सुटकेचा मार्ग दाखवत होती. आपलं आवश्यक ते सामान घेऊन लोकं पटापटा घराच्या बाहेर पडत होती. मातीच्या भींती असलेली जुनी घरं पाण्याच्या ओलींनं लगेचच ढासळत होती. निम्मा अधीक गाव रिकामा झाला. पाणी आता कमरेपर्यंत वाढलं होतं. काही जणांचा जीव आपल्या घरातच अडकला होता. आयुष्यभराची पुंजी सगळी अशी एका रात्रीत उध्वस्त झाली होती. एकमेकांना सावरून धरणारे हात आता थकले होते. काही दुसऱ्यांना या संकटातून वाचवता वाचवता नदीमायच्या पोटात गडप झाले होते. 

ज्यांची घरं, वाडे दुमजली दगडी होते. ते घरावर चढून  गावचं चित्र आपल्या मोबाईलच्या कॅमेरात बंदीस्त करत होते. यातच दगडू पाटलाचा वाडा होता. जयवंत व विनायक अशी दोन मुलं त्याना होती. विनायक हा त्यांचा धाकटा मुलगा खूप गुणी होता. त्याने अनेकांना आपल्या घरात आश्रय दिला होता. जयवंत मात्र वाड्याच्या दुसऱ्या मजल्यावर उंच बुरूजाच्या अडोशाला उभा राहून लोक मरताना, जीवाचा अक्रोश करताना, पाहात होता. खरंतर तो पट्टीचा पोहणारा होता मात्र बघ्याची भूमीका घेऊन या क्रूर विध्वसंक आपत्तीचा असूरी आनंद लुटत होता. तर विनायक व त्याच्या मित्रांनी लाकडाच्या ओंडक्याची बोट बनवून अनेकांना सुरक्षित स्थळी पोहचवण्यात मदत केली होती. लोंकाचे जीव वाचवताना त्यांचे होणारे हाल जयवंत हसत हसत आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करत होता. त्याच्या त्या लाईव्ह व्हिडीओना हजारों लाईक मिळत होते. लोक ते दृश्य पाहून हळहळत होते मात्र त्याचवेळेस जे हजारो जीव त्याच्यामुळे वाचू शकत होते ते मात्र मनातल्या मनात जयवंतला शाप देत होते या अशा नासुरी वृत्तीला. गुरंढोरं जीवांच्या अकांतानी हंबरडा फोडत होती. जमेल तशी वाट काढत होती. कुत्री जोरजोराने भुंकत होती. जीवसृष्टी झाडे, मुळासकट मोठमोठी कोलमडून पडत होती. नदीच्या पाण्याचा आवेग गावात शिरणारा वाढतच होता. गावात आता दोनचारच घरात लोकं राह्यली होती. खूप वयस्कर, वय वाढलेली माणसं घर सोडायला तयारच नव्हती. तरी लोक खांद्यावर उचलून त्यांना कसेतरी सुरक्षित ठिकाणी पोहचवितच होती. आता जवळजवळ दोन दिवस उलटून गेले होते. सगळा गाव पाण्याखाली गेलेला दिसेनासा झाला होता. उंच टेकडीवरून लोकं गावाचा विनाश होताना पाहात होती. पण काहीच करू शकत नव्हती. देवाची प्रार्थना करत माणुसीकीच्या नात्याने एकमेकांना आधार देऊन एकमेकांचे मानसीक बळ वाढवत होती.

याचदरम्यान एक अघटीत घटना घडली. गावात शिरलेल्या पाण्याच्या ओलीनं, कच्च्या मातीत बांधलेला पाटलाच्या वाड्याचा वडिलोपार्जित जुना दगडी बुरूज कोसळला आणि एकच हाहाकार वाड्यात माजला नेमका जयवंत त्याच बुरूजावर उभा राहून सर्व विनाशकाल आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करत होता. मात्र तोच काल आता त्याच्यावर उलटा धावून आला होता. पूराची एक प्रचंड उसळी आत आली अन् क्षणात वाड्याची ती कमजोर बाजू गिळून काही न झाल्यासारखे नदीच्या पात्रात शांत झाली. विनायकने आपल्या भावाचा खूप शोध घेतला मात्र त्याला त्याचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. तो चांगला पोहणारे आहे जिवंत असेल, परत येईल या आशेवर तो त्याची वाट पाहत राहयला पण तो परत आला नाही. पुराच्या पाण्याच्या भोवऱ्याने त्याचा जीव त्याचक्षणी घेतला होता व त्याचा देह उंच दरीवरून खाली फेकून दिला होता. तो कसा परत येणार होता. हळूहळू पाऊस थांबला. पूरचा भर ओसरला. गावात लोक परतू लागले. सरकार व समाजाचा मदतीचा ओघ सुरू झाला.

यातही गावातील ठाराविक गडगंज लोंकानीच आपले खिसे भरले व लुटणाऱ्या हातानी लुटलेच व जे गरीब गरजू होते ते तसेच मदती पासून दूर राहीले. कोणाची आई, कोणाचे वडिल तर कोणाचे मूल देवाघरी गेलेले, बेपत्ता झालेले. सगळीकडे शोककळा पसरली. मात्र लोंकानी याही परिस्थीत हार मानली नाही. एकमेकांचे बळ होऊन, आहे त्या अवस्थेत घराची डागडुजी करून ते घरात राहू लागले. निसर्गाचा प्रकोप पेरलेले बी-बियाणाचं रान पार धुवून निघालं. जिथं जिथं बियानं उगवलं होतं तग धरून ते ते पिक अतीवृष्टीने झडलं, मधेच ऊन मधेच पाऊस ईगीन पडून पीक करपून गेलं. ओल्या दुष्काळानं तोंडाशी आलेला घास देखिल लोंकाच्या हिरावून घेतला होता.

तरीही 'देव तारी त्याला कोण मारी' म्हणतात ना महिन्याच्या अंतरावर आलेल्या गणेशउत्सवात याही अवस्थेत त्यांनी दाराला तोरण बांधून फुलांचे गणरायाचे स्वागत केले अन् दिवाळीच्या सणाला दारात दिवे, कंदिल काळजाचे पाणी करून लावले आणि गाव पुन्हा नव्याने उभे करण्याच्या मनसुभ्याने एकत्र आले. मात्र निसर्ग कोपला होता दसरा दिवाळी होऊनही पावसाची झड थांबायचं नाव घेत नव्हती. वाढतं प्रदूषण, निसर्ग वनराईची काटछटाई, त्याप्रमाणात झाडे लागवड कमी, पर्जन्यवृष्टी कमी झालेली, जमिनीची झीज झालेली. या वाढत्या तापमानामुळे व पडत असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे परिस्थिती हाताबाहेर गेली. मात्र एक झाले उशीरा का होईना झोपलेले लोक जागे झाले अन् वृक्षलागवडीकडे वळले.


Rate this content
Log in

More marathi story from Tanuja Dhere

Similar marathi story from Tragedy