Shilpa Sutar

Drama

2  

Shilpa Sutar

Drama

ती ही करू शकते...

ती ही करू शकते...

3 mins
171


आज केव्हा येणार सुहास तू ऑफिसहून? आई चहा घेताना विचारत होती.


येईन लवकर.... पण का गंआई?... सुहास.


अरे माझ्या गोळ्या संपल्या डॉ. कडे ही जायचं होतं... आई.


रमा येईल की मग....... सुहास बोलला.


नको मी जाईन माझी माझी, तुला नसेल जमत तर सांग...... आईने हेका सोडला नाही.


का?..... रमा करते ना तुला मदत? मग जा की तिच्या सोबत.... सुहास.


तरी सासुबाईंना विश्‍वास नव्हता...

रमा सगळं ऐकत होती....


रमा सोबत डॉक्टरकडे गेलं की ती उगाच डॉक्टरांना माझ्या गोड खाण्याबद्दल सांगते, नको बाई..... आई सांगत होती.


बरोबरच आहे मग ते, तू वॉकला ही जात नाहीस.... सुहास हसत ऑफिसला निघून गेला

.............


सुहास अरे तुझं लाइट बिल भरशिल तेव्हा माझंही भरणार का?...... बाजूचे काका भेटले रस्त्यात.


हो काका... काका नेहमी सांगायचे छोटी मोठी कामे, सुहासही आनंदाने करायचा त्यांची कामे... तेवढीच त्यांना मदत.


तुम्ही रमाकडे द्या काका, मी आज जरा बिझी आहे, रमा भरून देईन ऑनलाईन... आमचे लाइट बिल, फोन बिल, गॅस बूकिंग सगळी कामे रमा करते दर महिन्याला, मी बघतही नाही...


तरी काकांनी एेकलं नाही,

नको मी बघतो माझं, आजच भरायचं आहे.... स्वत: गेले, रमावर विश्वास नाही की ती करू शकते हे माहिती नाही म्हणून असं करतात

.........

कुठे चालली गं रमा आता स्वैपाकच्या वेळी?.... सासुबाई


आई बँकेत काम आहे, येते मी... रमा सांगत होती.


तू कशाला जाते सुहासला सांगायचं ना बाहेरची कामे, तुला जमेल का? नाही तर करून ठेवशील गडबड, उगीच निस्तराव लागेल, नाही तर डिसिजन सुहासच घेईन ना, सासुबाई चिडल्या होत्या.


अहो आई माझ्या अकाऊंटच काम मला करावा लागेल ना, येते मी... रमाला रागच आला जरा.


मॅडम ही fd रीन्यु करावी लागेल अजून 5 हजार टाकले की 50,000 ची होईल fd, काय करायच? आता करता का? सर नाही ना सोबत?.... बँकेत काम करणार्‍या कर्मचार्‍याने विचारलं


ok करून टाका fd, मी देते वरचे पैसे.... रमाने पैसे दिले.


पण मॅडम तुम्हाला घरी नाही विचारायचा का? मी थांबतो थोड्या वेळ...... तुम्ही डायरेक्ट हो बोलल्या...


आमच्या घरच फायनान्सशियल प्लॅनिंग मी करते, काही प्रॉब्लेम आहे का?...... सॉरी मॅडम

...........


आई आज माझा उशिरापर्यंत क्लास आहे, सुरभी रमाची मुलगी सांगत होती, तू येशील का घ्यायला?

हो बोलली रमा, अगं रात्रीच्या कुठे फिरणार तुम्ही दोघी? सुहासला ही आज उशीर होणार आहे, नको जाऊस आज क्लासला...... आजीच सुरू होतं... 7.30 म्हणजे काही खूप उशीर नाही गं आजी, चील..... सुरभी ही कंटाळली होती आणि काय तुझा सारखा आमच्यावर विश्वास नसतो, एवढ्या तेवढ्या वरून मी क्लास बुडवणार नाही .....

असे बरेच प्रसंग.....


रमाला वैताग आला होता सासूबाईंच्या वागण्याचा, आजूबाजूच्या लोक ही तसेच , लोकांना अस वाटतं बायका काहीच काम करू शकत नाहीत, डिसिजन घेऊ शकत नाही, बायकांना नाव ठेवण्यात बायकांचा ही पुढाकार असतो, स्वतः कधी काही डिसिजन घेत नाहीत, दुसऱ्यांनाही मागे खेचण्यात पटाईत असतात या

सुहासला काहीच प्रॉब्लेम नव्हता, त्याला माहिती होतं बायको आपल्या पेक्षा हुशार आहे सगळी कामे करू शकते किंबहुना तीच करते पण तरीही सगळीकडे तू करू शकते का?? हेच ऐकायला मिळतं, कधी बदलणार हे चित्र??

गाडीत पेट्रोल भरायचा असो की घरचा लाइट बदलायचा असो, तुला येईल का? बॅंकेचे कामे जमतील का? एकटी जाऊ शकते का? तू निर्णय घेवू शकते का?

अरे काय असं? तिला तिच्या मनाप्रमाणे जगू द्या नीट, तुला जमेल का? पेक्षा तू कर आम्ही आहोत पाठीशी, हे वाक्य जास्त आनंद आणि धीर देऊन जातं, सदोदित तिला मागे खेचण्यापेक्षा पाठिंबा द्या, जाऊ द्या तिला पुढे, विश्वास ठेवा तिच्यावर, जर तिला आता काम करायची संधी दिली तरच पुढे जाऊन अजून परफेक्ट काम जमेल, पण काही करूच दिल नाही तर कसं काही करता येणार आणि मग चारचौघात सांगायचं आमच्या हिला एटीएममधून पैसे काढता येत नाहीत, हीला बँकेचे काम जमत नाही, चारचौघात बोलता येत नाही, तुम्ही पाठिंबा दिला असता पूर्वी तर ती लगेच शिकली असती ,

ती ही करू शकते... करू द्या तिला... विश्वास ठेवा... पाठींबा द्या... प्रेम द्या...


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama