Shilpa Sutar

Inspirational Others

3  

Shilpa Sutar

Inspirational Others

मेहंदी रंगली हातावर

मेहंदी रंगली हातावर

3 mins
214


"मेहंदी लावलेली तुझे हात किती सुंदर दिसत आहेत आशा, अशी सुंदर मेहंदी लवकरच तुझ्या हाताला लागो",....... काकूंनी आशाला भरभरून आशीर्वाद दिले...


तशी आई आशाकडे बघायला लागली, आईच्या डोळ्यात नकळत पाणी आलं, कसं होणार आहे माझ्या मुलीचं काय माहिती?....

आशा ही उठून आत चालली गेली, त्या रात्री आशा आणि आई दोघी नीट झोपल्याच नाहीत, देवाने का केलं माझ्यासोबत असं, बरोबरीच्या मुली सगळ्या मोठ्या झाल्या, व्यवस्थित पाळी वगैरे यायला लागली त्यांना, आशाच अजून कशातच काही नव्हतं, आई वाट बघत होती, शेवटी दोघी डॉक्टर कडे गेल्या, डॉक्टरांनी चेक केलं आणि सांगितलं की आशाच गर्भाशय विकसित झालेलं नाही, त्यामुळे तिला कधीच पाळी येऊ शकत नाही,.....

आई बरेच दिवस दुःखात होती पण बाबांनी तिला समजावलं,..... "आपली मुलगी छान आणि हुशार आहे, आपण कशाला दुःखात रहा, असेल तिच्या नशिबात ते होईल, तू काळजी करू नकोस" ,........


आशा छान शिकली आणि गावातच शाळेत टीचर म्हणून जॉईन झाली, हळूहळू सगळीकडे आशाची बातमी पसरली, आशाला आता स्थळ येण बंद झालं होतं, बरोबरीच्या मैत्रिणींचे कधीच लग्न झाले होते, मूलबाळ पण झाले होते, आशाने आता लग्नाची आशा सोडून दिली होती, .......

त्याच दरम्यान शाळेत विक्रांत ने टीचर म्हणून नोकरी जॉईन केली, रुबाबदार विक्रांत खूपच प्रभावी होता, प्रत्येकाला मदतीला नेहमी पुढे असायचा तो, त्याचा विषय खूप छान शिकवायचा, शाळेत सगळ्यांशी त्याच छान जमायच


आशा आणि विक्रांत ची ओळख वाढली, अतिशय हुशार आणि समजूतदार आशा विक्रांतला पसंत पडली, दोघांच एका प्रोजेक्ट वर काम सुरू होत, त्यांचे विचार खूप चांगले जुळत होते, अगदी तासंनतास दोघे एखाद्या विषयावर गप्पा मारत होते,....


एक दिवस स्टाफ रूम मध्ये आशा पेपर चेक करत बसली होती, विक्रांत सरांचा पण पिरेड ऑफ होता, तेही आले, आशा मला असं वाटत आहे की आपण दोघांनी लग्न करावा....

"मला तुमच्याशी लग्न करता येणार नाही विक्रांत", ..... आशा

" का काही प्रॉब्लेम आहे का",..... विक्रांत

हो..... अशाने सगळं जे खर आहे ते विक्रांतला सांगितलं,

"मला याने काहीही फरक पडत नाही आशा, मुलंच हवं ते आपण अनाथाश्रमातुन सुद्धा घेऊ शकतो, तू तुझा विचार करून सांग, माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे ",..... विक्रांत


आशाच्या मनात विक्रांत विषयी अजून आदर वाढला, ती आनंदाने घरी आली, आई-बाबांना तिने विक्रांत विषयी सांगितलं, आई-बाबाही खूप आनंदात होते, दुसऱ्या दिवशी विक्रांतला घरी बोलवल, त्याचे आई बाबा ही आले होते सोबत, त्यांनाही सत्य परिस्थिती सांगितली, काही प्रॉब्लेम नव्हता त्यांना,...... एक चांगला मुहूर्त लग्नासाठी निश्चित केला....


सुरेख अशा संध्याकाळी अतिशय मंगल वातावरण होतं, आशा आई बाबा विक्रांत त्यांचे आई बाबा सगळे आनंदात होते, आशा च्या मैत्रिणींनी आशाला घेराव घातला होता, सुरेख, अशी मेहंदी आशाच्या हातावर काढली जात होती, विक्रांतच सगळं लक्ष आशाकडे होतं, आशालाही ते समजलं होतं, तिच्या गालावर गोड लाली पसरली होती, मैत्रिणी छान चिडवत होत्या, मेहंदी जेवढी जास्त रंगते तेवढ पतीच प्रेम जास्त असतं,......


आई, बाजूच्या काकू, सगळ्या मैत्रिणींनी मेहंदी लावली, दुसऱ्या दिवशी सकाळी हळद आणि लगेच दुपारून लग्न होतं,....

आशा ची मेहंदी खूप छान रंगली होती, त्यावरून चिडवाचिडवी सुरू होती, लग्न लागलं, आशा ची विदाई झाली, खूप सुंदर सासर मिळालं होतं आशाला, आशा आणि विक्रांत खूप खुश होते.....


आणि ती पहिली रात्र आली, सुरेख अशा अशा सजवलेल्या पलंगावर आशा बसली होती, तिचे नाजूक सुंदर मेहंदी नि रंगलेले हात विक्रांतने हातात घेतले, तुझ्या सुंदर हातांवर मेहंदी खूप छान दिसते आशा, मी आज तुला वचन देतो या मेहंदी सारखच आपल्या प्रेमाचा रंग हे कधीच कमी होणार नाही....... 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational