gauri deshpande

Tragedy Thriller Others

3  

gauri deshpande

Tragedy Thriller Others

वेताळ आणि अंजलीचे प्रेम भाग २

वेताळ आणि अंजलीचे प्रेम भाग २

3 mins
151



     आपण मागील भागात पाहिले अंजली आणि मीना बोलत असताना त्यांच्याकडे अमनचे लक्ष जाते. आता पुढे.....


    " हॅलो, तुम्ही माझ्याबद्दल बोलत आहात का ?" असे बोलतच अमन त्यांच्या दिशेने येऊ लागला होता. त्या दोघी घाबरल्या होत्या. त्या पळून जायच्या बेतात होत्या. इतक्यात अमन तिथे आला.


अमन :- हे, मिस तुम्ही माझ्याबद्दल बोलत आहात का ?

मीना :- हो, म्हणजे तुझी तर डेथ झाली होती ना !

अंजली :- हा चमत्कार आहे की काय ?

अमन :- काही माहीत नाही. असोत तुम्ही कधी पासून मुलांना लाईन देऊ लागला.


          अंजली आणि मीना त्याच्याकडं पाहत राहिल्या. 


अंजली :- तू शेवटच्या वर्षाला आहेस ना !

अमन :- हो, का ? 

मीना :- तुझ्यासारखा सुंदर मुलगा शोधून मिळायचा नाही. 

अमन :- का असे का बोलतेस ? 

मीना :- तुझी एक ही प्रेयसी नाही का ?

अमन :- काय बोलतेस तू ? असती तर मी असा फिरलो असतो का ? 

अंजली :- अग, त्रास देऊ नकोस. आपण जाऊ आता. 


         अंजली आणि मीना तिथून निघून गेल्या. त्या गेल्यानंतर अमन मनात बोलला, " काय मुली आहेत या ? थोड्या विचित्र आहेत." पण अंजली जेव्हा त्याच्या समोर येत होती तेव्हा तेव्हा त्याला आपलेच कोणीतरी आले आहे असे वाटायचे. 

        अंजलीला पूर्वीचा अमन आणि आताच्या अमन मध्ये खूप बदल जाणवू लागला होता. कारण पूर्वीचा अमन इतका कमी बोलत नसे. पण आताचे अमनचे रूप पूर्ण वेगळे होते. 

          अमनला अंजलिकडे पाहिले तर नेहमी आपण हिला ओळखतो असे वाटायचे. पण त्याला काहीच आठवत नसायचे. आता अंजली त्या वेताळला पूर्णपणे विसरून गेली होती. तसेही तिला माहित नव्हते की, अमनच तो वेताळ आहे. 

           अमन ला आता अंजली बाबत एक विचित्र ओढ लागली होती. ती ओळखीची वाटू लागली होती. ते दोघे भिन्न शाखेत जरी असेल तरी ही एकाच कॉलेज मध्ये होते. हळू हळू अंजली आणि अमन मध्ये मैत्री वाढू लागली होती. 

      अमन हा एक श्रीमंत घरचा मुलगा होता. पण अंजली ही मध्यम वर्गीय कुटुंबात राहणारी मुलगी होती. एकदा ती वर्गात एकटीच बसली होती. पण अचानक तिथे काही टवाळ खोर मुल आली जी तिच्याच वर्गात शिकत होती. ती सरळ अंजलीच्या दिशेने गेली. 

        त्यांना बघून अंजली थोडी घाबरली पण स्वतः ला सावरत बोलली, " अच्छा ! विकी आणि महेश तुम्ही इथे काय करताय ?" 


महेश : - तुझी गम्मत करतोय. तू आमच्या लव्ह लिस्ट मध्ये आहेस ना ! 

विकी :- हो ना ! तुझ्यासारख्या सुंदर मुली आमच्या जाळ्यात असतात.

अंजली :- काय ? मला तुमच्यात रस ही नाही. 

विकी :- ओके, मला माहित आहे की, तुला महेश आवडतो.

अंजली :-. काय ? हा गैरसमज आहे. 

महेश :- का ? मला आवडते तू.

अंजली :- तुला लाख आवडत असेल पण मला तू नाही आवडत ना !

महेश :- ओके.  


     इतक्यात अंजलीची मैत्रीण उर्मिला तिथे आली. 

उर्मिला :- तुम्ही इथे काय करताय ?

महेश :- तू आयटम आहेस यार. 

उर्मिला :- बक बक करू नकोस इथून जा.

विकी :- ही नाही तर तूच सही ये ना !

उर्मिला :- तोंड सांभाळ तू स्वतः चे......


      महेश आणि विकी त्यांच्या वर्गातले सर्वात टपोरी मुल होती. ते दोघे अंजली आणि उर्मिलाला रोज त्रास द्यायचे. त्यांना आता कंटाळा आला होता. 


      आता पुढे काय होईल ? पाहा पुढील भागात ....... 

           


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy