Neha Ranalkar(Nawate)

Abstract Tragedy

2  

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Tragedy

विषय,:- अंतर्मुख

विषय,:- अंतर्मुख

1 min
9


   तिच्या प्रभागातील शिवजयंती उत्सव नगरसेवकांच्या देखरेखीत अतिशय आनंद व उल्हासात पार पडला.पण तीन दिवसानंतर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या राजकीय नेत्यांच्या मोठमोठ्या फलकांना वाचविण्याच्या नादात एका शालेय मुलाला आपला जीव गमवावा लागला. हेच गणेश उत्सव व शिवजयंती उत्सव सण जनजागृतीसाठी सार्वजनिक साजरे व्हावे म्हणून आग्रह धरणा-या लोकमान्यांच्या आत्म्याला हे दिखाऊपण पाहून काय वाटले असावे ह्या विचाराने ती अंतर्मुख झाली.


या अलकमधून हल्ली विनाकारण फक्त स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी जाहीरातबाजीसाठी लावण्यात येणारे मोठ्ठाले फलक वाहतुकीसाठी कोंडी ठरून जीवांसाठी धोकादायक ठरत आहेत.त्यावर सर्वांनी अंतर्मुख होऊन विचार करायलाच हवा.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract