वैभव दिलीप चौधरी

Tragedy

4.0  

वैभव दिलीप चौधरी

Tragedy

वर्णभेदाचं अस्तित्व

वर्णभेदाचं अस्तित्व

4 mins
332



            नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे! आपण साऱ्यांनीच मला कविता,चारोळी लिहिताना पाहिलं असेल,पण आज मी पहिल्यांदा लेख लिहण्याचा प्रयत्न करतोय.विषय तसा आपल्या परिचयाचा आहे,तसं पहिलं तर हा विषय खूप गंभीर आहे; कदाचित ह्या विषयाशी आपला देखील संपर्क आला असेल आणि या विषयासंबंधी प्रत्येकाचे अनुभव देखील वेगवेगळे असतील असो...! वर्णभेद हा विषय मुळात किती गंभीर आहे हे मला वारंवार सांगण्याची गरज वाटत नाही कारण; ह्या विषयावर बहुतांश लेखकांनी तसेच जाणत्या-अजाणत्या लोकांनी लेखन तसेच भाष्य केलेले आपल्याला दिसून येते, आजही समाजात वावरताना मला जागोजागी वर्णभेद जिवंत असल्याचा भासतो; खरंतर ही दुर्दैवाची गोष्ट नाही का? हा एक खूप मोठा प्रश्न आहे; पण वर्णभेदाच्या बाबतीत सुशिक्षित आणि सुजाण नागरिक सुद्धा जबाबदार आहेत असं मला वाटतं; आजही समाजातील बहुतांश लोक ही गोष्ट स्वीकारण्यास तयार नाहीत.मला परिचित असलेला एक वर्णभेद मी तुमच्यासमोर मांडत आहे.खरंतर ही घटना लिहिणं खूप अवघड आहे,पण तरीही मी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना खरंतर चार वर्षांपूर्वी मी एका वृद्ध आजोबांकडून ऐकलेली आहे;अनुभवली आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल.कारण त्यांनी त्या वेळी मला जे सांगितलं होतं ती सत्य घटना होती मात्र माझ्या लिखाणात त्या घटनेला मी थोडं काल्पनिक रूप देऊन आहे तशी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.

           मी मूळचा भिवंडीचा पण कामानिमित्त मी २०१६ साली बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये एका कंपनीत सेल्समन म्हणून काम करायचो भिवंडी ते बांद्रा हा रोजचा प्रवास शक्य नसल्याने मी तिथेच राहणे पसंत केले होते. कामाची वेळ ही सकाळी ९ ते संध्याकाळी ६ असायची,मुंबईत राहणाऱ्या लोकांची धावपळ किती असते हे मला सांगायची गरज वाटत नाही, रोज सकाळी लवकर उठून,लगबगीने तयारी करून, ऑफिसला जाणे आणि संध्याकाळी परत घरी परतणे असा मुंबईकरांचा ठरलेला दिनक्रम असतो. घर आणि ऑफिस सोडून मुंबईकरांच्या आयुष्यात दुसरं काहीच नसतं असं मला त्या वेळी वाटायचं पण हळूहळू त्या गोष्टीची सवय झाली. मी ज्या ठिकाणी राहायचो त्याच्या बाजूला एक संयुक्त कुटुंब राहायचं; त्या कुटुंबात रोज लहान-सान गोष्टीवरून भांडण व्हायचं,रोज माझी कामावरून यायची वेळ आणि त्यांच्या भांडणाची वेळ बऱ्याचदा एकच असायची व त्यांच्या फ्लॅटच्या बाजूच्या फ्लॅटमधील एक आजोबा रोज बाहेर बसलेलं असायचे ते त्यांची गंमत रोज पाहायचे एके दिवशी मी त्यांना विचारलं रोज रोज भांडण करायला यांना कंटाळा येत नाही का? त्यावर ते माझ्याकडे बघून मिश्किलतेने हसले व मला म्हणाले तुला काय करायचं आहे पोरा असं मला म्हणाले त्यानंतर मीही त्यांना कधीच परत कोणत्याही बाबतीत प्रश्न उपस्थित केला नाही.जसेजसे दिवस जात होते तशी माझी आणि आजोबांची ओळख पटत गेली; जेव्हा मला वेळ मिळायची तेव्हा मी त्यांच्यासोबत गप्पा मारत बसायचो सुरुवातीला ५-१० मिनीटे बोलणं व्हायचं हळूहळू गप्पा मारण्याच्या वेळेत वाढ होऊ लागली,मिनिटांचे रूपांतर तासात झाले तासनतास आम्ही बोलत बसायचो आता तुम्ही म्हणाल आजोबांशी तरी तासनतास काय बोलत बसायचं; पण त्या आजोबांशी तुमची भेट झाली तर तुम्हालासुद्धा त्यांच्याशी गप्पा मारायला आवडेल, त्यांचा बोलण्याचा गोडवा आणि त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा होता...

           एके दिवशी त्यांनी मला प्लॅटमध्ये होणाऱ्या रोजच्या भांडणाचे मूळ काय आहे ते सांगितलं होतं त्या संयुक्त कुटुंबात विनोद आणि संगीता नावाचं दाम्पत्य राहत होतं व त्यांना काजल, प्रियंका व सुमिता नावाच्या तीन मुली होत्या त्यात काजल ही सर्वांत मोठी मुलगी होती तिच्यानंतर प्रियंका आणि सुमिता ही सर्वात धाकटी मुलगी होती. तीन मुलींपैकी मोठी मुलगी काजल आणि धाकटी मुलगी सुमिता ह्या दिसायला खूप सुंदर आणि तुमच्या भाषेत गोऱ्या रंगाच्या होत्या पण प्रियंका ही वर्णाने सावळ्या रंगाची मुलगी होती. जेव्हा प्रियकांचा जन्म झाला तेव्हा तिच्या घरात लक्ष्मी तर आली मात्र कुटुंबात जणू दुःखाचा डोंगर कोसळला, तिच्या जन्माच्या वेळी घरात जी गजबज असायला हवी होती ती पाहायला मिळाली नाही. जन्माच्या पहिल्या दिवसापासून विनोद आणि संगीता तिच्या वर्णाचा द्वेष करत होते,जन्माच्या पहिल्या दिवसापासून प्रियंकाचा छळ सुरू झाला होता. प्रियंका जशीजशी मोठी होत होती तसे तिचे आईबाबा तिचा तिरस्कार करत होते; कोणत्याही बाबतीत काजल आणि सुमिताला जसं आई-वडिलांचं प्रेम मिळत होतं तसं प्रियंकाला मिळत नव्हतं.प्रियंका शाळेत शिकत असताना तिच्याशी कुणीही मैत्री सुद्धा करत नव्हतं व तिच्या रंगावरून इतर मित्रमैत्रिणी तिला चिडवत असतं, पण प्रियांका ही खूप समजूतदार आणि हुशार मुलगी होती कोणत्याही प्रकारची तक्रार ती करत नव्हतं मुळात कुणाला तक्रार करणार, आणि तिला समजून घेणार असं कुणीच नव्हतं, कुठे कार्यक्रम असो अथवा कुठे बाहेर जायचे असो काजल आणि सुमिताला तिचे आईबाबा घेऊन जात असत मात्र प्रियंकाला कुठेही घेऊन जात नसत.प्रियंका आणि कुटुंब यांच्यात एक दरी निर्माण झाली होती कारण काय तर तिचं दिसणं तिच्या घरच्यांना खटकत होतं; यात तीची काहीही चूक नसताना तिला हे सगळं भोगावं लागत होतं. ७ वी इयत्तेत असताना प्रियंकाचा वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक आला होता,शाळेतील सर्व शिक्षकांनी तिचे मनापासून कौतुक केले होते व प्रथम क्रमांक आला म्हणून शाळेत एक छोटा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता; पण त्या कार्यक्रमात सुद्धा तिचे आईबाबा हजर राहिले नव्हते;इतकी वाईट वागणूक तिला घरच्यांकडून मिळत असे.

           प्रियंकाचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा होता, तिला ठाऊक होतं की कुणाच्या दिसण्यावरून त्या व्यक्तीची पारख होत नसते तर कर्तृत्वावर होत असते, खरंतर ही खूप छोटी गोष्ट आहे आणि तुम्ही आम्ही आजचे जागरूक नागरिक एकता आणि एकात्मतेचा संदेश देत असलो तरी मात्र अश्या पुरोगामी विचारसरणी घेऊन समाजात वावरत आहोत त्यात सर्वांना दोष देता येणार नाही,मात्र बहुसंख्य लोक आजही समाजात ज्या गोष्टीमुळे काहीच निष्पन्न होत नाही अश्या गोष्टींचा बाऊ करतात आणि आधुनिकतेची आण घेऊन जगाला 'हम सब एक है' चा नारा देत आहेत. हे सगळं थांबवलं पाहिजे पण हे थांबवणार कोण हा खूप गहन विषय आहे आणि प्रियंकाचा बाबतीत जे झालं तसं इतर कोणत्याही मुलीच्या बाबतीत घडायला नको याची खबरदारी घेतली पाहिजे ...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy