Nita Meshram

Inspirational

3  

Nita Meshram

Inspirational

वसुधा

वसुधा

8 mins
360


वसुधा आज खूपच खुश होती. आनंदाने अक्षरशः नाचतच तिने आईला मिठी मारली. आई म्हणाली अग!अग! सांभाळून किती वेड्यासारखी करतेस. नाचतेस काय?गातेस काय? काय झालंय एवढं धिंगाणा घालायला. वसुधाअजुनही आपल्याच धुंदीतच म्हणाली ..आई..आई..अग! अगदी माझ्या मनासारखे झाले आहे. तुला आठवते मी तुला निशांतबद्दल सांगितले होते. आई म्हणाली निशांत...अग ! माझ्या आॅफिसमधल्या निशांत जाधवबद्दल बोलतय मी ब्रन्च मॅनेजर मी. निशांत जाधव. वसुधा उत्साहाने सांगत होती. बाई ग! हाच का तो निशांत. निशांत घरी निघून गेल्यावर वसुधाअगदी आनंदाने घडलेला वृत्तांत आईला सांगत होती. आनंदित होत होती. निशांत आणि तिची दोन -तीन महिन्याची तर ओळख होती. बँकेत ती पी.ओ.म्हणून रूजू झाली. त्याच बँकेत निशांत मॅनेजर म्हणून काही महिन्यांपूर्वी रुजू झाला होता. दिसायला अगदी देखणा बोलताना तेवढाच मृदू समंजस आणि लाघवी. पोषाखात तर त्याची निवड कमालीची होती. ऑफिस मिटींगमध्ये प्रथम भेटीतच निशांतच्या एकंदरीत व्यक्त्तीमत्वाने ती प्रभावित झाली होती. तो अविवाहित आहे हे कळल्यावर तो तिला जास्तच आवडू लागला होता. पण लगेचच आपल्या घरची परिस्थिती तिच्या डोळ्यासमोर आली.आपण जेमतेम घरचे. आपली परिस्थिती बेताचीच. स्पर्धा परीक्षेमुळे कसेतरी इथपर्यंत पोहोचलो आणि निशांत कारने फिरणारा,महागडे कपडे घालणारा.मोठ्या घरचा मुलगा. छे! आपला आणि त्याचा मॅच नाहीच.असा विचार करून तिने मनात आलेले विचार झटकून टाकले व कामाला लागली. दिवसामागून दिवस जात होते. वसुधाची आता सर्वांशी चांगली मैत्री झाली होती. निशांत बरोबर तर तिला पी.ओ. असल्याने बँकेचे सर्व हिशोब होईपर्यंत थांबावे लागे. नंतरच सातच्या बसने ती घरी जायची. एकदा काही कारणास्तव सातची बस आलीच नाही. वाट पाहत एक तास निघून गेला. वसुधाला  काय करावे सुचत नव्हते. अंधार वाढत चालला होता. घरूनही सारखे फोन येत होते. वसुधाअगदी रडकुंडीला आली होती. समोरचा एक मवाली तिच्याकडे रोखून पाहत होता. तिला त्याची खूप चिड येते होती. पण काय करणार ती हतबल होती. लवकर बस यावी आणि आपली सुटका व्हावी, ऐवढेच तिच्या डोक्यात होते. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. आईचा असेल म्हणून न पाहता वसुधाम्हणाली,काय?ग! आई सारखा फोन करतेस. अग! काय? करू मला अजून बस नाही मिळाली. तेवढ्यात षुरूषी आवाज आल्याने ती भानावर आली. अहो.. वसुधामॅडम मी निशांत सर बोलतोय बँकेतून.अग्रवाल कंपनीची फाईल सापडत नव्हती म्हणून फोन केला होता. सर..सर..ती माझ्या कपाटात आहे. मी देते उद्या वसुधाम्हणाली . ठीक आहे निशांत म्हणाला. पण, इतका उशीर झाला बस आली नाही तर मला फोन करायचा ना! मॅडम .नाही पण सर.. वसुधाम्हणाली.थांबा तिथेच मी येतोय. निशांतने फोन ठेवला वसुधाला  थोडे हायसे वाटले. चला घरी तर पोहचू असे ती मनात म्हणाली. अवघ्या दहा मिनिटांनी निशांत तेथे येऊन पोहचला. त्याने मागून वसुधाला  आवाज दिला. वसुधाने मागे वळुन पाहीले निशांत होता. तशी ती लगबगीने उठली. सुटलो बुवा असा सुस्कारा सोडला. निशांतच्या गाडीजवळ जाऊन पोहोचली. दोघांनीही एकमेकांना स्मित केले. अजूनही तो मवाली वसूधाकडे रोखून पहात होता. निशांतच्या नजरेतून ते काही सुटले नाही.वसुधाच्या  चेहर्‍यावरील भीतीही त्याला दिसली होती. दोघेही गाडीत बसले. गाडी सुरू झाली. आता वसुधा थोडी स्थिर झाली होती. निशांत तिला नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत होता. हे तिच्या लक्षात आले होते. ती मनापासून खुदकन हसली. निशांत तसा नागपूरकर पण नोकरीसाठी त्याला नाशिकला राहावे लागत होते.


वसुधा नाशिकमधील होती. पण खेडेगावात शाखा असल्याने ती बसनेच ये-जा करायची. पाहता-पाहता नाशिक आले. निशांत वसुधाला म्हणाला, वसुधा मॅडम उद्यापासून तुम्ही माझ्याच गाडीतून यावं असं मला वाटत. अर्थात तुमची काही हरकत नसेल तर. नाही.. सर असू द्या. येईल, मी बसनेच उगाच तुम्हाला त्रास. यावर निशांत काहीच बोलला नाही. तेवढ्यात वसूधाचं घर आलं.आई-बाबा डोळ्यात प्राण आणून वसुधाची  वाट बघत होते. तिला बघून त्यांचा जीव भांड्यात पडला. आईला फोनवर वसुधाने निशांत बरोबर येते म्हणून सांगितले होते. आईबाबांनी निशांत घरात येताच त्याचे आभार मानले. आईने निशांतला जेवणाचा ईतका आग्रह केला की, निशांत नाही म्हणू शकत नव्हता. शेवटी जेवतांना वसुधाच्या  गाडीतून येण्याचा विषय काढला. म्हणाला. आईबाबा! वसुधाला  उद्यापासून माझ्या गाडीत पाठवा. अश्विनी मॅडम येणारच आहेत उद्यापासून. दोघींनाही सोबत होईल. बाबा म्हणाले, ठीक आहे बेटा. आम्ही याच विषयावरच चिंतेत होता. बरे होईल तुमच्या गाडीत येईल तर. खरंतर तुमचे आभारचं मानायला पाहिजे. बाबा आभार मानून मला लाजवू नका. बरं येतो मी. ठीक आहे बेटा वसूधाचे बाबा म्हणाले. 


सर्व निशांतला बाहेर सोडायला आले. वसुधा मॅडम उद्या तयार राहा हं..निशांत वसुधाकडे पाहून म्हणाला. होय सर.. वसुधा म्हणाली. सकाळी ठरल्याप्रमाणे निशांत वसुधाला  घ्यायला आला.सोबत बँकेच्या क्लार्क अर्चना मॅडमही होत्या. आई येते ग! असे म्हणत वसुधाघराबाहेर पडली.सांभाळून जा ग! असे आईने बोलली यावर निशांत गमतीने होय.. आई .असे म्हणताच सर्वांना एकदम हसू आले. आता रोजच वसूधाचे निशांतच्या गाडीतून जाणे-येणे सुरू झाले. अर्चना मॅडम प्रेग्नंट असल्याने त्या कधीकधी सुट्टीवर असत.अशातच निशांत व वसुधाची  एकमेकांशी चांगली मैत्री झाली . एकदा वसुधाने बँकेत सुट्टी टाकली. निशांतने सहजच कारण विचारले तर वसुधाने   पाहायला पाहुणे येत आहेत म्हणून सांगितले. तेव्हापासून निशांतच्या मनाची चलबिचल सुरू झाली. आपल्याला काय होतेय, हेच त्याला कळेना. रात्र त्याने जागून काढली. पण त्याला उत्तर मिळाले होते. त्याने सकाळी गाडी वसुधाच्या घराकडे वळवली. आज अर्चना मॅडमही नव्हत्या. वसुधागाडीत बसली. वसुधाची आई बाहेर होती. संधी साधून निशांत म्हणाला, आई संध्याकाळी जेवायला आलो तर चालेल ना! आईच्या अगोदर मागून बाबा म्हणाले,अहो ! नक्की या मला कंपनी मिळेल. वसुधाअग पुढे बस ना !

निशांत म्हणाला. अं..हो.. बसते. वसुधाम्हणाली. गाडी सुरू झाली.


कसे बोलावे निशांतला कळेना. तरी त्याने बोलायला सुरवात केली. मग! वसुधा आवडला का मुलगा. वसुधाम्हणाली, बरा होता मुलगा. पण हुंड्यासाठी म्हणत होता. 'आई-बाबा' तर काळजीत पडले आहेत. स्थळ चांगल आहे. बाबा विचार करतो म्हणाले. हं..वसुधा.. बाबांना बिनहुंड्याचा जावई चालणार नाही का? निशांत म्हणाला. म्हणजे तुमच्या नजरेत एखादा मुलगा आहे का? वसुधा म्हणाली. आता निशांतला रागच आला. त्याने जोरात गाडीला ब्रेक लावला. म्हणजे मी तुला आवडत नाही का? वसुधा. नसेल, तरी तू मला आवडतेस. मी आज तुझ्या आईबाबांना विचारतो याबाबत. क्षणभर वसुधा अवाक् झाल्यासारखी बघत राहिली. निशांत तर तिला पहिल्याच दिवशी आवडला आणि आज त्याच्यातला प्रियकर तिला खूपच आवडला होता. ती काहीच बोलत नाही, हे पाहून निशांत रागात गाडीत जाऊन बसला. वसुधाला खूप हसू आले. ती गाडीत बसली आणि म्हणाली, चला सर लवकर उशीर होतोय. संध्याकाळी तुमचं लग्न ठरवायचं आहे म्हटलं. आता कुठे निशांत हसला. त्याने वसुधाकडे पाहिले. ती लाजून चूर झाली होती. निशांतने गाडी सुरू

केली.


काही वेळात ते बँकेत पोहोचले. दोघांचेही आज कामात लक्ष नव्हते. निशांत तर संध्याकाळ होण्याची वाट पाहात होता. शेवटी ती वेळ येऊन ठेपली. वसूधाकडे जेवण आटोपल्यावर निशांतने सरळ विषयाला हात घातला. तोपर्यंत वसुधाने आईला आत याबाबत कल्पना दिली होती. आईला निशांत आवडला होता. प्रश्न फक्त बाबांचा होता. आई म्हणाली वसुधा तू काळजी करू नकोस. मी बघते बाबांच. ठीक आहे आई वसुधा म्हणाली. निशांत

म्हणाला 'आई-बाबा'मला तुमच्याशी काही बोलायचे आहे. बोल निशांत बाबा म्हणाले. मला जावई करून घ्याल का तुमचा. मला वसुधाफार आवडते.

निशांत बोलत असताना वसुधालाजून आत गेली. तेव्हा बाबांच्या काय लक्षात यायचे ते आले. बाबा म्हणाले पण तुमचे आईवडील. आणि हुंडा वगैरे देण्याची आमची ऐपत नाही निशांत. निशांत म्हणाला, बाबा मला फक्त वसुधाहवी आहे. माझ्या आईबाबांनी होकार दिला

आहे. मग काय बाबांनी वसुधाला बोलवले. हसतचं विचारले का ग! तुला मान्य आहे का हे स्थळ. वसुधाने होकारार्थी मान डोलावली. बाबा म्हणाले तुझ्या

आईबाबांना बोलवून घे लग्नाची तारीख काढून घेऊ. ठीक आहे बाबा. आईबाबांच्या पाया पडून निशांत निघून गेला. इकडे वसुधा सुखी संसाराची स्वप्न बघू लागली.


लग्न झाले, वसुधा सासरी आली. निशांतने लगेच हनिमूनला जायची घाई केली. त्याने तिकीटे बुक केली होती. आईबाबांचा निरोप घेऊन निशांत व वसुधा मलेशियाला निघाले. विमानतळावर पोहोचताच वसुधाच्या  घरून फोन आला. आई बोलत होती सुखरूप जा..बाळ!पोहचल्यावर फोन करा. निशांतची काळजी घे. होय आई काळजी करू नकोस. असे म्हणत वसुधाने फोन ठेवला व दोघेही विमानात जाऊन बसले. विमान मलेशियाला निघाले. सबंध प्रवासात नवीन जोडपे सुखस्वप्नात दंग होते. मलेशियाला केव्हा पोहचले त्यांना कळलेही नाही. मलेशियाला हाॅटेल आधीच बुक केले असल्याने ते सरळ हाॅटेलला गेले. थकव्यामुळे फ्रेश होऊन केव्हा झोपले त्यांना कळले नाही. सकाळी फ्रेश झाल्यावर काहीतरी न्यूज पाहावी म्हणून निशांतने टीव्ही ऑन केला आणि समोरच्या बातमीने तो हादरून गेला. बातमी होती चीन व अमेरिकेत कोरोना या विषाणूचा वेगाने प्रसार. हजारो बाधित. मृतांचा आकडा

वाढतोय. इतरही देशात प्रसार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. प्रत्येकाने काळजी घ्या, गर्दीत जाऊ नका, मास्क वापरा, सॅनिटायजरने वारंवार हात धुवा. बाप रे! निशांत हे काय? वसुधा ओरडून म्हणाली. निशांत टीव्ही बंद करून तिला जवळ घेत म्हणाला, काही होणार नाही. चल तयार हो मलेशिया पाहायचा की नाही. अरे पण निशांत... तयार हो ना प्लीज निशांत म्हणाला. ओ.के..ओ.के..तयार होते, असे म्हणत वसुधा तयारीला

लागली. दोघेही मलेशिया फिरून आले. 


पण जेथे-तेथे कोरोनाच्याच बातम्या त्यांच्या कानावर येऊ लागल्या. निशांतला आता तेथे राहणे धोक्याचे वाटू लागले. 'मलेशियात

जगभरातील लोक येतात. कोरोनाचा संसर्ग येथे केव्हाही होऊ शकतो.' निशांत म्हणाला...होय.. निशांत. ...काळजीच्या सुरात वसुधाम्हणली.या विचाराने दोघेही अस्वस्थ झाले. निशांत तातडीने परतीची टिकीटं बुक केली. दोन-तिन दिवसात ते घरी पोहोचले.भारतातही आता कोरोनाचे रूग्ण आढल्याचा बातम्या टी.व्ही वर येत होत्या. लवकरच भारतात सर्वत्र लाॅकडाऊन केले जाईल असे बोलले जात होते. सतर्कतेचा इशारा दिला जात होता. ईकडे हनिमूनला घेतलेल्या सुट्टया शिल्लक असल्याने वसुधाआणि निशांतचे मजेत दिवस जात होते. सुख-सुख म्हणतात, ते हेच आहे वसूधा. तुझ्या सहवासाचं सुख. असे म्हणतात निशांतने वसुधाचा हात हातात घेतला. स्पर्श होताच निशांतचं अंग तिला गरम वाटले. अरे... निशांत तुला ताप आहे

वाटतं.चांगलंच तापलयं तुझ. हं.. हो ग ! काळजी करु नकोस मी पॅराॅसिटॅमल घेतली आहे.


अरे.. आपण डॉक्टरांकडे जाऊ या. सध्याचं वातावरण कसं आहे माहित आहे ना ! तुला. वसुधाम्हणाली. काही होत नाही ग ! मला. उद्यापर्यंत बरं वाटेल निशांत म्हणाला. ठीक आहे सर. चला आधी नाश्ता करून घ्या. मग गोळी घेऊन झोपून जा वसुधाम्हणाली.ओ.के.मॅडम जशी तुमची आज्ञा असे म्हणून निशांत नाश्ता करायला उठला. दोन दिवस पॅराॅसिटॅमल घेऊनही निशांतचा ताप कमी होईना. त्याला डोकेदुखीचा त्रास, घशाला जळजळ व सर्दीचा त्रास सुरू झाला होता. वसुधाने घाबरून ही गोष्ट निशांतच्या आईवडिलांच्या कानावर घातली. त्यांनी लगेच त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. निशांतच्या विविध टेस्ट झाल्यावर तो कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ऐकताच निशांतच्या आईने आकांत केला. वडिलांना काही सुचत नव्हते आणि वसुधा....ती वेड्यासारखी गप्प एकटक पाहत होती. मध्येच उठून निशांत ठीक होईल ना ! असे विचारत होती. परिस्थिती पाहून डाॅक्टरांनी घरच्यांची विचारपूस केली. वसुधाची व निशांतच्या आईवडिलांचीही टेस्ट करण्यात आली. त्यात वसुधाची  टेस्ट पॉझिटिव्ह आली होती.तेवढ्यातच आलेल्या वसुधाच्या आईवडिलांना ही बातमी कळली. माझ्या पोरीच्या संसाराला कुणाची नजर लागली असे म्हणत वसुधाची  आई रडत होती. वडील तिला समजावण्याचा प्रयत्न करत होते. निशांतची प्रकृती बिघडत चालली होती. श्वास घ्यायला त्रास लागला होता. त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. वसुधावर आयसोलेशन विभागात उपचार सुरू करण्यात आले होते. वसुधा वारंवार देवाला मनोमन प्रार्थना करत होती. 'देवा.. मी वाचले नाही तरी चालेल पण माझ्या निशांतला बरं कर'.निशांत व वसुधाच्या  आईवडिलांची अवस्था वेड्यासारखी झाली होती. काय करावे त्यांना सूचत नव्हते. सर्व डॉक्टरांच्या हातात होते. डॉक्टरचं त्यांच्यासाठी देव होते. निशांत तब्येतीत आता सुधारणा होऊ लागली होती. त्याला आता नॉर्मल वॉर्डात आणण्यात आले होते. पण इकडे वसुधा मात्र औषधांना दाद देत नव्हती. निशांत बरा होईल ना!माझा निशांत बरा होईल ना!अशी सारखी बडबड करायची.


डॉक्टरांनी तिला निशांत बरा होतोय असे सांगितले. तेव्हा कुठे तिच्या चेहर्‍यावर हसू उमटले. तोपर्यंत तिला श्वसनाचा त्रास सुरू झाला होता. तिला तातडीने अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. निशांतला ही गोष्ट डॉक्टरांनी सांगितली तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आले. 'डॉक्टर माझ्या वसुधाला वाचवा हो'. असे म्हणून तो रडायला लागला. डॉक्टरांनी त्याला दिलासा दिला. वसुधा नक्की बरी होईल असे आश्वासन दिले. थोड्याच दिवसांत वसुधाबरी

झाली. निशांतही बरा झाला. दोघांच्याही आईवडिलांना खूप आनंद झाला. वसुधाची आई म्हणाली, चला एक संकट टळले. आता आम्ही गावाकडे जायला मोकळे. पण आता लवकर गोड बातमी पाठवा हं नाशिकला. सर्व हसायला लागले.


निशांत आणि वसुधा मात्र लाजत एकमेकांकडे बघत होते...


Rate this content
Log in

More marathi story from Nita Meshram

Similar marathi story from Inspirational