Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

घड्याळाच्या तालावर

घड्याळाच्या तालावर

1 min
580


दिवसाची सुरवात

घड्याळाच्या गजराने

आला कंटाळा तरीही

लवकर उठायचे


कच्ची तयारी असली

तरी धावपळ होते

नाश्ता करता करता

कुकरही चढवते


काँफी चहा बोर्नव्हीटा

प्रत्येकाच्या भिन्न वेळा

हसूनच प्रत्येकाला

देता देता जीव गोळा


भाजी विचारुच नका

आवडींचा नसे मेळ

घट्ट पातळ नुमजे

कशी मारावी मी वेळ?


काटे पळती वेगाने

हाका कितीक माराव्या??

ठणठणपाळ सारे

मेळ कसा मी घालावा?


धावपळ गडबड

पर्स तशीच घेऊन

गँस मशिन बघून

निघे किल्ल्या उचलून


सिग्नलला घड्याळाचे

काटे पळती वेगाने

वेग वाढवून पोचे

कचेरीस मी नेमाने


येता येता बाजाराची

आठवण असे मनी

आतासुद्धा हे घड्याळ

मला का बरे खुणवी?


घर आणि आँफिसचा

घाली मी यशस्वी मेळ

नवयुग ललनेचा

असा घड्याळाशी खेळ!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract