Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

सचिन कांबळे

Inspirational Thriller Others

3  

सचिन कांबळे

Inspirational Thriller Others

त्यास मी जवळून पाहिलंय

त्यास मी जवळून पाहिलंय

2 mins
180


व्यथा कोण जाणेल त्याची

कोण हो जाणेल त्याचे मन

कोण होता तो गलिच्छ

घाणेरडा व्याख्या करतो आपण

खालच्या दर्जाचा,गबाळा म्हणून

का हो संबोधतो त्यास

निःस्वार्थपणे झटतो

ना कसलाच हव्यास

तुम्हा आम्हा सर्वांसाठी

ज्याने संपुर्ण जीवन वाहिलंय ,

कचरा उचलणाऱ्यास मी

जवळून पाहिलंय...


घाण, कचरा, उकिरड्या जवळुन जाता

येतो आपोआप नाकावर रूमाल

विचार करूनही किळस वाटतो

सांगा कसा उभा राहत असेल तो त्यात

रखरखत्या उन्हात, मुसळधार पावसात

कडाक्याच्या थंडीची पर्वा त्यास झाली नाही

केर कचरा, घाण उचलूनही

सदा आनंदात राही

अभाग जीवनाशी

कुटुंब त्याचं झुजतच राहिलंय ,

कचरा उचलणाऱ्यास मी

जवळून पाहिलंय...


घाण वास त्याकडून म्हणून

त्याचे बाजुस कोणी उभा ना राही

असे जीवन का जगतोय?

कशाला? अन् कुणा पायी ?

किड्या मुंगी सारखं जगणं त्याचे हे

तुम्ही आम्हीं ना कधीच जाणलंय ,

कचरा उचलणाऱ्यास मी

इतक्या वेदनेतही हसतमुख पाहिलंय....


कचऱ्यातून रोगांचा उगम,

आजाराचे माहेर घर

किती आजारानं त्रस्त तो

सोबत कुटुंबाची ही दोर

आयुष्याचे दर दिवशी

हरवून येतो काही क्षण

पण कुणात नाही हिम्मत

पुढे येऊन करेल त्याचे रक्षण

प्रचंड प्रकाश असुनही आयुष्य त्याचे,

हे अंधारातच राहिलंय ,

कचरा उचलणाऱ्यास मी

जवळून पाहिलंय....


जीवनाच्या अर्ध्यावरच

मृत्यू त्यास कवटाळतोय

तरी निडर होऊन

तुम्हा आम्हासाठी झटतोय

होता कमवता पैसा आजारातच गेला

दुसऱ्यांचे जीवन सुखमय करून

स्वतः मात्र गरीबच राहिला

मोठ मोठाले आजार जडून

आयुष्य हे त्याचे त्याच्या

हातातच नाही राहिलंय.

कचरा उचलणाऱ्यास मी

मी जवळून पाहिलंय.....


कचरा करणारे आपणच, आणि

म्हणतो त्यास कचरेवाला

घाणेरडा, गलिच्छ काचरेवाला कोण?

हे आधी विचारा स्वतःच्याच मनाला

जीवनाच्या सिनेमात त्याचा शेवट हा,

मध्यंतरातच होताना मी पाहिलंय ,

कचरा उचलणाऱ्यास 

मी जवळून पाहिलंय....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational