Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

दिपमाला अहिरे

Inspirational

3.3  

दिपमाला अहिरे

Inspirational

गुलाबी गुलाब... (रंग -गुलाबी)

गुलाबी गुलाब... (रंग -गुलाबी)

2 mins
191


"अगं नमु तो ट्रक कुठवर आलाय बघ जरा? फोन तरी लाव त्या ड्रायव्हरला." राणी गोडाऊन मधुन नमु ला आवाज देत होती.

"राणी ताई मघाशी केला मी त्याला फोन पाच मिनिटांत येतो म्हणाला तो." तेवढ्यात ट्रकचा हॉर्न वाजला.राणी पटकन बाहेर आली.

"काय दादा एक तास झाला वाट पाहतोय तुमची? माल पोहचायला उशीर झाला तर समोरची पार्टी नाही घेणार .. नुकसान होईल आमचं."


"ताई ते ट्राफीक मुळं जरा लेट झाला..उद्यापास्नं नाही होत गडबड..चिंता करू नगा तुम्ही."

 ड्रायव्हर आणि नमु आणि राणी पटापट साबणांचे खोके ट्रक मध्ये ठेऊ लागले. राणीने ड्रायव्हर ला पत्ता फोन नंबर, पैसे सर्व दिलेत

"हे बघा या पत्त्यावर सर्व खोकी व्यवस्थित पोहोचवायची. काम झालं की, लगेच मला फोन करा. मी येणार होती.पण मला दुसरं पण काम आलंय जरा महत्वाचं."

ट्रक रस्त्याला लागला तशी राणीने गोडाऊन ला कुलुप लावलं आणि नमु ला घेऊन घराकडे गेली. बाहेरच्या नळावर पटापट हातपाय धुवून घरात गेली.आई जेवणाचं ताट वाढून तिची वाट पहात होती.


राणी ,नमु दोघी जेवायला बसल्या. " राणी काय गं हे मागच्याच दारी गोडाऊन आहे.पण पाच मिनिटे वेळ काढून जेवायला येत नाही तु? तुझ्या बरोबर त्या नमुला पण उपाशी रहावे लागते, आणि हे काय जरा हळुहळु जेव की, कित्ती घाई? ठसका लागेल की?"


"आई कालच गुलाबाचे नवीन रोपं आलेत. त्यांना जागेवर लावायचे आहे .ऊन,वारा पाऊस तिघी गोष्टी माफक मिळतील अशा ठिकाणी ठेवावं लागेल त्यांना."


नमु मध्येच बोलते."मावशी आपल्या राणी ताईचा व्यवसाय चांगला जम धरू लागलाय आता साबणासाठी तर रोजच ऑर्डर येऊ लागल्या आहेत.

छोट्या टेम्पो वरुन आज ट्रक वर आलोत आपण."


आईच्या डोळ्यात समाधान दिसत होते.आणि आठवत होते आपले पुर्वी चे दिवस. राणी आणि आई दोघीही गुलाबाच्या एका शेतात कामाला जायच्या.

फक्त दिवसभर तिथल्या रोपांची देखरेख करायची.

शेळ्या मेंढ्या पासून रक्षण करायचे , सांगीतलेल्या वेळेवर पाणी द्यायचे.राणीला ते गुलाबी गुलाब खुप आवडायचे. जसजशी ती मोठी होऊ लागली.तसतसे त्या गुलाबी गुलाबा विषयी तिचे प्रेम जास्तच वाढु लागले.

वडील नसल्याने आईलाच एकटीला घराची सर्व जबाबदारी पेलावी लागते ती लहानपणापासून पहात होती. बारावी पास झाली आणि आईला आपण काही तरी आर्थिक मदत करावी असे तिला वाटु लागले.तिचे मन त्या गुलाबांच्या ताटव्यात रमायचे. सर्वात आधी तर तिने गुलाब विकायला सुरुवात केली.नंतर हळुहळु ती त्यांचे आपल्या हाताने सुंदर बुके बनवुन विकु लागली. नंतर तिला तिच्या मैत्रिणीच्या आईने गुलकंद बनवायची कल्पना दिली. तिसुद्धा तिने आमलात आणली.हुन्नेरी असल्याने ती आता वेगवेगळ्या मार्केट मध्ये जाऊ लागली. वेगवेगळ्या व्यवसायांची माहिती काढु लागली.गुलाबापासुन बनणाऱ्या वेगवेगळ्या वस्तुंचे काही शिबीरामध्ये सहभाग घेऊन. शिकुनही घेतले.. नंतर तिने आपल्या घराच्याच परस बागेत गुलाब लावले.फुलवले. एक छोटी खोली होती तिथेच तिने आपल्या छोटेखानी व्यवसायाला सुरुवात केली होती.गुलाबाचे गुलकंद,साबण, अत्तर आणि लग्न समारंभासाठी गुलाबाचे गुच्छ आणि फुले यासर्व वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून तिने आपला छोटा व्यवसाय आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि कामाच्या सातत्याने बराच विस्तीर्ण केला होता. तिच्या मुळे काही गरजु बायांच्या हातांनाही काम मिळाले होते.नमु सुद्धा त्यांच्यातील एक होती. अशाप्रकारे गुलाबी गुलाबाच्या मदतीने राणीने आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी पाहिलेली स्वप्ने पूर्ण केली होती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational