Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pratibha Tarabadkar

Abstract

4.6  

Pratibha Tarabadkar

Abstract

आई ग आई निसर्ग म्हणजे कोण ग बाई

आई ग आई निसर्ग म्हणजे कोण ग बाई

2 mins
389


आई ग आई निसर्ग म्हणजे कोण ग बाई

नको त्रास देऊ मला कामाची घाई

हिरवी हिरवी झाडे अन् रंगीबेरंगी फुले

काळे काळे कातळ अन् निळे निळे तळे

निसर्ग, रंगांची उधळण करणारा चित्रकार आहे का ग आई

आई ग आई.....

कुठे उंच उंच डोंगर अन् कुठे खोल खोल दऱ्या

कुठे वैराण वाळवंट अन् कुठे झुळझळणाऱ्या नद्या

निसर्ग, विविध रचना करणारा रचनाकार आहे का ग आई

आई ग आई ...

कोकीळेचे कूजन अन् निर्झराचा खळखळाट

भ्रमराचे गुंजन अन् विजांचा गडगडाट

निसर्ग विविध रचना करणारा संगीतकार आहे का ग आई

आई ग आई...

अथांग सागर त्याचं पाणी सारं खारं

पावसाचं रुप घेता मीठ कोठे जातं सारं?

निसर्ग, विज्ञानाचे प्रयोग करणारा शास्त्रज्ञ आहे का ग आई

आई ग आई....

इवल्याशा बीजाचा कसा होतो मोठा वृक्ष

कोण जोपासतो त्याला ठेवूनिया लक्ष?

निसर्ग, वनस्पतींची मशागत करणारा माळी आहे का ग आई

आई ग आई...

एका पेशीतून सजीव तयार कसा होतो?

जन्म घेताच श्वास कसा घ्यायला लागतो?

निसर्ग,जगावे कसे ते शिकवणारा शिक्षक आहे का ग आई

आई ग आई...

दगड मारला तरी झाड फळ देते

अन् माणसाच्या निवाऱ्यासाठी जमीन छातीवर घाव झेलते

निसर्ग, मुलांनी दुखविले तरी प्रेम करणारी वात्सल्य सिंधू आई आहे का ग आई

आई ग आई...

पण निसर्ग कधीतरी अचानक का रागावतो?

भूकंप, ज्वालामुखी अन् त्सुनामी का घडवतो?

स्वतःच निर्मिलेल्या सृष्टीचा क्षणात संहार का करतो?

प्राण तोच देतो अन् निष्ठूरपणे काढूनही घेतो

निसर्ग आपल्या विविध रुपांनी संभ्रमित करतो

निसर्ग अगम्य, अनाकलनीय आहे ना ग आई

आई ग आई.. निसर्ग म्हणजे नक्की कोण ग बाई

निसर्ग म्हणतो पडले का बरे तुला कोडे?

माझ्या निर्मित सृष्टीचे का काढता वाभाडे

वैराण भूमी ही कुणी बनविली तोडूनि हिरवी झाडे

जमिनीचा समतोल बिघडविता फोडुनि डोंगर कडे

अन् बांध सागरा घालुनि वेग अडविता पुढे

निसर्ग वदला काय कुणाचे केले मी वाकडे

आधी शिक्षा करीता अन् मग घालता साकडे

आर्जवितो निसर्ग मानवा घालूनि साद

अजुनि नाही गेली वेळ जाग मानवा जाग


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract