आई
आई
मारतो आईस हाक मी जेव्हा
हुंकार "आंतून" येतो...
कळले माझे मलाच तेव्हा
का जीव लावूनी मी जगतो...
अंगणात अजूनी सारे
सडे तिचेच कायम पसरलेले
म्हणूनी सारे माझे
जगणे सुगंधी बहरलेले...
माझे मरण घेऊनी तिचे
सारे जगणे देऊन गेली...
किती आठवावे तिजला
आठवांची पोकळी ठेवून गेली...