Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sachin Kambli

Romance Inspirational Others

3  

Sachin Kambli

Romance Inspirational Others

" पुन्हा जगायचे होते..."

" पुन्हा जगायचे होते..."

1 min
186


हरवलेले ते सारे

     पुन्हा शोधायचे होते

ऊरले सुरले किती कोण जाणे

      पुन्हा जगायचे होते... ।।


वळणे गेली कितीही

     ना कुठेच नागमोडी होती

ती तिथेच थांबलेली... कळले

     तिला पुन्हा भेटायचे होते... ।।


किती गेले दग्याने सोडून

     जे आलेच त्यासाठी होते

वार सारेच पाठीवरले

     आणखी काय कळायचे होते... ।।


प्रवाह ऊलटे कितीदा

     झाले पार पोहून

नितळ पाण्यात एकदा तरी

     प्रतिबिंब बघायचे होते... ।।


बघू सूरात एका... सोबत

     कोण धरु सूर शकतो

गीत गौरवाचे ते जुने

      पुन्हा गायचे होते... ।।


एकदा मलाही पहायचे

     पुन्हा वळून होते

यत्नांच्या मातीत त्या

     पुन्हा मुरायचे होते... ।।


देऊन लक्ष ऐका

     काही सांगायचे होते...

जगायचे मलाही आहे

     इतकेच सांगायचे होते... ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance