Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ganesh Gavhle

Inspirational

4.5  

Ganesh Gavhle

Inspirational

ऐका सांगतो महती तुम्हा माझ्या मराठीची

ऐका सांगतो महती तुम्हा माझ्या मराठीची

1 min
173

ऐका सांगतो महती तुम्हा माझ्या मराठीची

माय मराठीची अन माझ्या लेकुरवाळ्या आईची ||धृ||

ज्ञानेशांच्या ज्ञानेश्वरीची अन तुकोबाच्या गाथेची

काळ्या विठ्ठलाच्या भक्तीची अन त्या पंढरीच्या वारीची ||

वीर शिवबाच्या पराक्रमाची अन शंभुच्या त्या बलिदानाची

स्वराज्याच्या मावळ्यांची अन सह्याद्रीच्या गडकोटांची

हर हर महादेव गर्जनेची अन् गनिमी काव्याची 

सळसळणार्‍या मराठी रक्ताची अन फडफडणाऱ्या भगव्या ध्वजाची ||

ऐका सांगतो महती तुम्हा माझ्या मराठीची

माय मराठीची अन माझ्या लेकुरवाळ्या आईची ||धृ||

कालिदासाच्या मेघाची अन मुकुंदराजाच्या काव्याची

कुसुमाग्रजांच्या कवितेची अन बहिणाईच्या बोलीची

सुर्वेच्या त्या कामगारांची अन अण्णाभाऊंच्या वंचितांची 

रवींद्रनाथांच्या गीताईची अन ज्ञानपीठच्या पुरस्काराची ||

ऐका सांगतो महती तुम्हा माझ्या मराठीची

माय मराठीची अन माझ्या लेकुरवाळ्या आईची ||धृ||

फुलेंच्या त्या शाळेची अन सावित्रीच्या शेण खड्यांची

गांधींच्या अहिंसेची अन टिळकांच्या केसरीची 

भगतसिंगाच्या फाशीची अन सुभाषचंद्रच्या सेनेची 

समाजसुधारकांच्या कार्याची अन प्रबोधनाच्या चळवळींची ||

ऐका सांगतो महती तुम्हा माझ्या मराठीची

माय मराठीची अन माझ्या लेकुरवाळ्या आईची ||धृ||

इंग्रजांच्या दडपशाहीची अन क्रांतिकारकांच्या बलिदानाची 

पानिपतच्या रणांगणाची अन रँडच्या वधाची

स्वातंत्र्याच्या संग्रामाची अन भारतीयांच्या एकजुटीची

आंबेडकरांच्या संविधानाची अन् अव्वल आपल्या लोकशाहीची ||

ऐका सांगतो महती तुम्हा माझ्या मराठीची

माय मराठीची अन माझ्या लेकुरवाळ्या आईची ||धृ||

बाबा आमटेच्या कुठरोग्यांची अन् सिंधुताईंच्या अनाथांची 

लतादीदीच्या आवाजाची अन तेंडुलकरच्या शतकांची

झगमगणाचा बॉलीवुडची अन अमिताभच्या उंचीची 

दादा कोंडकेच्या विनोदांची अन लक्ष्या-अशोक सराफच्या जोडीची ||

ऐका सांगतो महती तुम्हा माझ्या मराठीची

माय मराठीची अन माझ्या लेकुरवाळ्या आईची ||धृ||

सहयाद्रीच्या घाटमाथ्यांची अन भीमा गोदेच्या पाण्याची

अजिंठा वेरूळच्या लेण्यांची अन लोणारच्या सरोवराची 

दख्खनच्या पठाराची अन महाराष्ट्राच्या मातीची 

प्रेमळ इथल्या मराठी मनाची मराठी माणसाच्या माणुसकीची ||

ऐका सांगतो महती तुम्हा माझ्या मराठीची

माय मराठीची अन माझ्या लेकुरवाळ्या आईची ||धृ||

Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational