Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Aparna Pardeshi

Tragedy Others

4.5  

Aparna Pardeshi

Tragedy Others

"काय फरक पडतो."

"काय फरक पडतो."

1 min
16


खरंच जगणं कठीण असतं 

मरण वाटावी सुटका

अपेक्षांच्या ओझ्याखाली 

मनसोक्त जगण्याला फटका


जिथे आपण कुंपणात राहिलो 

तरी काय फरक पडतो 

तिथे आपण असलो नसलो 

तरी काय फरक पडतो


माझा कुणाला म्हणू की नको 

जिथे हा संभ्रम पडतो 

मनमोकळे करावे कुठे

दैनंदिन असा प्रश्न अडतो


जिथे आपण बोललो न बोललो

तरी काय फरक पडतो 

तिथे आपण असलो नसलो

तरी काय फरक पडतो


हक्कासाठी कुणाशी भांडाव 

हट्ट करावा की जिद्द धरावी

जिच्यासाठी आटापिटा करावा 

ती गोष्टच आपली नसावी


जिथे आपण हसलो रडलो 

तरी काय फरक पडतो 

तिथे आपण असलो नसलो 

तरी काय फरक पडतो


जगात आपलं म्हणवणार 

अस खरंच कुणी नसतं

आपल्यापेक्षा सरस मिळालं की 

तेच परक होऊन जात असत


जिथे आपण अलिप्त राहिलो 

तरी काय फरक पडतो 

तिथे आपण असलो नसलो 

तरी काय फरक पडतो


एक एक क्षण जिवनाचा 

कसातरी ढकलून काढतो

जगायचं म्हणून जगतांना 

स्वतःला हरवून बसतो 


जिथे आपण जगलो वाचलो 

तरी काय फरक पडतो 

तिथे आपण असलो नसलो 

तरी काय फरक पडतो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy