ओढ पावसाची
ओढ पावसाची
ओढ पावसाची
मेघूटात डोळे
रुक्ष धरित्रीला
श्रावण डोहाळे|
नांगर भुईत
सर्जा राजा ओढी
डोई कुणब्याच्या
कर्जाची गाठोडी|
तान्हेला चातक
गवसेना थेंब
मातीत बियाणी
नच दिसे कोंब|
धावताती नभ
कोरडे-कोरडे
जित्राबं उपाशी
आर्त हांबरडे|
ओढ पावसाची
मयुर नाचेना
पाहा रे केशवा
जगताची दैना|