Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ashwini Gunjal

Tragedy

3.1  

Ashwini Gunjal

Tragedy

वृद्धाश्रम

वृद्धाश्रम

1 min
1.1K


घरातून निघताना उंबरठ्यावरती उर भरून आला

क्षणात आयुष्यभराच्या आठवणींचा पडदा सरकून गेला

चालता चालता पडणारा तोलही पटकन सावरला

तरीही वृद्धाश्रमाच्या पायऱ्यांवरती पाय मात्र अडखळला


घर बदलले, नाती बदलली जसा नवीन जन्म देऊन गेले

आमच्यासारखे लाचार गरजू कित्येक जण तिथे पाहिले

आस असते सगळ्यांना आयुष्यात येईल एक असाही टप्पा

कोणीतरी येईल अन आपल्याशी मारेल मनमोकळ्या गप्पा


स्वतःच्या प्राणापेक्षाही जपलं होतं त्या आईने

स्वतःच्या इच्छांना मारून वाढवलं होतं बापाने

आईच्या त्या दुधाचा तुला विसर कसा पडला

बापाच्या कष्टाचा हिशोब तुला नाही का लागला


आश्रमात आज स्वतःला इतरांमध्ये रमवलं

तरी क्षणभर तुमच्यासोबतचं आनंदी हसू आठवलं

माहित नाही नात्याला दृष्ट लागली कोणाची

आम्ही कसं अचानक वस्तू वाटू लागलो अडगळीची


इथे आलेले प्रत्येकजण एकमेकांचे आधार बनतो आहे

मिळालेली अर्धी भाकरीही गोड मानून खातो आहे

एक दुसर्‍याच्या आनंदात मानतो आहे सारं काही

कारण त्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्यायच नाही


फोनच्या रिंगकडेही मी कान लावून असते

इतरांच्याही नकळत हळूच गेटकडे डोकावून बघते

मुलगा घेऊन जाईल मला आशा मनाला लावते

कळतच नाही डोळ्याची पापणी केव्हा ओली होते


काहींची तर विचारपूसही नाही अशीच होरपळतात दुःखाने

मृत्यूनंतरही अग्नीसंस्कार होतो असाच बेवारसपणे

सांग बाळा आमचं चुकलं नक्की काय

आयुष्यात केलं पुण्यं काय, केलं पाप काय


समजलं या बदलणाऱ्या जगामध्ये तुला लाज आमची वाटली

विसरलास बाळा या जगाची ओळख आम्हीच तुला करून दिली

तुझ्या अडखळणाऱ्या पावलांना आधार हात माझे बनले

आमचे चांगले पायही आज तुझ्या वागण्याने अडखळू लागले


मला कळत नाही का उजवलीस तू कुस माझी देवा

माझ्या आईपणाचाही वाटतो आहे आज हेवा

नसतेच झाले आई तर आज पश्चात्ताप इतका झाला नसता

वृद्धाश्रमाच्या वाटेवरती जीव माझा गुदमरला नसता


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy