Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ajay Chavhan

Tragedy

3  

Ajay Chavhan

Tragedy

सांग तुझ्या आठवणींना....

सांग तुझ्या आठवणींना....

1 min
273

सांग तुझ्या आठवणींना

परत मजकडे येऊ नका ।

रात्री,बेरात्री येऊन मजला

दुःख आता देऊ नका ।।

जा ना स्मरणातून निघून

माझ्या सखे गं नेहमीसाठी ।

नाहीच मुळी तुझ्या हृदयात

प्रेम जरासाही माझ्यासाठी ।।

मीच का म्हणून अश्रु गाळू

नित्यदिन तुझ्या विरहात ।

मुक्त होऊ दे मजला आता

जगायचे आहे मज सुखात ।।

प्राण संकटात आणून नित्य

तुझ्यासाठी का जागायचे? ।

दगेबाज प्रेयसीसाठी का बरे

स्वप्न अंतरी सजवायचे? ।।

जा... लवकर निघून जा

माझ्या या आयुष्यातून ।

तुझ्या अशा वागण्याने गं  

फार दुखावलो मी आतून ।।

Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy