DATTA VISHNU KHULE

Inspirational

3.0  

DATTA VISHNU KHULE

Inspirational

आई

आई

3 mins
251



 आई म्हणजे ईश्वरीय स्वरूप आहे .आई म्हणजे एक आधारस्तंभ आहे रोजच्या जीवनात जगत असतांना आईनं आपल्यासाठी घेतलेले कष्ट , अपार वेदना सहन केलेले असतात , सर्वांचे जेवण झाल्याशिवाय आई जेवत कारण आईला वाटतं माझ्या सर्व परिवार पोटभर जेवला पाहिजे सर्वांचं जेवन झाल्यावर आई जेवत असतो उरलेल्या अन्नाचे आई खाते आणि कष्ट करण्याची ताकद आईपेक्षा कुणातच नाही, आपली आई आपल्या मुलांचे शिक्षण व्हावे म्हणून बिगारी काम करणारी आई , लग्न समारंभात  लग्नाचं स्वयंपाक करायला जाणारी आई, ते दिवस उन्हाळ्याचे भट्टी जवळ पोळ्या भाजताना आईच्या अंगाची लाही लाही व्हायची , दिवसभर आई भट्टी जवळ तप्त व्हायची आणि घरी आपल्या मुलांना अन्न बांधुन आणायची तिचे पिलं बिचारे तिची वाट पाहत असायची आली की तप्त ते अंग असायची तेव्हा थंड पाण्याने अंघोळ  करायची रात्र भर आईला झोप लागत नसे तरी कशीबशी सावरायची आणि दिवस उजाडला की पुन्हा कामाला लागायची आपल्या पिलाला आवरून शाळेत पाठवायची.

 तिचे एकच स्वप्न होते की मुलगा शिकला पाहिजे मुलांच्या शिक्षणासाठी वाटेल ते काम करणारी आई म्हणजे जणू एक खूप मोठं त्यागाच प्रतिक , कधी रोडवरच्या चालू असलेल्या कामावर पाणी टाकायला, कधी अनवाणी पायाने वनांतून मोळी आणणारी आई , आपल्या मुलांच्या सुखासाठी व्रत वैकल्य उपास तपास करणारी आई , पती व्यसनी असला तरी आपल्या वडिलांच्या नावासाठी त्रास सहन करणारी आई खरंच दोन्हीही कुळाचा उधार करते  वडिलांना आर्थिक हातभार लावणारी आई, आपल्या कमी सुविधा असूनसुद्धा आई कधीच कुणापुढं  आपलं दुःख न मांडणारी आई , आईचे श्रेष्ठत्व शब्दांत मांडणे खरच खुप कठीण आहे


 काय वर्णू आईची महंती

 वास्तल्य आणि त्यागाची मूर्ती

 मज आई समान साई

 आई सारखं दैवत जगी नाई 



 आईची महिमा सांगताना मन अस गहिवरून येतं ते शब्दांत व्यक्त करू शकत नाही दिन रात राबणाऱ्या आईला स्वतःसाठी कधी एखादी साडी चप्पल पण खरेदी करत नाही चप्पल जर तुटली तर शिवून घालणारी आई , मुलगा शाळेत जातो म्हणून त्याला शूज बूट घेऊन देणारी आई , 

 सणासुदीला कधीच साधी राहणारी आई त्यागाचे प्रतीक आई , घरात कुणी आजारी पडलं ना रात्रभर जगणारी आई,  स्वतः काहीच न खाता तशीच उपाशी राहणारी आई कारण माझ्या मुलांन काहीच खाल्लं नाही मला कशी गिळेल भाकर , मुलगा कधी बरा होईल यासाठी चिंतातूर असणारी आहे . आई म्हणजे आदिशक्ती , जगदंबा , दुर्गा , काली , चण्डिका, असे विविध रूपे ही आईतच आहे. घरकाम करून इतर चार घरांची भांडी घासून मुलाला ips Ias बनवण्यासाठी धडपड करणारी आई , नगरपालिका मध्ये झाडाझुडचे काम करून आपल्या मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून काम करणारी ,

 दिवसाचे 18 तास कंपनी मध्ये काम करून आपल्या मुलाला मुलीला शिकवणारी आई , या social मीडिया पासून अलिप्त असणारी आई , छत्रपती शिवरायांना घडवणारी राजमाता जिजाऊ, कितीही संकट आले तरी धर्म आणि संस्कृती जतन करण्यासाठी मरण आले तरी चालेल असे संस्कार देणारी आई,  धाडसी निर्णय घेणारी आई आपल्या कुटुंबाची धुरा सांभाळ नारी, आपल्या पतीच्या सुखदुःख यात सामावून घेणारी आई,  जीवनातील खडतर आणि कठीण प्रसंगीं आई सावरते , आपल्या बालपणी आपलं बाल हट्ट पुरवणारी आई ,


 आईविना जग हे अधुरे

 आईतच आहे दैवते सारे

 आईची महिमा गाई रान पाखरे

 आईविना रान पाखरे होती कावरे - बावरे 


 याबद्दल खूप।लिहता येत आई एक महाकाय काव्यआहे ,  

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आहे , ज्याला आई नाही अशांना विचारा आईचे महत्व काय असते , जर एकच दिवस आई नसली काय गडबड होते बघा , आई असली घर कस गजबलेलं असत ज्या प्रमाणे एखादी यात्रा भरली की सगळी कडे अंडी आनंद असतो गर्दी असते पण यात्रा संपली फक्त  त्या आठवणी राहतात . आई म्हणजे। ईश्वरीय अवतार आहे असे माझे मत आहे , ईश्वराचा अंश म्हणजे आई बस्स .....इथेच थांबतो माझी लेखणी काय एवढी नाही की याबद्दल लिहू पण चार शब्द सर्वांच्या आईला अर्पण करतो ज्यांना आपल्याला शिकवलं मोठं केलं  धन्यवाद



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational