Anuja Dhariya-Sheth

Classics

4.0  

Anuja Dhariya-Sheth

Classics

बाप्पाचा प्रसाद... मुलाचा जन्म

बाप्पाचा प्रसाद... मुलाचा जन्म

2 mins
276


अह... हम्म.. तनू कण्हत होती..


काय होतंय? झालं आता.. ५ मिनिटच... तूला मुलगा हवा की मुलगी? डॉक्टर शुभांगी आपुलकीने विचारत होत्या..तसे त्यांचे जुने संबंध.. त्यामुळे डॉक्टर काकू अगदी तीचा हात हातात घेऊन डॉक्टर धीर देत होत्या..

मला काहीही चालेलं... तनु म्हणाली..


मनात मात्र विचार सुरू होते.. कारण तिच्या माहेरी कोणालाच मुलगा नाही. त्यामुळे काहीतरी दोष असेल असे सर्व बोल लावत होते... मनात भीती, हूरहूर असे संमिश्र भाव येताच एक भाव मनात यायचा.. अगं बाळ आहे तें काहीही असो.. त्याचे स्वागत कर.. तेवढ्यात डॉक्टरांचा आवाज... अभिनंदन... मुलगा झालाय... हे वाक्य ऐकले आणि तनूच्या डोळ्यातून पाणी आले.. सिझर कराव लागलं.. अर्धवट ग्लानीत असणारी तनू आता हे ऐकल्यावर डोळे मिटून पडून राहिली शांत.. आज संकष्टी.. अगदी ठरवून केल्या सारखा योग जुळून आला बघ.. डॉक्टर म्हणत होत्या.. पण तनू मात्र अर्धवट ग्लानीत मागच सर्व आठवत होती..


गणपतीवर अफाट श्रद्धा होती तिची.. लग्न जमल गणपतीतच.. पहिल्या मुलीचा जन्म अनंतचतुर्दशीचा.. पण सर्वांनी जेव्हा मुलगी झाली म्हणून बोल लावले तेव्हा तिला गणपतीचा राग आला... भांडण केले तीने बाप्पा सोबत... बाप्पा पण रागावला.. तो यायच्या वेळेस नेमकी हिची पाळी... सासरी कडक.. त्यात सासूबाईंचे बारीक लक्ष हिच्या हालचालींवर त्यामुळे लपवायच म्हटलं तरी शक्य नसे...


मुलगी ३ वर्षाची झाली.. आता परत गणपती आणि पाळी एकत्र होते.. सासूने गोळ्या घ्यायला सांगितले.. हिने ऐकून न ऐकल्यागत केले, आणि सोडून दिले सर्व बाप्पावर.. घरात बाप्पा आला.. हिला खूप टेन्शन.. पण वेळ निभावून गेली.. आठ दिवस वर गेले तरी पाळी नाही.. बाप्पा विसर्जनाची वेळ झाली.. हिला नुसते चक्कर.. उलटी.. मळमळ.. नवर्याला सांगून किट मागवले, टेस्ट केली पॉसिटीव्ह... आता काय करायचं? मनातून तयार नव्हती.. खूप रडली.. तिला नको होत बाळ... दोन्ही आईनं समजुत काढली.. बाप्पाने जाता जाता प्रसाद दिलाय त्याला नाकारू नका.. आणि नाकारायच असेल तर परत कधीच विचार करू नका..


दोन्ही आई एवढ्या कडक भुमिकेत पाहून तनूने माघार घेतली.. मुलगी लहान त्यात हि अवस्था.. हे सर्व पार करत आज बाप्पाच्या आशिर्वादाने मिळालेला प्रसाद तिच्या हातात होता.. असा प्रसाद ज्यानें ह्यांच्याकडे साऱ्या मुलीच आहेत हा कलंक मिटवून टाकला होता... तनूने ग्लानीतच बाप्पाचे आभार मानले.. खरच ह्या वर्षीचा बाप्पा तिला अगदी कायम सोबत राहीलं असा प्रसाद न मागता देऊन गेला होता...


मुली या तर दोन्ही घरचे नाव रोशन करतात.. पण अजूनही बऱ्याच ठिकाणी मुलगी हि कलंक अशी अंधश्रद्धा मानली जाते.. त्या वरून ही कथा सुचली आहे.. कोणालाही दूखावणे हा हेतू नाही.. कथा पूर्ण काल्पनिक आहे... कशी वाटली कथा? आवडली असेल तर खाली ❤️ असा आकार आहे तो नक्की प्रेस करा.

 अभिप्राय द्यायला विसरू नका हं..!! अर्थात तुमच्या कंमेंटमधून.. अजून लेख वाचत राहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका.... साहित्य चोरी हा गुन्हा आहे.

सदर कथेच्या प्रकाशनाचे, वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे याची नोंद घ्यावी.  कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.



Rate this content
Log in

Similar marathi story from Classics