Anuja Dhariya-Sheth

Inspirational

4.0  

Anuja Dhariya-Sheth

Inspirational

प्रत्येक वेळेस तो दोषी नसतो

प्रत्येक वेळेस तो दोषी नसतो

5 mins
326


घटस्फोट हा शब्द ऐकला तरी अंगावर काटा येतो ना.. ऐकणे दूर कल्पना तर करवतच नाही. खरं तर घटस्फोट म्हटला की कायदा आला आणि सर्व कायदे हे माञ तिच्या बाजूनी असतात पण या घटस्फोटाचा त्यालाही तितका त्रास होतो. याचा विचार या समाजात कोणी तरी करतं का स्त्रियांच्या दृष्टीने असणारे कायदे.. त्याचा स्त्रिया बऱ्याच वेळेला गैरफायदा घेत असतात पण या सगळ्यातून जाताना तो सुद्धा जरी तो पुरुष असला तरीसुद्धा तो कोलमडून जातो त्याला उभ राहायला किती त्रास होतो याचा कोणीतरी विचार केला आहे का? आज आपण अशीच 'त्या'ची कथा बघणार आहोत. घटस्फोट म्हंटला की बदनामी ही फक्त स्त्रीच नाही हो पुरुषाची ही तितकीच होते त्यांच्या चारित्र्यावर त्याच्या घराण्यावर देखील शिंतोडे उडवले जातात या बदनामीची भीती जितकी स्त्रीला असते तितकीच पुरुषालाही असते. आजू बाजूला बघितलेल्या घटना यावरून ही कथा लिहिण्याचा मी प्रयत्न करत आहे.


चिंतन काय झालंय? असा काळोखात का बसलायस? बाबा काळजीने चिंतनला म्हणाले.


बाबा काय करू मी? कशी वागते ही.. मला.. मला सोनलला भेटायचं.. मला नाही भेटून ती.. उद्या सोनलचा वाढदिवस आहे. उद्या दहा वर्षाची होईल माझी लेक.. मी बाप म्हणून फेल आहे का हो बाबा खर सांगा मला...


अरे चिंतन अस का बोलतोयस तू.. आपल्याच नशिबाला हे भोग आले, त्याला काय करायचं? सांग बरं मला... आई त्याची समजूत घालत त्याला सांगत होती.


बघितलस ना आई, हिने इथे येऊन कसा तमाशा केला.. किती बदनामी केली आपली.. आजूबाजूचे लोक सगळे तमाशा बघायला कसे उभे होते. काहीच कसं वाटत नाही ग आई हिला.. चिंतन म्हणाला..घटस्फोट हिलाच हवा होता म्हणुन पेपर तयार केले, तू किती समजून घेतलस तिला.. पण तिलाच ईथे राहायचं नव्हते, आता घटस्फोटाच्या पेपर वर सही करत नाही मला सोनलला भेटूनही देत नाही. सारखं इथे येऊन तमाशा करते मला नाही सहन होत आता.. आपण हे घर तिला देउन टाकू.. आपण दुसरीकडे जाऊ... चिंतन अगदीं हतबल झाला होता..


नीता आणि चिंतन यांचे लग्न होते.. चिंतन साधा सरळ मुलगा चांगल्या संस्कारात वाढलेला. छक्के पंजे त्याला कधी माहितीच नव्हते. निताशी लग्न झाले वाटलं सगळ्यांसारखा आपण सुद्धा सुखी संसार करू मात्र वेगळ्या संस्कारात वाढलेली मुलगी होती. चिंतन सोबत समरस होण्याचा तिने कधी प्रयत्नच केला नाही. तिला त्याचे आई बाबा बहीण भाऊ कोणीच खपत नव्हते. पण चिंतनने मात्र तिच्या आई आई-बाबांचं बहीण-भावांचा सगळं करावं असं तिला वाटायचं.


घरात भांडण नको म्हणून काही काही महिन्यातच चिंतनने बदली करून घेतली अन् चिंतन आऊट ऑफ इंडिया राहिला गेला. दोघ जण तिकडे असू तर काही कटकट होणार नाही, आईला काही त्रास नाही. आईने आयुष्यभर सोसल आहे आणि आता हीच का बर ऐकावं आईनं.. असे चिंतनला वाटायचं.


चिंतनची आई मात्र अगदी साध्या स्वभावाची होती. तिला कधी कुणाला उलट बोलणे जमतच नव्हतं, म्हणूनच तर आधी सासुरवास आणि आता सूनवास तिच्या नशिबी आला होता. चिंतनने आई-बाबांना बदल म्हणून त्याच्याकडे एक महिन्यासाठी राहायला बोलावले. ते येताच नीताने आदळाआपट करायला सुरुवात केली. जसं तू तुझ्या आई बाबांचा खर्च केलस तस् माझ्या आई बाबांचा खर्च करून त्यांना इकडे बोलव असा हट्ट ती करू लागली. चिंतनला काय बोलावं काहीच कळत नव्हतं.. खरं तर तिच्या आई-बाबांच्या इथे येण्याने त्याला काहीच प्रॉब्लेम नव्हता. स्वतःच्या खर्चाने ते आले असते तर इथला पुढचा खर्च मी करीन असं त्याचं म्हणणं होतं. कारण त्याच्या कंपनीतर्फे फक्त त्याच्या फॅमिलीचे तिकीट आणि बाकी सर्व खर्च मॅनेज होणार होता. पण ऐकेल ती नीता कसली...


भांडण वाढत गेल, अनेक कारणांनी खटके उडत गेले. तरी चिंतन जेवढे शांतपणे सांभाळता येईल तेवढे सांभाळत होता. परत थोड्या दिवसांनी दोघेजण आपल्या मायदेशी परतले, आणि गोड बातमी आली चिंतनला वाटलं आता तरी हिचा स्वभाव बदलेल पण नाहीच ओटी भरण्याच्या वेळेस सुद्धा तिने सासूला काहीच न विचारता आईच्या म्हणण्याप्रमाणे सर्व काही केलं. जातांना सर्व दागिने घेऊन गेली आणि सोनल झाल्यावरच बारसे होऊन सासरी परत आली. परत आल्यानंतर एकच होता कि मी त्यांच्या सोबत राहणार नाही. खरं तर सोनलला आई बाबांची गरज होती. कारण चिंतन आणि निता दोघेही नोकरी करणारे होतें.


चिंतनच्या आईने शक्कल लढवली त्यांच्या घरासमोर असलेल्या फ्लॅटचा तीने भाड्याने घेतला आणि ते दोघं समोर राहू लागले जेणेकरून सोनल वर पण लक्ष ठेवता येत होतं आणि भांडणे होत नव्हती. पण निताचा मूळ स्वभाव.. तो कसा बदलेल? हि मात्र आपल्या सासूला काही ना काही कारण काढून त्रास देण्याचे बघत होती. किती सहन केलं तरी शेवटी एक दिवशी चिंतनच्या सहनशक्तीचा अंत झाला आणि जे व्हायला नको ते झाले. चिंतन आपल आता ऐकत नाही हे समजल्यावर तिने घटस्फोटाचे पेपर आणले.


तिला असं वाटलं घटस्फोटाची धमकी दिली की, चिंतन आणि घरचे सगळे शांत होतील.. पण चिंतनच्या सहनशक्तीचा इतका अंत झाला होता की, त्यांनी एका क्षणात त्या पेपर वरती सही केली. आता मी नाही राहू शकत तुझ्यासोबत.. मला नाही सहन होत.. अस अर्धवट बोलून तो निघून गेला..


त्यामुळे नीताचा इगो दुखावला गेला. आता तिने चिंतन जिथे जाईल तिथे जाऊन तमाशे करणे, मग ते ऑफिस असुदे, कुठे मित्रांसोबत बाहेर जाणार असू दे, असं करत करत तिने येऊन हा मानसिक त्रास दिला. एवढा त्रास की त्याचे बाहेर जाणं तिने बंद करून टाकलं..


रोज रोज भीतीच्या छायेखाली राहत होते ते तिघे.. ही कधी येईल आणि कधी तमाशा करेल.. त्यात कायदे सर्व स्त्रियांच्या बाजूने त्यामुळे त्यांना काहीच बोलता येत नव्हतं, बघत राहण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नव्हता. नाहीतर ते काही बोलले तर ती धमकी देत होती की, मी घटस्फोट देणार नाही, मी सहीच करणार नाही, मी तुमच्यावरती उलट सुलट आरोप करीत राहीन.


बिचारा चिंतन आणि त्याचे आई-बाबा दिवसेंदिवस बदनामी होईल या भीतीच्या छायेखाली राहात होते. त्यांना नीताचा त्रास आता सहन होत नव्हता.


शेवटी एके दिवशी कोणालाही न सांगता राहत घर सोडून दुसरीकडे जाणे पसंत केले.. त्याला आता ५ वर्ष झाली पण अजूनही ते अज्ञात राहत होते. ते कुठे राहतात त्यांचा पत्ता काय आहे ते जास्त कुणाला सांगत नव्हते.

जास्त कोणाशी बोलत नव्हते कारण एकच होते इकडून तिकडून जर नीताला समजलं तर ती करेल त्या तमाशाला उत्तर देण्यासारखं यांना काही जमत नव्हते..


तारखेवर तारीख कोर्टात पडत होत्या.. पण ती मात्र सही करायला तयार होत नव्हती, चिंतन तिला वाटेल तेवढी पोटगी द्यायला तयार होता..


चिंतन इंजिनियर असल्यामुळे त्याच्याकडे पगाराला तोटा नव्हता, पैशाला तोटा नव्हता. पण म्हणतात ना मानसिक सुख नव्हतं. शेवटी सर्व नातेवाइकांनी एकत्र येऊन त्याला धीर दिला यांच्यात लक्ष घातलं आणि उंगली तेधी करून शेवटी घी काढले एकदाची तिने घटस्फोटाच्या पेपर वरती सही केली. महिन्याला मिळणारी पोटगी कबूल करून घेतली खर तर सोनलसाठी चिंतन सर्व काही द्यायला तयार होता कारण त्याचा त्याच्या मुलीमध्ये खूप जीव अडकलेला होता आणि याचाच गैरफायदा वारंवार नीता घेत होती...


काळ कोणासाठी थांबत नाही, घटस्फोट होईपर्यंत चिंतनची चाळिशी उलटून गेली.. एवढा कटू अनुभव आल्यावर लग्न संस्थेवरचा त्याचा विश्र्वास उडाला.. आता सगळे बहिण भाऊ आपल्या संसारात व्यस्त आहेत, आईबाबा आणि चिंतन तिघेच राहतात पण अजुनही अनोळखी नंबर वरून आलेला फोन पहिला की, कोणत्या कार्यक्रमात गेल की, कोणी घरी यायच म्हटले तरी त्यांचा मनात एक प्रकारची धास्ती येते.. नीता येऊन काही तमाशा करेल का? बदनामी होइल का..?


ही एक सत्य कथा काल्पनिक विश्वात थोडीशी गुंतवली आहे . आपण नेहमी त्यालाच दोष देतो पण, प्रत्येक वेळेस तो दोषी नसतो...


कशी वाटली कथा? आवडली असेल तर खाली असा आकार आहे तो नक्की प्रेस करा.

आणि अभिप्राय द्या.. अर्थात तुमच्या कंमेंटमधून..

अजून लेख वाचत राहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका....


साहित्य चोरी हा गुन्हा आहे त्यामुळे लेख नक्की शेअर करा पण नावासहीत..



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational