kanchan chabukswar

Fantasy

4.5  

kanchan chabukswar

Fantasy

देवाची करणी

देवाची करणी

4 mins
435


जन भारती बँकेचे मॅनेजर श्री अरुण देशपांडे घाईघाईने बँकेमध्ये शिरले, घाईने त्यांनी आपल्या सेक्रेटरीला आत मध्ये बोलावून घेतले.


  देशपांडे यांच्या चेहऱ्यावरचे आश्चर्याचे भाव काही केले लपत नव्हते," गोकुळ पलक्कड, या नावाने आपल्याकडे खाते आहे का बघा आणि खात्यामध्ये किती रक्कम आहे ते मला सांगा."

सेक्रेटरी रिटा ला आश्चर्यच वाटले. तिने घाई घाईने बँकेच्या तळघरात असलेल्या ऑफिसमध्ये जाऊन आपल्या कंप्यूटर उघडला आणि खातेदारांची नावं शोधण्यास सुरुवात केली.

खरेच की गोकुळ पलक्कड याचं खातं अजबच दिसत होतं.

गेल्या महिन्यापर्यंत त्याच्या खात्यामध्ये आठशे-नऊशे एवढेच रुपये असतात पण या महिन्यांमध्ये मात्र त्याच्या खात्यावर ती दोन कोटी रुपये आले होते. काय फ्रॉड किंवा घोटाळ्याची केसे की काय. रिटा ने ताबडतोब गोकुळच्या खात्याचे प्रिंटाऊट घेतले आणि देशपांडे यांच्या केबिनकडे धावली.

      " गोकुळ आमच्या घरी दूध घालतो, दक्षिणेतून आलेला मुलगा आज तीन चार वर्ष झाले आमच्या कॉलनी मध्ये येऊन घरोघरी दूध घालायचं काम करतो. कधी दूध कधी पेपर कोणाकडे अंडी आणायची असेल तर कांदे-बटाटे इत्यादी म्हाताऱ्या लोकांना ब्रेड आणून देणे ही सगळी कामं गोकुळ हसतमुखाने करतो. माझ्या सांगण्यावरूनच त्याने आपल्या बँकेमध्ये खाते उघडले होते. आज सकाळी तो मला भेटला आणि म्हणाला की त्याला जनभारती बँकेचे शेअर्स विकत घ्यायचे आहेत, तेव्हा मी उडालोच. आपल्या बँकेचे एवढे महाग शेअर्स गोकुळ कस काय बरं घेऊ शकेल? आणि तू म्हणतेस की त्याच्या खात्यामध्ये दोन कोटी रुपये आलेत!" देशपांड्यांच्या कपाळावरती आणि तुळतुळीत टकलावर ती हळूहळू घाम येऊ लागला होता.

दुपारी एक वाजता ग्राहकांची वर्दळ थांबल्यावर पंधरा मिनिटाचा ब्रेक घेऊन देशपांड्यांनी बँकेची मीटिंग बोलावली.

कोणाच्या खात्यातून मोठी रक्कम वजा झाली का कुठे अफरातफर झाली का कुठे मोठा चेक आला का किंवा कुठला चेक वटला नाही का कोणाच्या खात्यामध्ये काही ढवळाढवळ झाली आहे का असं आणि इतर प्रश्न त्यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना विचारले. सगळ्यांनी नेहमीसारखेच उत्तरे दिली कुठेच काही "प्रकरण" झालं नव्हतं.


आता मात्र देशपांड्यांना आश्चर्याचे धक्क्यावर धक्के बसत होते त्यांनी ताबडतोब पुढच्या आठवड्यामध्ये गोकुळला आपल्या बँकेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले. बँकेमध्ये बाकीचे इन्वेस्टर देखील येऊन बसले होते. मोठ्या मोठ्या जागांवर काम करणाऱ्या लोकांकडे देखील एकरकमी दोन कोटी रुपये नव्हते मग दूध घालणाऱ्या साध्या मुलाकडे एवढे पैसे कुठून आले बरे?

सत्कार समारंभ स्वीकारताना गोकुळ अगदी लाजून लाजून गेला. शेवटी देशपांडे यांच्या आग्रहाखातर पैशाची गुंतवणूक कशी करावी किंवा काय केले म्हणजे पैसे वाढते हे सगळ्या लोकांना सांगण्यासाठी म्हणून तो उभा राहिला.

" मी केरळच्या छोट्या गावातून आई-वडिलांचं अपघाती निधन झाल्यावर ती आपल्या मामाकडे म्हणून मुंबईला आलो. मामाची परिस्थिती बेताचीच आमचं सगळं कुटुंबच अशिक्षित त्याच्यामुळे मामा च्या हाताखाली त्याचेच काम मी करायला लागलो. मामानी तरी पण मला दहावीपर्यंत शिकवले. साहेबांना तर माहितीच आहे दूध अंडी ब्रेड याच्या मधून असे कितीसे उत्पन्न येणार तरी पण आम्ही सगळे काटकसरीने राहत होतो गावाकडे माझी बहीण आहे म्हातारी आजी आजोबा आहेत त्यांच्यासाठी मी थोडे फार पैसे पाठवत होतो." गोकुळ अडखळत म्हणाला.

" घाबरू नकोस, तुझ्या यशाचे गमक आज आम्हाला समजलं पाहिजे सांग सांग!" कौतुकाने देशपांडे म्हणाले.


" गेले कित्येक वर्षात मी पोटभर जेवलो पण नाही, दुधाच्या पिशव्या पोहोचवताना आमच्या चहा मात्र काळाच राहिला, केरळचा मी कॉफी अतिशय प्रिय पण काळी कॉफी घशाखाली ढकलत देखील नव्हती. माझ्या आईने माझं नाव खूप विचित्र आणि मोठं ठेवलं होतं इथल्या लोकांना ते उच्चारता येत नव्हतं म्हणून मी मामाच्या सांगण्यावरून आधी माझं नाव बदलून गोकुळ असं केलं." गोकुळ म्हणाला.

" अरे ते सगळे आम्हाला माहित आहे तुम्ही दक्षिणेकडचे लोक तुमच्या गावाचं आजी-आजोबांचं नावआपल्या नावा बरोबर ठेवता. सांग सांग लवकर सांग तू कुठे गुंतवणूक केलीस कशी गुंतवणूक केलीस कुठल्या कंपनीने तुला एवढा फायदा दिला." न रहावून रिटा म्हणाली. आता सगळ्या स्टाफच्या आणि बाकीच्या लोकांच्या तोंडावरती उत्सुकताअगदी ताणली गेलेली होती.


"आमच्या गावामधला म्हातारा साधू माझ्या आईला म्हणाला होता की तुझ्या मुलाचं भवितव्य उज्वल आहे म्हणून. फक्त त्याच्या मध्ये एक अडचण आहे आणि ती म्हणजे त्याची 

स्वतःची सखे आई वडील."

 माझ्या आईला माझं भविष्य कदाचित माहिती असावं कारण तिचा अपघात झाला ती आणि अप्पा मृत्युशय्येवर असताना देखील तिच्या चेहऱ्यावर ती काहीतरी समाधान होतं, ती कायम माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवून मला म्हणत होती की आता माझं भविष्य एकदम उज्वल होणार आहे. तेव्हा मला काहीच समजलं नव्हतं.

 कशाचं भविष्यात कशाचं काय! दोन वेळेला जेवायचे मारामार कॉफीमध्ये दूध नाही, घालायला कपडे नाहीत मामाच्या घरी आश्रिता सारखा वाढलेले मी बहिणीला तुटपुंजे पैसे पाठवत होतो . ते तिकडे काय खातात काही कळत नव्हतं पत्र लिहिलं तरी तिकडून पत्र परत येत नव्हतं अशी परिस्थिती असताना कसलं काय कोण गुंतवणूक करणार."

         गोकुळच्या डोळ्यांमध्ये खेदाचे अश्रू दाटले होते.


" पुढे सांग पुढे सांग" म्हातारे कुलकर्णी जोरात म्हणाले. " मी पुढच्या वर्षी रिटायर्ड होतोय तुझ्या सारखी मी पण गुंतवणूक करीन म्हणजे माझ्या मुलाबाळांना भरपूर पैसे मिळतील" खुS खुS खुS हसत कुलकर्णी म्हणाले.


   " माझ्या वडिलांची धाकटी बहीण नर्स होती, घरातून पळून जाऊन तिने तिच्या आवडीच्या मुलाबरोबर लग्न केले होते, तेव्हापासून आमच्या घरामध्ये तिचे नावच घेतले जात नव्हते.

    आजी आजोबा तिच्या नावाचा उल्लेख देखील घरात करत नसत. माझं सुदैव की दुर्दैव माहीत नाही पण मी मात्र माझ्या आत्या शी संबंध ठेवून होतो. मी कायमच तिला दुबई ला पत्र पाठवत होतो आणि ती पण मला उत्तर देत होती.

           ह्या महामारी मुळे आधी तिचा नवरा गेला आणि तिला जोरदार इन्फेक्शन झालं. हॉस्पिटलमध्येच कामाला असल्यामुळे तिला तिचं भविष्य दिसत होतं. मरायच्या अगोदर तिने माझ्या नावावर ती तिचे सगळे पैसे केले आणि तेच हे दोन कोटी रुपये." गोकुळच्या गालावरून आता आता आत्याच्या आठवणीने अश्रू वाहू लागले.

“शेवटी त्या म्हातारबाबा चं भविष्य खरं ठरलं, पण ते असं खरं ठरावं अशी माझी मुळीच इच्छा नव्हती. आई-वडील ,आत्या ,आजी आजोबा मामा मामी त्यांची मुलं या सगळ्यांबरोबर राहून जर मला पैसे मिळाले असते तर माझ्या आनंदात खूपच भर पडली असती पण आता माझ्यासोबत आई-वडिलांच्या त्या फक्त आठवणीच आहेत" गोकुळ म्हणाला  आणि रहस्य वरती पडलेल्या पडदा उघडला गेला. शेवटी देवाचीच करणी नाही का? कोण कुठला गोकुळ, गरीब आई-वडिलांच्या गरिबीत राहणारा, कोण त्याची आत्या कुठे राहत असलेली आणि मरताना तिने मात्र गोकुळला कोट्याधीश  श्रीमंत केले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy