kanchan chabukswar

Children Stories

4.0  

kanchan chabukswar

Children Stories

मसाल्याच्या वनIतली चिकूची सैर

मसाल्याच्या वनIतली चिकूची सैर

4 mins
238


सहा वर्षाची चिकू फारच स्वप्नाळू होती. तिच्या कल्पनेच्या भराऱ्या उंच उंच उडत असत. बरोबरच आहे कुठे अहमदाबाद चे गुजराती वातावरण तर कुठे कर्नाटकातले कॉफीचे मळे, कशाचं काही संबंधच नाही.


 आजोळी आल्यावर ती कॉफी च्या मळ्यात खेळताना एक दिवशी ती खूपच दमली.

मिरीच्या वेळाच्या मांडवा खाली बसून अंमळ डोळे मिटले आणि स्वप्नरंजनात मग्न झाली.


   हिरवा परकर पोलका घातलेली चिकू हिरव्या वातावरणात हरवूनच गेली.


वेला वरून डोकावणारी शेंग चिकू जवळ येऊन हळूच उघडली. आत मधले मिरीचे दाणे चिकूला बोलवू लागले.

" चिकू ये! आत मध्ये खेळायला ये."


   चिकू ने परकराचI काचा मारला आणि अलगद शेंगेच्या उघड्या दारातून आत घुसली.


अरेच्या! ही काय! छोटी छोटी मिरी, छोट्या लवंग , एकमेकींत बरोबर फुगडी खेळत होत्या. छोट्या मिरी कबड्डी पण खेळत होत्या , काही थोड्या मोठ्या मेरी तर लोळण फुगडी खेळत होत्या, शेंगेच्या बाहेर जाऊ नये म्हणून तपकिरी रंगाच्या मिरी शेंगेच्या तोंडाजवळ उभे राहून संरक्षण करत होत्या.

 गोरा गोरा वेलदोडा आयटीमध्ये सगळीकडे लक्ष देऊन होता. मजाच मजा.


    सगळ्या छोट्या मिरी काळा पांढरा फ्रॉक घालून हुंदडत होत्या. तर लवंगा चिकू सारखा लाल रंगाचा परकर पोलका घालून खेळत होत्या.


     चिकू आत आल्यावर खेळ बघताना वेलदोडे यावर धडकली. त्या सरशी वेलदोडा फुटला, त्याच्या पोटातून दाणे बाहेर आले, वेलदोडा रडायला लागला, चिकूला फार भीती वाटली, दोन कॉफी च्या बिया आपसात बोलत होत्या चिकू पटकन त्यांच्या मागे जाऊन लपली.


      तेवढ्यात बाजूने एक मोठी मसाला वेलची आली, वेलदोड्याचे फुटलेले दाणे तिने एकत्र केले त्याच्या पोटात घातले आणि त्याला आपल्या पोटाशी धरले. छोट्या वेलदोड्याचे रडणे थांबले, तू खुदकन हसला आणि खेळायला गेला.


    चिकू लक्ष देऊन कॉफीच्या बियांचे बोलणं ऐकत होती." आजी आज मसाला बिर्याणी बनवणार आहे, तेव्हा सगळे मसाले ताजे पाहिजेत. ताज्या दालचिनी, तमालपत्र, लवंगा, सगळे गोळा करून ठेवायला पाहिजे." कॉफीच्या बिया बोलत होत्या.


   चिकूला नवलच वाटले, यांना कसं माहिती? बिर्याणी करणार आहे ते.


       अचानक बाजूने मिरी शेंग आली," चिकू तू आहेस का? चल आपण पतंग उडवू."


चिकूला रंगीबेरंगी पतंग खूप आवडत, शेंगेचा हात धरून ती म्हणाली," चल चल"


      शेंगेन चिकूला सांभाळून मिरीवेलीच्या मांडवावर ती चढवले. शेवरीच्या कापसाच्या म्हाताऱ्या तिथे उडतच होत्या.

" ये चिकू चल पतंग उडवू" म्हाताऱ्या म्हणाल्या.


छोटे छोटे रंगीबेरंगी पतंग, फुलपाखराचे पंख सारखे दिसत होते. तेवढ्यात तिकडून काही फुलपाखरू आली, त्यांनी आपले पंख काढून ेवरीच्या म्हातार्‍यांना दिले.

त्यांनी लगेच चरख्या वरती दोरा तयार केला, फुलपाखराच्या पंखांना दोरा बांधला आणि त्याचे पतंग तयार केले.

चमचमणारे रंगीबेरंगी पतंग बघून चिकू टाळ्या वाजवायला सुरुवात केली.


     शेवरीच्या म्हातार यांनी, फुलपाखराचे पंख, चिकूच्या पाठीमागे बांधले, आणि दोरा मोठ्या शेंगेला गुंडाळून वेलीवर ठेवला.


    लवंगा, मिरी, सगळ्याजणी वेलीवरती येऊन उभ्या राहिल्या आणि टाळ्या वाजवायला लागल्या.


" उडव उडव तू पतंग चीकू,

घे भरारी गगना वरती,

तिथून दिसते अवनी सुंदर,

कशी ते सांग येऊन सत्वर"

गोड गळ्याने गोरा गोरा वेलदोडा गाणे गाऊ लागला.


    पाठीमागे बांधलेले पंख फडफडायला लागले तशी चिकू वर वर हवेमध्ये गोल गोल गिरक्या घेत जाऊ लागली.

शेवरीच्या म्हातार यांनी दोऱ्याला ढील दिली. तशी चिकू अजून अजून वर वर जाऊ लागली.


   आकाशामध्ये मुक्तपणे तरंगताना, तिला एक घार भेटली, " माझी बाळ बघायची का तुला चिकू?" घार पण प्रेमळ आवाजात म्हणाली. चिकूच्या हाताला धरून घारीने एक डौलदार वळण घेतले आणि आपल्या घरट्या वरून तिला सावकाश घेऊन गेली.


 घारीच्या घरट्या मधली छोटी छोटी गोड बाळ बघून चिकूला खूपच आनंद झाला." घारुताई तुझी बाळ किती गोड आहेत, मी त्यांना खाऊ देईन, आजोबांना सांगून तुझ्या बाळांसाठी मी ताजे मासे पाठवीन."


घार समाधानाने हसली, तेवढ्यात दूरवरून एक मोठा काळा कावळा आला. " बघ न चिकू, माझ्या घरट्यामध्ये मी घालतो त्यापेक्षा जास्त अंडी असतात. काही समजत नाही बघ. तूच सांग, माझी अंडी कुठली? आणि दुसर्‍याची कुठली?"


चिकू काही बोलणार तेवढ्यात, कुहुकुहु आवाजात कोकिळा बोलू लागली." सांगू नको सांगू नको ग, चिकू, सांगू नको ग." उन्हाळाभर मला गाणी गायची असतात, अंडी केव्हा उबवणार ? म्हणून गुपचूप कावळ्याच्या घरात आणून टाकले. तसे मी त्याला कैर्‍या, आंबे, चिंचेचे अकोडे, सगळे तर देत असते."


    हळूहळू उडत-उडत चिकू आपल्या घरावरती आली. अंगणामध्ये बसून आजी मसाला तयार करत होती, आजोबा झोपाळ्यावर बसून मंद मंद झोके घेत पेपर वाचत होते.

" काय हो! चिकू आली की नाही अजून मळ्यातून?" आजी-आजोबांना विचारत होती.


 चिकू न वरून बघितले

 , तर तमालपत्र ची बोट दालचिनीच्या साल पटाना घेऊन तयार होती. काही मोठी तमालपत्र बाकीचा मसाला एकत्र करण्यात गुंतली होती, जायपत्री ची फुलं, चक्रफुल, दगडावर वाढणार दगड फुल, काही मोठी फुलपाखरं हे सगळं मसाल्याचा सामान तमालपत्रच्या बोटीमध्ये भरण्यामध्ये मग्न होती. गाणी गुणगुणत एकमेकांना सांगत होती.


चिकूला हसूच आलं. तिने शेवरीच्या म्हातारीला विचारलं," काय ग, मी अशीच उडत उडत माझ्या बाबांना भेटून येऊ का?"


   शेवरी ची म्हातारी गोड हसली," नाही हो बाळ, आमचा कापूस एवढा मोठा नाही, पण ना, मी काही पंख तुझ्या बाबांकडे पाठवून देते, म्हणजे ते पण लवकरच येऊन तुला भेटतील. "


" नक्की?" चिकू ने विचारले

" हो हो नक्की." फुलपाखरं, म्हातारी, शेंगा सगळे एका सुरात म्हणाले.


तेवढ्यात दुरून एक मोठं फुलपाखरू येताना दिसलं, वेगळेच रंगाचं होतं, आणि बघतो ते काय, फुलपाखरावर चक्क बाबा बसले होते.

 आनंदाने टाळ्या वाजवल्या चिकू न, " बाबा बाबा " हाक मारली .


    कोणीतरी चेहऱ्यावरून प्रेमळ हात फिरवत तिला उठवत होतं. " चिकू उठ चल घरी, इथे काय बसली आहेस?"

चिकू नि डोळे उघडले बघते तो काय समोर बाबा.


" आलात तुम्ही बाबा" चिकूने बाबांच्या गळ्याला मिठी मारून आनंदाने चित्कार केला. तिने स्वतःच्या पाठीवरती चाचपडून बघितले, र 'अरेच्या पंख कुठे गेले" चिकू म्हणाली.


  “ अगं झालं का तुझं दिवसा ढवळ्या स्वप्न बघत असतेस ते, चल घरी, आजीने मस्त बिर्याणी केली आहे.”

 बाबा हसून म्हणाले, त्यांनी चिकूला कडेवर घेतले. " बाबा तुम्हाला शेवरीच्या म्हातारीने पंख पाठवले होते का? तुम्ही इतक्या लवकर कसे आलात?" चिकूने गोड आवाजात विचारले.

     " पंख! हो पाठवले होते मी आत्ताच तर घरी काढून आलो आहे." बाबांनी पण चिकूच्या कल्पना रंजनाला जोड दिली.


    चिकू ने मागे वळून मिरीच्या वेली कडे बघितले आणि गोड टाटा केला.

वरतून भिरभिरणार्‍या फुलपाखराला तिने सांगितले " उद्या परत येईन हो"


Rate this content
Log in