kanchan chabukswar

Others

4.0  

kanchan chabukswar

Others

करामती चिकू...

करामती चिकू...

4 mins
151


    खरं म्हणजे चिकू अहमदाबादला राहायची, पण सुट्टी मध्ये ती तिच्या आजोळी कर्नाटका मधल्या चिकमंगळूर ला आली होती.

   आजोबा मोठे मान-मरातब वाले वजनदार गृहस्थ. शंभर एकर कॉफीची इस्टेट आणि स्टेट इलेक्शन मध्ये उभा राहण्याचा देखील नाद. तसे आधी सरपंच मग प्रांत विभागातले पार्टी चे इलेक्शन, एक एक पायरी चढत होते. मोठे श्रीमंत गृहस्थ. तसा चिकमंगळूर मध्ये शेट्टी आणि गवडा यांच्यामध्ये कट्टर वैर. शेट्टी उभा राहिला तर गवडा पण उभा राहणार, पण त्या दोघांना एवढे कळत नव्हते की दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ व्हायचा आणि भलताच माणूस निवडून यायचा.


   त्या इलेक्शनच्या वेळेला चिकू आजोबांकडे आली होती. आजोबांना भेटायला बरेच वृद्ध गृहस्थ यायचे, आपले प्रश्न घेऊन कटकटी घेऊन, इस्टेटीची कटकट, पाण्याचा विजेचा प्रश्न, आणि बरेच काही. तसं म्हणजे चिकमंगळूर मध्ये त्यांचं गाव एक खेडेगाव होतं, पण सगळे गर्भश्रीमंत. त्यामुळे मोबाईलचा टावर, रोजचा न्युज पेपर, पेट्रोल पंप, सगळ्यांमध्ये चिकूच्या आजोबांची भागीदारी होती. जवळ जवळ ते अनभिषिक्त सम्राट होते.


  यावेळच्या इलेक्शन मध्ये मात्र पार्टी श्रेष्ठींनी सगळ्यांना जाम दम दिला होता ती काहीही करा पण आपली “मशाल” सगळीकडे निवडून आले पाहिजे.

आजोबांच्या भल्यामोठ्या वाड्यामध्ये सकाळ-संध्याकाळ मीटिंग होऊ लागल्या. “मशाल” मशाल “सगळीकडे पोस्टर छापले, वाटले गेले, एकच चर्चा. भरपूर गाणी पण लिहिली गेली ह्या वेळेला मात्र आजोबांनी अगदी चंगच बांधला होता.

तसे त्यांच्या गावांमध्ये बहुतकरून वृद्ध मंडळी राहत. आपापल्या इस्टेटीची देखभाल करतात. परदेशातल्या मुलांना पैसे पाठवत किंवा त्यांना पाठवत असे व्यवस्थित खाऊन-पिऊन राहणारे सगळे शेतकरी गावांमध्ये राहत.


आजोबांनी मिटिंग घेतली आणि गावकऱ्यांना सांगितलं की मुलाबाळांना पंधरा दिवसांसाठी तरी परत बोलून घ्या आपल्याला मतं मिळाली पाहिजे तरच आपल्या भागाचा विकास होईल. मुलं नाही आली तर त्यांच्या वयाचा कोणी घेऊन या.


   बोलता-बोलता इलेक्शन चा दिवस उजाडला. बंदोबस्तामध्ये ईव्हीएम ची मशीन गावामध्ये येऊन थडकली.

गावातल्या शाळेमध्ये इलेक्शन बूथ स्थापण्यात आलं. अर्थात शाळा चिकूच्या आजोबांची.


    नको नको म्हणताना देखील चिकू आजोबांच्या बरोबर इकडे तिकडे जायला लागली. नागराज ड्रायव्हर बरोबर ती पण लोकांना आणायला त्यांच्या घरी जायला लागले. येता करता 56 आजोबांना भल्या मोठ्या गाडीमध्ये घालून नागराज ने इलेक्शन बूथ वर आणले. आजोबा मध्ये काही शेट्टी होते तर काही गवडा होते, कोणी का असेना चिकूच्या आजोबांचं जोरदार फर्मान होतं "घराघरातून माणस उचला आणि इलेक्शनच्या शाळेमध्ये घेऊन या."


  एक नव्वदीच्या आजोबांना कोणी हाताला धरून इलेक्शनच्या खोलीपर्यंत आणलं. लहान मुलगी म्हणून तिला पण आत सोडण्यात आलं. आजोबांनी थरथरत्या हातावरती शाईची रेघ ओढून घेतली आणि चिकूच्या आधाराने आडोशाला पाशी जाऊन उभे राहीले.

समोरचं ईव्हीएम मशीन असून त्यांना काहीच दिसत नव्हतं, चिकू नि अंदाज घेतला आणि पटकन त्यांचा हात धरून मशाली वरती बोट ठेवलं आणि बेल वाजवली. मतदान झालं.

जवळजवळ 60 म्हाताऱ्या आजोबांना चिकू नि व्यवस्थित रित्या आडोशाला मागे नेलं ईव्हीएम मशीन पाशी उभं केलं आणि पटकन स्वतःच्याच हाताने मशाली वरती बोट ठेवून बेल वाजवून टाकले.


लहान मुलगी असल्यामुळे एवढी चुणचुणीत मुलगी मदत करते बघितल्यावर ती इलेक्शन ऑफिसर न त्याच्यामध्ये काहीच वावगं वाटलं नाही त्यामुळे दिवसभर चिकू तिथेच थांबली आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना मदतीची ज्यांना पण गरज आहे त्यांच्याबरोबर जाऊन तिने पटकन मशाली चे बटन दाबून टाकले, अर्थात हे तिने कोणाला सांगितले नाही.

चिकूला मधून मधून खाण्यासाठी गोड द्राक्षे कॅडबरी चॉकलेट , बर्गर, इडली असे छान छान पदार्थ सतत येत राहिले त्याच्यामुळे तिला मजाच वाटत राहिली.


अशा रीतीने दिवस आनंदात संपला.

दुसऱ्या दिवशी मतपेटी बंदोबस्तामध्ये मोजणी साठी म्हणून एकत्रित करण्यात आल्या.

निकालासाठी गवडा आणि शेट्टी आतुरतेने वाट बघत होते. शेट्टीची खूण पेन्सिल तर गवडा पार्टीची निशाणी मशाल होती. कोण जिंकणार? सगळ्यांमध्ये उत्सुकता लागून राहिली होती. बाकीच्या अपक्ष उमेदवारांना जास्त कोणी भाव देत नव्हता पण पेन्सिल आणि मशाली मध्ये अटीतटीची टक्कर होती. चिकूचे आजोबा या वेळेला फारच टेन्शनमध्ये होते पण चिकू न आत मध्ये जाऊन काय करामत केली हे त्यांना माहीतच नव्हतं.


शेवटी निकाल जाहीर झाला आणि गवडा पार्टीची दणदणीत जीत झाली. शेट्टी उमेदवाराचं तर डिपॉझिट देखील जप्त झालं.


सगळ्यांनीच तोंडात बोट घातले. कारण बरेचसे म्हातारे आजोबा शेट्टी पार्टीला मत देणार होते मग असं कसं झालं?


रात्री सगळे झोपले बघून चिकू हळूच आजोबांच्या कुशीत शिरली आणि तिने ईव्हीएम मशीन मध्ये तिने केलेली गडबड हळूच आजोबांच्या कानात सांगितली. आजोबा जाम खुश झाले. खरं म्हणजे असं करायला तिला कोणी सांगितलं देखील नव्हतं, पण आजोबांची धडपड त्यांच्या पार्टीची असलेली निशाणी " मशाल " हे तिला पूर्ण माहिती होतं.

ठीक ठिकाणी लागलेले होर्डिंग्स, पोस्टर याच्यावरून तिला आजोबांच्या पार्टीची निशाणी आणि उमेदवार हा पक्का माहिती झालेला होता. बस बालसुलभ बुद्धीने सगळ्या आजोबांच्या हाताला धरून ती त्यांना आधार देऊन आत घेऊन तर गेली, आत मध्ये पण बटण मात्र मशाली समोरच दाबले. मशीन चे बटन दाबल्यावर लागणाऱ्या लाल दिवा त्याच्यातून येणारा आवाज सगळे ची तिला खूपच मजा वाटत होती म्हणून तिने प्रत्येकच आजोबांना मदत करायचे ठरवले आहे की नाही मज्जा.

तेव्हापासून इलेक्शन असलं की दरवर्षी चिकू आणि तिच्या भावाला आजोबांकडे खास निमंत्रण असतं.


कोणाला सांगू नका बरं! खास गुपित आहे.


Rate this content
Log in