Stifan Khawdiya

Others

4.0  

Stifan Khawdiya

Others

दिवाळी कालची आणी आजची.

दिवाळी कालची आणी आजची.

1 min
263


मुलाला अंगणात दिवे पेटवतांना पाहून

आठवणी ताज्या झाल्या.

त्या रम्य रात्री आठवात गहिवरून 

भुतकाळाचा सामना करावा लागला.

अनाथ आश्रमच्या अंगणात कुणाच्या तरी, 

दयेखाली अनाथांची साजरी होत असे दिवाळी...

उटणं कसल साधा अंगाचा साबण नाही. 

तर कपडे धुण्याच्या गोटा साबणाने अंधोळ .

कुणाचे तरि जुणे कपडे.

स्वताच तयार केलेले मातीचे दिवे . 

टाकाऊ वस्तू पासुन केलेला आकाश कंदील. 

रंगीत खडुन काढलेली वेडीवाकडी रांगोळी.

कुणाच्या तरी कृपेणे मिळालेला फराळ. 

दिवाळीचा सण म्हणून संध्याकाळच्या जेवनात 

खिर चपातीचा स्वाद.

त्यातल्या त्यात कोणा पुढा-याच्या राजकारणत 

फटाके फोडायला मिळाचे.

नाही तर अंगणात बसुन एकटक आकाशत पहाण.

कधी कुणी ओवाळल नाही अन् पाडवा काय माहीत नाही..

तरि दिवाळी आम्हा अनेक अनाथ मुलांसाठी आनंदाची गोष्ट होती..

अशा अनेक दिवाळ्या गेल्या..

बघता बघता अनाथ आश्रमतच स्वताच

विश्व निर्माण केल..

कालांतराने अनाथ आश्रमतुन स्वताच्या पायावर

उभ राहाण्यासाठी बाहेर काढलं. 

आता आश्रमात स्थान नव्हतं.  

पुढचं आयुष्य हिम्मतीन जगायचं होत 

त्यात पण सारं जिंकलं होत .. 

मी अनाथ कोणाचा तरी आता सहारा आहे.

सार चित्र कसं बदललं. 

अन् आज दिवाळीच्या रात्री मुलाला दिवे पेटवतांना 

आठवणी ताज्या झाल्या अन् प्रश्न निर्माण झाला..

ती दिवाळी कालची कशी होती.

अन् आजची दिवाळी कशी आहे.


Rate this content
Log in