Stifan Khawdiya

Others

4.0  

Stifan Khawdiya

Others

नातं मैत्रीच

नातं मैत्रीच

1 min
143


नातं जन्मानं निर्माण होतं 

नातं प्रसंगानं निर्माण होतं 

नातं काळाच्या कतृत्वान निर्माण होतं

नातं प्रेमान निर्माण होतं 

नातं परिस्थितीन निर्माण होतं

अन् ह्या सा-या परिपाकातून 

एकच नातं निर्माण होतं 

ते म्हणजे फक्त

मैत्रीचं नातं 

मैत्रीचं नातं 

मनुष्य हा एकटा राहु शकत नाही. 

जिवनात वावरतांना त्याला मैत्रीची गरज भासते.

अगदि बालपणापासून तर वृध्द होई पर्यंत.

मैत्रीसाठी वयाची मर्यादा नसते.

मैत्री कोणासोबत ही होऊ शकते.

दोन अथवा जास्त व्यक्ती मधील स्वभाव, विचार, व्यक्तिमत्त्वाची जुळणी झाली कि मैत्रीचे घनिष्ठ संबंध निर्माण होतात.यात विश्वास,निस्वार्थीपणा, मनमोकळेपणा,बिनधास्तपणा,पदोपदी मजबूत सहकार्य,अशा अनेक जिव्हाळ्याच्या बाबींचा समावेश असतो.म्हणुन मैत्रीचे अनुभव आजही इतिहासात साक्ष देऊन अजरामर आहे.

मैत्रीला मर्यादा असते.

मैत्री हि नेहमी उन्नती ची असावी 

मैत्री आहे म्हणून कोणत्या वाईट मार्गाला जाऊ नये.

तो मित्र वाईट मार्गाला आहे,म्हणून मैत्री संबंध तोडू नये,तर मित्राचा वाईट मार्ग सोडण्यासाठी त्याला प्रवृत्त करावे.

परिस्थितीनुसार सर्व काही सारखे नसतात.यासाठी

मैत्रीत कधीच कोणत्याही मित्राला कमी लेखू नये.

मैत्रीची मर्यादा ओलांडणारे मित्र नेहमी टाळावे.अशासाठी कि मैत्रीचे रुपांतर शत्रुत्वात बदलते

मैत्रीस पात्र नसलेल्या व्यक्तीसोबत मैत्री करु नये असे नातेसंबंध अतिशय घातकी असतात.


मैत्री हि वर्तुळासारखी असते ज्याला कधीच शेवट नसतो.

अशा वर्तुळात मैत्रीच्या नात्याची उलाढाल सतत चालू असते,यात कधी रुसाफुगी,कधी आनंद,सुखदुःख ,भेटणे,दुरावणे अशा पुष्कळ गोष्ट चालू असतात,अगदी शेवटल्या श्वासापर्यंत...


Rate this content
Log in