Stifan Khawdiya

Tragedy

4.6  

Stifan Khawdiya

Tragedy

एक अनुभव वावरतांना

एक अनुभव वावरतांना

2 mins
245


दादा तुम्ही वडिलांना काही बोलु नका.

अगदि काकुळतेने तीन मला विनंती केली.

अग पण मी बोलतो, एकदा तुझ्या बाबांना 

समजावून सांगतो .. 

हे बघ बेटा तुला शिकायच आहे ना अजुन..

दादा नाही ऐकायचे ते, जाऊद्या दादा.. 

माझ नशीब फुटक असे बोलुन तिचे डोळे पाणावले..

अन् रडक्या स्वरात ती बोलली हि सलाईन संपल्यावर 

घरी सोडतील ना? दादा मला..

असे बोलून तिने विषय टाळला..

खरतर तिला चक्कर अन् शारिरीक थकवा जानवत, 

असल्यामुळे दवाखान्यात दाखल केले होते.. 

दुपारी ड्युटीवर हजर झालो.

दुपारचा राउंड घेता घेता नंबर चार वर असलेल्या नवीन 

एडमिशनची चौकशी केली.. 

त्यावर सिस्टरांनी सविस्तर उत्तर दिलं पेशंट तीन चार

दिवस जेवली नाही तिला अशक्त पणा आला आहे .

काय कारण न जेवण्याचे रक्त तपासणीत दोष आला आहे का? नाही तिचे रिपोर्ट नाही केले. तिच लग्न ठरलय म्हणून..ती जेवली नाही 

लग्न ठरलय मग आनंदाची गोष्ट यात नाराज काय व्हायचं 

जरा अजबचं वाटलं नको ते प्रश्न मनात निर्माण झाले

पण खरच पोर नुकतीच दहावी पास झाली होती 

अन् घरच्यांनी तिची सोयरीक जमवली होती

तिला तपासतांना मोठ्या आपुलकीने चौकशी केली 

तिच्या आईने विनंती केली दादा तिला काही खायला सांगा 

मग तिला गोड बोलुन मोठ्या मुश्किलीने आइसक्रीम खाऊ घातले अन् पुढचे काम आवरु लागलो. 

कामात बराच वेळ गेला होता जवळपास घड्याळत 

सात चा टाईम झाला होता... 

ओ पी डी चालु होती पेशंटची गर्दी नेहमी प्रमाणे होती.. अचानक सफाईवाल्या मावशीने येउन सांगीतले दादा, चार नंबर पेशंट अन् तीची आई रडत आहे.. 

जाऊन चौकशी केली. 

काय झाल ! पेशंटला काही त्रास होतोय का?

त्यावर पेशंटची आई बोलु लागली दादा समजावा कारटीला, चांगले स्थळ आले आहे, अन् ही नको म्हणतेय.. 

शिकायचं खूळ घेउन बसलीय.. 

हिचा बाप हिला जित्ती गाडल अन् माझा मुडदा पाडलं 

समदं कसं वाटोळ होईल पोर हट्टाला पेटली दादा..

मी ही तीला समजून सांगु लागलो..

अन् चुकीच्या गोष्टीला सहमत होऊन जनु तिच्या अस्तित्वाचा गळा कापू लागलो..

पण तीच्या बोलण्याने मी क्षणात निशब्द झालो 

दादा मला शिकायच आहे मला पत्रकार व्हायचं.. 

कसं समजावून सांगु यांना कोणीच ऐकत नाही माझ..

ज्याला त्याला माझ्या लग्नाची घाई ..

दादा आईने घमकी दिली तु लग्नाला नकार दिला की 

लहान भावासकट जीव देईल.. 

वडिलांच तरि काय ते सहमत नाही होत माझ्याशी.. 

ती तिच्या अस्तित्वासाठी न्याय मागत होती..

अन् समजा, रुढी,परंपरेला स्वहक्कासाठी लढा देतं होती पण ती त्यात असमर्थ ठरली होती 

दादा मीच आता आत्महत्या करते असं बोलुन ती शांत,  

बसली जनु ती आतल्या आत मेल्यासासखी.. 

तिची आई स्वताचच तोंड बडवू लागली पोरीने पिसुळ

आणलाय आता खरंच कराव जीवाच बरवाईट 

मी आपला त्यांची समजूत काढून त्यांना सावरत होतो 

सावरता सावरता मी तिला म्हणालो मी बोलतो तुझ्या बाबांशी पण तीन वडिल रागावतील या भितीने 

काकुळतेने विनवणी केली.. 

आता नऊ वाजले होते तिची सलाईन संपली होती तपासणी नंतर तिला घरी सोडण्यात आले. 

जातांना तिचा निरागस चेहरा काही सांगत होता..

स्वताच्या नशिबाला दोष देत तीन तो जीवनाचा करार मान्य केला होता.. 

खूप वाईट वाटत होतं एकसारखा तीचा चेहरा, डोळ्यासमोर येत होता..

अन् मनात प्रश्नांच वादळ उठवत होता..

शेवटपर्यत खंत राहील असा प्रश्न,

असं का ?असं का ?


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy