Neelima Deshpande

Inspirational Others

3  

Neelima Deshpande

Inspirational Others

एक आधार असाही...

एक आधार असाही...

1 min
370


"अहो, नेहमी तिला आधार देत राहिलात तर आपल्या माघारी कोण आधार देईल? आणि तिची काळजी घेईल. थोडी भक्कम होऊ द्या तिला" 


सुमित्रा सगळ्यांचे ऐकून तिच्या पतीजवळ लेकिची काळजी व्यक्त करत होती. लहानपणापासून तब्येतीने नाजूक म्हणून जिवापाड जपलेल्या लेकिला बाबांचा वेगळाच आधार होता. नेहमी त्यांनी तिला समजून घेण्याची भुमिका दाखवली.  लेकीच्या लग्नानंतर वर्षभर ते तिला सतत समजावत होते. प्रत्येक सणाला सासरच्यांनी केलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी धडपडतही होते. इतके करुनही जेंव्हा सासरी हाव कमी झाली नाही त्यांनी हंड्या पायी लेकीला माहेरी आणून सोडल्यावर जेंव्हा, मागणी केली...


 "पहिल्या दिवाळीला गाडी देत असाल तर हिला नेवू नाहीतर असू दया इथेच तुमच्या जवळ" हे ऐकल्यावर ते अस्वस्थ झाले.


'समाज काय म्हणेल'? याचा विचार न करता, हुंडा प्रथेला विरोध करत लेकिला सासरी न पाठवता आधार देत सक्षम करण्याची भूमिका घेवून त्यानी बळी जाण्यापासून लेक वाचवली ! तिला पुढे आणखी शिकवली. नोकरीला लावली. भक्कमपणे स्वत: च्या पायावर उभी केली. एका मनापासून जीव लावतात अशा गजरात तिचा पूर्णविवाह लावून दिला.


आज ती सुखाने नांदत आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational