Mrs. Smita Vijay Shinde

Others

4.3  

Mrs. Smita Vijay Shinde

Others

एक हात मदतीचा

एक हात मदतीचा

1 min
301


सकाळची वेळ होती, माझी पटकन घरातील कामावरून ऑफिसला जायची वेळ झाली होती तितक्यात फोनची रिंग वाजली माझ्या नवऱ्याचे मित्र भूषणच्या आईचा फोन होता. भूषण हे महिनाभरापूर्वीच जपान या देशात नोकरी निमित्त गेलेले होते. मी फोन उचलला आणि समोरून येणारा त्यांचा आवाज आणि "स्मिता जिथे असेल तिथून लगेच घरी ये" हे शब्द ऐकून मला धडकीच भरली. मी हातातला सर्व काम टाकून धावपळ करत लगेच त्यांच्या घरी पोहोचले, बघते तर काय त्या खुर्चीवरून खाली पडलेल्या होत्या, त्यांना उठताही येत नव्हतं आणि बसता येत नव्हतं. मी माझ्या नवऱ्याला फोन करून लागलीच घरी बोलावून घेतलं तोपर्यंत त्यांना कसेबसे उठवून गादीवर झोपवले. माझे मिस्टर घरी येताच आम्ही दोघेही त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, डॉक्टरांनी तपासल्यावर कळाले की त्यांना चांगलाच मुका मार लागलेला होता. त्यानंतर आम्ही त्यांना पूर्ण बरे वाटेपर्यंत आमच्या घरीच ठेवून घेतले.

अजूनही तो दिवस आणि त्यांची झालेली अवस्था आठवले की मन विचलित होते.


Rate this content
Log in