Mrs. Smita Vijay Shinde

Children Stories

4.7  

Mrs. Smita Vijay Shinde

Children Stories

स्वप्नातली परी

स्वप्नातली परी

1 min
406


एक विजयनगर नावाचे छोटे गाव होते. तेथे मनु नावाची एक लहान मुलगी राहत होती. कोरोना काळात घरात राहून फारच कंटाळली होती बिचारी. सरकारने लॉकडाउन थोडे ढीले केले आणि मुलांना बाहेर फिरण्याची थोडी मुभा मिळाली होती. मनूला बाहेर खेळण्याची जायची फारच घाई झाली होती. मनु सायंकाळच्या सुमारास चेंडू घेऊन बागेत खेळण्यास गेली खेळता-खेळता तिचा चेंडू अचानक रस्त्यावर गेला आणि ती इकडे तिकडे न बघता सरळ धावत गेली. समोरून अचानक एक लाल रंगाची मोटर धावत आली आणि मनू त्या गाडीला धडकणार तेवढेच आकाशातून एक परी आले आणि मनूला तिने पटकन वर उचलून धरले. खूपच घाबरली होती इतकी घाबरली होती की ती रडायलाच लागली आणि अचानक कानावर आवाज आला मनु काय झालं तुला? का रडतेस तू? तितक्यात मनू खडबडून जागी झाली पाहते तर तिचे एक वाईट स्वप्न होते.


तात्पर्य - घराबाहेर पडलेले असताना सभोवतालच्या परिस्थितीचे भान ठेवाव.


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్