Amruta Shukla-Dohole

Inspirational Others

4.3  

Amruta Shukla-Dohole

Inspirational Others

गौतम बुद्ध

गौतम बुद्ध

1 min
525


गौतम बुद्धांचा एका गावात मुक्काम होता. तिथे एक रिकामटेकडा माणूस गावातल्या मुख्य चौकातल्या पारावर बसलेला असायचा. त्याचं एकच काम होतं. कुणाकडे किती गायी आहेत, किती म्हशी आहेत, याची मोजदाद करत राहायचं. गावात कुणाकडे कोणत्या रंगाची किती गुरं आहेत आणि कोणाची कोणती म्हैस किती शेर दूध देते, इथपर्यंत सगळी माहिती त्याला मुखोद्गत असायची.


बुद्ध शिष्यांना म्हणायचे, एकवेळ धार्मिक बनू शकला नाहीत, तरी चालेल; पण याच्यासारखे धार्मिक बनू नका. हा पोथ्या रटणाऱ्या पंडितासारखा आहे. सगळ्या गावातल्या सगळ्या गुरांची सगळी बिनकामाची माहिती याला तोंडपाठ आहे. पण, दुधाचा एक थेंबही याने कधी चाखलेला नाही. त्याची गोडी काही याला माहिती नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational