Deepak Kambli

Inspirational

3.6  

Deepak Kambli

Inspirational

गुडमाॅर्नींग

गुडमाॅर्नींग

4 mins
196


      सुरेश आमच्या वर्गातील एक हुशार विद्यार्थी. त्याच्या घरची परिस्थितीही तशी चांगलीच होती. म्हणजे जेव्हा मुंबईत नवीन टीव्ही आले त्यावेळेस संपूर्ण काॅलनीत त्यांच्या घरी टीव्ही होता. आम्ही मित्र त्याच्याकडे टीव्ही पहायला जायचो. जसा तो शिक्षणात हुशार होता तसा खेळातही होता. आम्ही एकत्रच काॅलनीत क्रिकेट खेळायचो तो पण आमच्या बरोबर खेळायचा, पिक्चरला यायचा, तरी त्याने पहिला नंबर कधी सोडला नव्हता.


     दहावी पर्यंत आम्ही एकाच शाळेत होतो. नंतर तो त्याच्या मार्का नुसार सायन्सला आणि आम्ही आर्टसला अॅडमीशन घेतली. त्याचे रविवारी खेळायचे हे ठरलेलेच असायचे. त्याच्या बरोबरचे सायन्सवाले नेहमी टेंशनमध्ये असायचे पण हे महाशय खेळायचे आणि अभ्यासही करायचे. लास्ट इयरला 'हा काय पास होत नाही' असे काॅलनीतल्या ब-याच लोकांचे मत होते, पण आम्हांला माहित होत ते सगळे माती खाणार. आणि तसेच झाले हा बाबा फर्स्टक्लास मधे पास झाला. पुढे एका चांगल्या कंपनीत त्याला जाॅब लागला, तेव्हा तो काॅलनी सोडून गेला. 


      त्यावेळेस मोबाईल वगैरे काही नव्हते त्यामुळे संपर्काची शक्यताच नव्हती. हल्ली रीयुनियनची सुरवात झाली आणि पुन्हा जुने मित्र भेटण्याची संधी उपलब्ध झाली. मी शाळेतले मित्र शोधायला लागलो एक एक करून तीस लोकांशी संपर्क झाला काही मुंबई पुणे येथे होते. काही परदेशात होते. पण कुणालाच सुरेशचा पत्ता लागत नव्हता. आमचे एक गेटटुगेदर झाले ब-याच गप्पा झाल्या जुन्या आठवणी निघाल्या कुणी कुणी केलेल्या खोड्या त्यामुळे सर्वांनाच बसलेला मार सगळे आठवले. महत्वाचे म्हणजे त्यावेळेस न बोलणा-या मुली आता मात्र बिनधास्त बोलत होत्या. किती फरक झाला होता प्रत्येकात काही जणं तर ओळखूच येत नव्हते. पण मला मात्र सगळे तू आहेस तसाच आहेस हीच काॅम्प्लिमेंट मिळत होती. आमच्यातील एक मुलगा चक्क टॅक्सी ड्रायव्हरचा ड्रेस आणि बॅच लावून आला होता. आधी त्याला कुणी ओळखलेच नाही. तो कोप-यात जाऊन बसला आता इथे कुणी परकं येण्याचा संबंधच नव्हता. सगळ्यांची कुजबुज सुरु झाली. खास करून मुलींची आपल्यापैकी कुणी टॅक्सी घेऊन आले असेल त्याचा ड्रायव्हर असेल, तर त्याला बाहेर बसायला सांगा. त्याला याचा अंदाज आला तो सगळ्यांच्या समोर आला आणि म्हणाला 

"मित्रांनो मी बाबु घोरपडे" 

त्याने टोपी काढली आणि सगळे त्याच्या अंगावर धावून गेले

" बाबू तू साला मेडिकलचा स्टुडंट. तू डाॅक्टर होणार होतास. तू चक्क टॅक्सी ड्रायव्हर?"

 तो म्हणाला 

"हो मी टॅक्सी ड्रायव्हर आहे. मित्रांनो आणि मला त्याचा अभिमान आहे"

 सगळ्यांनी माना हलवल्या हॅ टॅक्सी ड्रायव्हरचा कसला अभिमान. तो म्हणाला

 "आपण शिकतो कशासाठी? शेवटी पैसे कमावण्यासाठीच ना? मी चॅलेंज देऊन सांगतो की तुमच्या सगळ्यांपेक्षा मी जास्त कमवीत आहे" 

"हॅ काय बोलतोय हा इथे दोन दोन लाख पगार असलेले लोकं आहेत"

 एकाने विचारले

 "बाबू तू पिऊन आला आहेस का?" 

"नाही मित्रा मला कसलच व्यसन नाही" 

"मग तुला कळतय का तू काय बोलतोयस?" 

"हो मित्रा मी वर्षाला दोन लाख रूपये इन्कमटॅक्स भरतोय?" "ए याला बाहेर काढा हा वेडा आहे. त्याला वेड लागलय एक टॅक्सी चालवून एवढा इन्कमटॅक्स? हॅ" 

"हा मित्रानो तुम्ही इथेच गडबड करताय. माझ्या म्हणजे माझ्या फॅमिलीच्या मुंबईत शंभर टॅक्सीज आहेत"

"बापरे"

 आता मात्र सगळे ढूस्स झाले 

"आणि म्हणूनच मी म्हणालो की एक मराठी टॅक्सी ड्रायव्हर असल्याचा मला अभिमान आहे" 

आता मात्र सगळेच टाळ्या वाजवत होते. दोघा तिघाने त्याला उचलून जयजयकार केला. मघाशी त्याला वेडा ठरवणारा माणूस एका कंपनीचा मॅनेजर होता. त्याने त्याला साष्टांग नमस्कार घातला. आणि आमच्या रीयुनियनची पहिली मिटींग संपली.


     मी घरी आलो. पण सुरेश डोक्यातून जात नव्हता. तिथे आलेल्या प्रत्येक मित्राला विचारले, पण त्याचा कुणालाच पत्ता नव्हता. काही दिवसांनी एका मित्राचा फोन आला 

"मित्रा आज संध्याकाळी भेटतोस का? तुला एक गोष्ट सांगायची आहे" 

"अरे मग सांगना आता"

 "नाही रे ती सुरेश बद्दल आहे" 

सुरेश बद्दल म्हंटल्यावर मी लगेच तयार झालो. आम्ही संध्याकाळी एका बार मध्ये भेटलो. तो मित्र आला आणि त्याने जे सांगितले ते ऐकून माझ्या अंगावर काटा आला. तो म्हणाला मला काही दिवसांपूर्वी सुरेशचा फोन आला. मी त्याला म्हंटल 

"अरे मित्रा तू कुठे आहेस? परवा आम्ही सगळ्यांनी तुला खूप मिस केलं" तो थंडपणे म्हणाला 

"मला आज तू संध्याकाळी चार वाजता उडपी हाॅटेलमध्ये भेट" 

 बरोबर चार वाजता उडपी हाॅटेल मध्ये गेलो.

हाॅटेल तसे रिकामेच होते, चार पाच टेबलस् भरली होती. मी विचार केला अजून हा आला नाही, एका टेबलवर मी बसणार इतक्यात मला आवाज आला. 

"राजू" मी त्या दिशेने पाहिलं एक इसम मला बोलावत होता. मी त्याला ओळखायचा प्रयत्न करत होतो आणि माझ्या लक्षात आले सुरेश, माय गाॅड! सुरेशला कोड झालं होतं. तो पूर्ण पांढरा फटफटीत होता. मी त्या टेबलावर बसलो तो खूप दुःखी होता. त्याचे लग्न धुमधडाक्याने झाले बायको पण छान होती. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी होती. एका मोठ्या कंपनीत मोठया हुद्यावर तो होता. सगळंच चांगले असताना कुणाची नजर लागली माहित नाही. 

"मला एक डाग चेह-यावर दिसला हळूहळू तो वाढत होता. मी लगेच डाॅक्टरकडे गेलो. बरीच औषधे केली पण दिवसेंदिवस ते वाढतच गेलं. मी फ्रस्टेट झालो. माझे घरी, ऑफिसमध्ये, खटके उडायला लागले. मला कंपनीने काढून टाकले. बायकोनी पण घटस्फ़ोट घेतला. दोन्ही मुलांना घेऊन ती निघून गेली. आता एका साध्या कंपनीत नोकरी करतोय, मला सांगा कुठल्या तोंडाने मी तुमच्या समोर येऊ?" 

त्याचा चेहरा मला पाहवत नव्हता. मी त्याचा हात हातात घेतला. तो पहात राहिला मित्रा किती वर्षाने मला कुणीतरी स्पर्श केला आहे. मी त्याला म्हंटले 

"मित्रा हा एक ॲक्सीडंट आहे. तू मित्रांच्या संपर्कात राहिला असतास, तर तुझे फ्रस्टेशन दूर झाले असते, तुझा जाॅब गेला नसता. अरे रूपावर सगळं अवलंबून नसतं, कोड तुझ्या शरीराला झालंय त्याचा परिणाम तुझ्या मनावर आणि बुद्धीवर होऊ देऊ नकोस, तू अजूनही तोच सुरेश आहेस. अरे दोन्ही पाय गेलेली मुलगी एव्हरेस्ट शिखर चढते. तू तर धडधाकट आहेस. 

"हो यार मला पटतय तुझं म्हणणं, मी आता पॉझिटीव्ह ऍप्रोच ठेवीन माझी बुद्धी अजून शाबूत आहे, आणि मित्रांना सांग मी आपल्या दुस-या गेटटुगेदरला नक्कि हजर राहीन" 

मी थक्क झालो 

"राजू तू खूप चांगले काम केलं आहेस" "तो म्हणाला मी अजून ही गोष्ट कुणाला सांगीतली नाही, पण मी उद्या त्याला आपल्या वाॅटसॲपगृपवर ॲड करणार आहे, सगळ्यांनी त्याचं स्वागत करा" आम्ही तिथून निघालो सुरेश डोक्यातून जात नव्हता. 


     दुस-या दिवशी सुरेशचा गुडमाॅर्नींगचा मॅसेज होता. आणि मुख्य म्हणजे त्याने डीपीवर त्याचा आताचाच फोटो ठेवला होता.

खरंच ही त्याच्या आयुष्यातली "गुडमाॅर्नींगच" होती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational