Sarita chitodkar

Action

2  

Sarita chitodkar

Action

जगा आणि जगू दया

जगा आणि जगू दया

4 mins
106


अतिशय आनंदी जीवनाचा मंत्र आहे जणू ,”जगा आणि जगू द्या” या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे पण मनुष्य प्राण्याचाअहम भूमिकेतून हे साकार होतेच असे नाही ,त्यासाठी सकारात्मक प्रश्नांची पराकाष्टा करणे हे अविरत असावे लागते.मी कसा जगतोकिंवा जगत आहे हे शब्दात मांडणे कधीकधी अवघड होत जाते. माझ्या भूतकाळातील नैराश्य अनुभव व भविष्याची चिंता याने जगणेचमर्यादित होत चाललेले आहे. माझ्या जगण्याचा व्याख्येतून जगणे काय असते ?हे हेच मला समजत नाहीये ...मी सावरत पण नाही ;माझेमलाच कळत नाही.? विचारांचे काळीज गर्द नजरेने एकटक माझ्याकडे ‘मी’ला शोधत असते,त्यामुळेच इतरांच्या जीवनाच्या मूल्यांचा मीकधीच विचार करीत नाही.फक्त मी आणि माझ्या अवतीभवती असलेले 


माझे वास्तव्य, माझे अस्तित्व हेच असते जगणे. पण त्यातही किती तो गुंता असतो ?माझ्या ह्या दृष्टीकोणाकडे बघण्याची ही परिभाषासमजेपर्यंत रोजचा आज हा कधी संपतो ?आणि उद्याचा उदय कधी होतो ?हे समीकरण न समजण्या पलीकडे माझे जगणे होऊन बसते. माझ्या या स्वार्थीपणाने दुसऱ्यांचे अनुभव कधी जमा केलेच नाही.परंतु माझ्या आयुष्याच्या आताच्या चौकटीत मात्र आजचा आराखडाबदलत आहे.त्याचे कारणही तसेच आहे “जागतिक महामारी”..... या महामारीने मनुष्य प्राण्यांची वैचारिकता ,आदरभाव व जगण्याचीभाषाच बदलून टाकली आहे.यातून जीवनाचा अर्थ सांगणारी ही महामारी ! 


या आधीही ही मानवाने प्रत्युत्तर देऊनही मानवी जातीतील समृद्धी व निसर्गाने होणार्‍या जीवसृष्टीची हानी करणारे कृत्य याला जबाबदारधरले आहे.जीवनाच्या अमूल्य मिळालेल्या देणगीत उत्तर शोधण्याचा प्रयत्न मात्र आपण करीत आहोत. जीवन ही रंगभूमी आहे जीवनएक संघर्ष आहे तसेच दोन घडीचा डाव आहे. माणसाने मानवाला दिलेल्या एक मदतीचा हात आहे ,त्याचे स्वरूप मनस्वी आनंद देणारेम्हणजेच ...जगा आणि जगू द्या....जगता जगता जीवनाकडे बघावे ,जमेल तेवढे जाणवावे .... हे या जाणिवेतूनच गाणे गुणगुणत पुढेजात राहावे ,जीवन वैभवाचा स्पर्श अनुभवावा .जीवनात स्वतः व्यक्त होण्यासाठी आपण सरावत नाही कारण परिणामांचा डोंगर समोरअसतो आणि वाट चुकलेले जीवन परत त्यात वाटेचा,मार्गाचा आपण स्वीकार करतो. 


माझ्यातील चांगल्या वाईट गुणांचा मी स्वतः कधीत्या नजरेने बघत नाही आणि या सतत चालणाऱ्या जीवनशैलीत दुसऱ्याला दोष देत असते.माझे जगणे हे दुसऱ्यांसाठीच आहे,माझाआनंद हा देखील दुसऱ्यांवर अवलंबून आहे.प्रत्येक कामातून,बोलण्यातून,वर्तनातून व विचारातून मी मला सिद्ध करीत बसते.कदाचितमाझ्या भावना माझी मानसिकता त्याचा ताळमेळ कधी त्या कारणाने होतच नाही. जीवनात अनेक वेळेला मी जगता जगता मरत असते...माझ्या जीवनाचे गणित मला कळत नाही ?कशासाठी जगा आणि जगू द्या ????या तुकारामांच्या ओवी साथ देतात ,त्यावरविचारविनिमय करायला लावतात ...”नाशिवंत देह सारा उद्या भंगून जाईन, काय जमविले काय कमविले कधीतरी मातीमोल होईल “


किती वर्ष जगण्यापेक्षा मी कसे जगलो ??या विचारांचा खजिना मी बाळगणार आहे.नशिबात असेल तर मिळेल हे मला मान्य नाही तरआपण घडवू तर नशीब घडेल!!! यावर विश्वास ठेवणे गरजेचे. अर्थातच देवाच्या दर्शनाला लांबलचक लाईनमध्ये न थांबता हातून एकतरी समाज सेवा घडू दे देवातला देव शोधून सापडत नाही ,माणसातला देव मला समजू दे !! हेच जीवनाचे महत्व,तत्व व जीवनजगण्याचा मंत्र असू दे.रोज दिवा लावताना एकच प्रार्थना होऊ दे 🙏सर्वांना निरोगी आणि दोन वेळचे पोटभर अन्न मिळू दे 🙏माणसातील माणुसकीचा परिचय होऊ दे .शांत मनाला जगता-जगता समाधान दे ! 

मनात तर नेहमीच नदीचा हेवा वाटतो तिच्या जीवनात ती कशी जगते ?वाहत असताना कितीतरी जागेला ती समृद्धी करते.मागे कधीबघायचे नाही की पुढील अडथळ्यांना घाबरायचे नाही.तिचे एकच ध्येय असते समुद्राला मी कधी मिळेल ?यावरून तुम्हीही जगा आणिदुसऱ्यालाही जगू द्या हा सकारात्मक संदेश मात्र नकळत मानवतेच्या जीवनाला प्राप्त होत असतो. 


विवेकबुद्धीने,सदाचाराने ,आदरभावनेनेया आयुष्याच्या वाटेवर निसर्गाने पण भरभरून प्रत्येकाला भेदभाव न करता निरपेक्षतेने दिलेले खरे धन आहे. त्याचे फक्त प्रबोधन प्रत्येकाने करावे ही अपेक्षा आहे . जगणे म्हणजे रंगाची पेटी ...कधी कुठला रंग आवडेल व कधी कुठला रंग मिसळेल याचा अंदाजमांडता मात्र येत नाही. फक्त आत्मविश्वासाचे रंग महत्त्वाचे आणि ते रंगवताना इतरांचे चित्र बिघडणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. आपले रंग देखील छान फुलवावे ,मान पान, आदर, सन्मान व प्रतिष्ठा या नक्कीच प्रधान होतील यात शंका नाही. जोआपल्यासाठी जगतो तो जगूनही मेलेला असतो पण जो दुसऱ्यासाठी जगतो तो नक्कीच अमर असतो. आत्मपरीक्षण जसे महत्त्वाचे तसेजगण्यासाठी कौतुकाची थाप ही एक पोचपावती असते. या प्रबोधनाची सुरुवात मी माझ्यापासून करणार आहे यात शंकाच नाही.प्राथमिक सेवा देणाऱ्या पासून तर अतिदक्षता सेवा पर्यंत मी मनापासून सर्वांना धन्यवाद देणार आहे.


तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार पेक्षाही “मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार” सहजीवनाचा शिल्पकार हे महत्वाचे वाक्य मीमनात ठेवणार आहे. जन्म आणि मृत्यू त्यातील अंतर म्हणजे जीवन आणि या जीवनातील जगण्याला देऊ या बेहतर उत्तर ....


प्रत्येक गोष्टी आपण नव्या पद्धतीने उपभोगू शकणार आहोत. जीवनात काही तरी साध्य होईल आणि काही तरी सुटणार आहे,जे आहेत्याचा लाभ घेऊ या आणि त्यातच आनंदी व समाधानी राहूया. निश्चितपणे आपण जसे आहोत त्याला स्वीकारू या. एक सुंदर व्यक्तीजगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगूया. शरीराची सुंदरता कधी ना कधी संपते पण सुंदर व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंतराहते.अनेक गोष्टी प्रेरणा देतात ,आपणही पूढील पिढीसाठी प्रेरणास्थान बनवू या . प्रतिभासंपन्न कवी मंगेश पाडगावकर त्यांच्या सुरातसूर मिसळू या....

“ या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.”

            ********************* 


Rate this content
Log in

Similar marathi story from Action