Surekha Nandardhane

Thriller

3  

Surekha Nandardhane

Thriller

खेळ सावल्यांचा ( भाग १० )

खेळ सावल्यांचा ( भाग १० )

3 mins
187


( भाग १० )


    आपण मागच्या भागात पाहिले सुयोग . मोहित .विकास व अक्षय निखीलचा निरोप घेऊन घरी परत यायला निघाले . रस्त्यात ऐका हॉटेलमध्ये त्यांनी जेवण केले व पुढच्या प्रवासाला निघाले .


   - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -


      काही अंतरावर गेल्यावर त्यांची गाडी जोरात खड्ड्यात आदळली तसी गाडीची स्पीड कमी होऊन गाडी थांबली .


    य्ये काय झालं रे गाडी का थांबविली !

थांब बघतो म्हणत मोहित व विकास गाडीमधून खाली उतरले .


 " ओ शीट " गाडीचा टायर पंक्चर झाला .


  ओ नो म्हणत सुयोग व अक्षय ही गाडीमधून बाहेर आले .


    चल स्टेपनी काढु म्हणत मोहित ने गाडीची मागची डिक्की उघडली " अरे यार स्टेपनी पण नाही ."


    आता काय करायचे जवळपास इथे गँरेज पण नाही आणि थांबायला जागा पण नाही . असा सुयोग मोहितला बोलला . 


    अक्षय तर खुप भित्रा होता. तो पहिले घाबरला व मोहितला थोडा चिडून बोलला तुला कळत नव्हते का यायच्या अगोदर चेक करायचे स्टेपनी आहे की नाही !


    अरे चिडायला काय झालं तुला माहीत आहे ना आपण किती घाईघाईने निघालो त्यामुळे त्याच्या लक्षात राहीले नसेल असे सुयोग अक्षय ला समजवत होता .


   आता ईतक्या रात्री कुठे जायचे असा प्रश्न अक्षय ने केला .


    अरे दोन किमी अंतरावर माझ्या मावशीचे घर आहे आपण तिकडे जाऊन थांबुया . मावशी नागपूरला मुलाकडे गेली आहे तेव्हा तिच्या घरी पण कोणीच नाही .


  पण जाणार कसे ?


  चला गाडीला धक्का मारत जाऊया असा मोहित बोलताच अक्षय बोलला . ईतक्या लांब ?


     त्याशिवाय पर्याय नाही . इथे जवळपास थांबण्यासाठी कुठेही जागा नाही म्हणून आपल्याला गाडीला धक्का मारतच जावे लागणार आहे आणि दोन तर किलोमीटर आहे .


   चला म्हणत मोहित आत बसला व बाकीच्यांनी गाडीला धक्का मारायला सुरुवात केली .


     कसेबसे ते विकासच्या मावशीकडे पोहचले .

मावशीही घरी नव्हती व शेजारचे जोशी काका त्यांच्या पत्नी वारल्यापासून तेही आपल्या मुलाकडे निघून गेले होते. कित्येक दिवसापासून त्यांचे घर रिकामेच होते .


     विकास आता काय करायचे मावशीच्या दाराला तर कुलूप आहे !


   मावशी कडून नेहमी चाबी हरविते म्हणून ती नेहमी फुलांच्या कुंडी खाली चाबी ठेऊन जाते .


    अरे इथे तर किती फुलांच्या कुंड्या आहे नेमकी कोणत्या कुंडी खाली चाबी असेल .


  अरे शोधुया . चला मला चाबी शोधायला मदत करा .


   चाबी शोधताना ऐका कुंडीखाली सुयोग ला चाबी मिळाली . त्याने ती चाबी विकास ला दिली . त्याने घराचे दार उघडले .


     " हुश्श " दमलो रे बाबा म्हणत सुयोग आत सोफ्यावर जाऊन बसला .पाठोपाठ सर्व आत जाऊन बसले . ये बरं झालं तुझ्या मावशीचे घर जवळ होते नाहीतर आपल्याला रस्त्यावर च रात्र काढावी लागली असती .


    हो ना अक्षय बोलला .मला तर रामगड चा किस्सा आठवला व अंगावर काटाच आला .


    नको रे तो विषय काढू . आता शांत झोपा . सकाळीच आपल्याला लवकर निघायचे आहे .


     ते सर्व थकल्यामुळे सर्वाना लवकरच झोप लागली.


   रात्रीला काहीतरी खुडबुड खुडबुड असा आवाज आला त्यामुळे अक्षयला जाग आली त्याने घड्याळीत बघितले तर रात्रीचे अडीच वाजले होते . त्याला वाटले आपल्यातलेच कोणी उठले असेल व किचनमध्ये पाणी प्यायला गेले असेल . पण त्याने आजूबाजूला बघितले तर सर्वंच झोपले होते .


       जाऊ दे उंदीर वैगरे असेल म्हणून तो परत झोपला पण थोडया वेळाने त्याला पुन्हा तोच आवाज आला . आत त्याने विकास ला उठविले .


 ये विकास ये उठ ना बघ घरात कसलातरी आवाज येतोय .


   कुठे कसला आवाज येतो .तु स्वप्न बघितले असेल तू झोप बरं व मलाही शांत झोपू दे म्हणत त्याने कुस बदलली .


    मलाच काहीतरी भास झाला असेल असे स्वतःशीच बोलत अक्षय परत झोपला .


  थोडया वेळाने छोट्या खलबत्त्यात काहितरी कुटण्याचा आवाज आला व सर्वांना जाग आली .ते ते सर्व एकमेकांकडे बघत त्यांनी कानोसा घेतला तर आवाज शेजारच्या जोशी काकांच्या घरातून येत होता .


     थोड्या वेळात लगेच चहाचा सुगंध आला .त्यांना खात्री पटली नक्कीच जोशी काकांच्या घरी कोणीतरी रहात आहे त्यांच्याच किचनमध्ये कोणी फक्कड चहा बनविला .


     अरे तू तर म्हणत होता जोशी काका त्यांच्या मुलाकडे गेले आहे व बाहेर सुद्धा दाराला कुलूप आहे .पण चहाचा सुगंध त्यांच्याच किचनमधून आला .


   जोशी काकांच्या घरात कोणीतरी असेल म्हणून विकास ने मागच्या खिडकीतून डोकुन बघितले ….………


……………………………………………………………………………


  जोशी काकांच्या घरात कोण आहे बघुया पुढील भागात 


 


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller