Surekha Nandardhane

Thriller

3  

Surekha Nandardhane

Thriller

खेळ सावल्यांचा (भाग ६)

खेळ सावल्यांचा (भाग ६)

3 mins
198


 मागच्या भागात आपण बघितले की निखिल व त्याची बायको जया हे आपल्या मुलाला घेऊन कुलदेवतेच्या दर्शनासाठी चालले होते .

        _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ 

     तसा त्यांचा प्रोग्राम अगोदर च ठरला होता .निखिल ऑफिस मधून आल्यावर आवरून ते निघाले . एकच दिवस सुट्टी असल्यामुळे त्यांनी रात्रीला प्रवास करायचे ठरविले होते .काही दूर गेल्यानंतर अचानक विजांचा कडकडाट व तुफानी वाऱ्यासोबत पाऊस पडायला लागला .


       दोन्ही बाजूला जंगल दाट झाडी होती . काळाकुट्ट अंधार व मुसळधार पाऊसामुळे रस्त्यावर क्वचितच अधून मधून एखादी गाडी जायची .


     जया निखिल ला कुठेतरी थांबुया असे सांगत होती .

   निखिल बोलला . अग इथे कुठे थांबायचं जवळ हॉटेल पण नाही . दोन तीन तासात आपण पोहचून जाऊ .


     वेगाने गाडी चालवित असताना निखिल ने ब्रेक लावला. गाडी समोर एक बाई हात दाखवीत थांबवत होती . दोघांची नजर त्या बाईकडे गेली. गाडी थांबताच ती बाई गाडीजवळ आली .


    " अहो साहेब . माझे गाव पुढे आहे मला तिथपर्यंत येऊ द्या ना . अगोदरच मला खुप उशीर झाला बस ही निघून गेली व या पावसात एकही गाडी थांबत नाही. माझी मुलं माझी वाट बघत असेल ."


 " खुप उपकार होतील ओ साहेब" असे म्हणत ती हात जोडत विनवणी करत होती .


   निखिल ने जयाकडे बघितले तिने त्याला गाडीत घ्यायला सांगितले .


  निखिल ने गाडीचे दार उघडत तिला आत बसायला सांगितले .


   खुप उपकार झाले म्हणत ती गाडीत बसली .


जया निखिल जवळ समोर बसली होती व मुलाला मागच्या सीटवर झोपवले होते .


     ती बाई मुलाच्या बाजूला बसली. " किती गोड आहे हो तुमचा मुलगा".


  जयाने हम्म करत उत्तर दिले .


   कुठून आले कुठे चालले असे विचारत त्यांच्या गप्पा चालू होत्या . ती बाई तिकडच्या भागाबद्दल ची माहिती सांगत होती . त्यांचे बोलणे चालू असताना निखिल चा मुलगा ही जागा झाला .


      ताई मी तुमच्या मुलाला घेऊ का त्याला थोडं खेळवू का असे तिने विचारले .जया ने पण हो म्हटले .


   ती बाई त्यांच्या मुलाला जवळ घेऊन खेळवत होती त्याच्याशी बोबड्या शब्दात बोलत होती . तो मुलगा पण तिच्याकडे बघत हुंकारे देत होता .


   किती गोड हसतो म्हणत ती त्याचे लाड करत होती.


 निखिल गाडी चालविण्यात मग्न होता. पाऊस थांबण्याची वाट बघत होता .


   गाडी चालवताना झोप येऊ नये म्हणून ते दोघे बोलत होते .


    बाहेर पावसाचा धो धो आवाज येत होता . अधून मधून विजांचा कडकडाट ही होत होता .


   गाडी चालविताना अचानक निखिल ची नजर समोर लावलेल्या आरशाकडे गेली तर त्याला फक्त त्याचा मुलगाच दिसला .परत त्याने मागे वळून बघितले तर ती बाई मुलासोबत खेळत होती .


     आरशात मुलगा एकटाच का दिसतो . त्याने कपडा घेऊन आरसा पुसला व थोडा खाली करत त्यात बघत होता . पण त्या आरशात ती बाई दिसतच नव्हती .


      

      त्याच्या मनात थोडी भीती निर्माण झाली. तो मागे बघायचा व आरशात बघायचा असे दोन तीन वेळा केले पण ती आरशात दिसत नाही हे पाहून तो जास्तच घाबरला .


    त्या बाई जवळ त्याचा मुलगा होता म्हणून तो तिला काहीच बोलू शकत नव्हता . जया घाबरेल म्हणून तिलाही तो काही बोलला नाही . 


      मध्यरात्र झाल्यामुळे रस्त्यावर येणाऱ्या गाड्या फारच कमी झाल्या .


     बाहेर खुप पाऊस चालू असल्यामुळे व जंगली विभाग असल्यामुळे तो गाडीही थांबवू शकत नव्हता .


  निखिलच्या जीवाची खुप घालमेल होत होती .


     खुप लांब येऊन सुद्धा कोणतेच गाव रस्त्यात लागले नाही . 


    निखिल आता जास्तच घाबरला होता . त्याने घाबरून परत आरश्यात बघितले तर त्याला त्याचा मुलगा हवेत तरंगताना दिसला . त्याच्या छातीत धडकन झाले लगेच त्याने गाडीचा ब्रेक दाबला तसे त्याचे डोके जोरात स्टेरिंगवर आदळले .


    जया चे डोके ही समोर आदळले व मुलगा पडल्याचा आवाज त्याच्या कानी आला .


    त्याच्या डोक्याला मार लागल्या मुळे त्याला जागचे हलताही येत नव्हते . त्याने तिच्याकडे बघितले ती गाडीतून उतरून त्याच्याकडे बघत हसत होती .


      तिच्या चेहऱ्यात त्याला तो चेहरा दिसताच तो बेहोश झाला .…


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller