Surekha Nandardhane

Others

3  

Surekha Nandardhane

Others

खेळ सावल्यांचा (भाग ४ )

खेळ सावल्यांचा (भाग ४ )

3 mins
148


     मागच्या भागात आपण बघितले सुयोग ला झोपेत कोणी स्पर्श करत आहे . त्याच्या केसातून त्याच्या चेहऱ्यावरून कोणीतरी हात फिरवत आहे .

 जेव्हा तो डोळे उघडून बघतो तेव्हा समोर तिला पाहून घाबरतो .


  

    " तू . तू इथे काय करते ." असे बोलत सुयोग ने तिला बाजुला केले पण ती त्याच्या पायथ्याशी येऊन बसली हे बघताच सुयोग फारच घाबरला व तिला हात जोडून जाण्याची विनवणी करू लागला .


 ती त्याच्याकडे बघत हसली व निघून गेली .


   सुयोग ने एक नजर वेदिकाकडे टाकली तर ती गाढ झोपेत होती . त्याने अनामिकाच्या रूममध्ये पण खिडकीतून डोकावून बघितले ती पण झोपलेली होती .

दोघींना झोपलेले बघून सुयोग ने सुटकेचा श्वास सोडला .

बरं झाले वेदिका झोपलेली आहे तिने जर आपल्याला बघितले असते तर काय झाले असते . या भीतीने तो खुप गोंधळून गेला .


    सकाळी वेदिका लवकर उठली काम आवरत सुयोग चा टिफिन तयार केला . 


  सुयोग . ये उठ आठ वाजले . तुला ऑफिसला जायला वेळ होईल म्हणत ती त्याला उठवू लागली .


      आठ वाजले ऐकताच तो उठून बसला . रात्रीला आपल्या सोबत घडलेली घटना त्याला दिसू लागली . त्याच्या चेहऱ्यावर एक भीतीचे सावट दिसत होते .पण त्याने वेदिकाला कळू न देता तिला एक स्माईल देत आंघोळीला निघून गेला .


   तयार होऊन जेव्हा तो ऑफिसला जायला निघाला तेव्हा त्याने वेदिका ला विचारले .

    

     ' अनामिका अजून उठली नाही का '?


       अनोळखी जागेमुळे तिला कदाचित रात्री झोप लागली नसेल म्हणून ती आता गाढ झोपलेली आहे .


   बरं ठीक आहे म्हणत तो कामावर निघुन गेला .


      घड्याळाकडे बघत अनामिका ताडकन उठून बसली . अहो ताई नऊ वाजले मला आवाज तर द्यायचा ना 

 अंग लई कणकण करत आहे त्यामुळे रात्री उशिरा झोप लागली . म्हणून जागचं नाही आली . अनामिका कण्हतचं बोलली .


    अग मी तुला मुद्दामच उठवले नाही वाटलं झोपू द्यावं थोडा वेळ . 

    काय ग तूला बरं वाटत नाही का असे म्हणत वेदिका तिच्या जवळ गेली अंगाला हात लावून बघितला तर तिला चांगलाच ताप होता .


   ती उठून फ्रेश झाली व स्वतःची साडी नेसली .बरं ताई निघते मी आता आणि हो पुन्हा तुमचे खुप खुप आभार .


  " ये तू कुठे निघालीस .तुझं अंग इतकं तापाने फणफनले  

आणि तू निघाली . तुला बरं वाटेपर्यंत अजिबात कुठे जायचं नाही ."


  अहो ताई मी तुम्हाला एकच रात्रीचा आसरा मागितला होता . आता तुम्ही मला जाऊ द्या .


    तू मला ताई म्हणते ना मग माझं ऐकणार नाही का .

 तुला बरं वाटलं की मग तू जा मी तुला थांबवणार नाही .


   वेदिकाने तिला तापाची गोळी आणून दिली व आराम करायला सांगितले .


  

       इकडे सुयोग खुप टेन्शनमध्ये होता . तो सकाळपासून अपसेट होता त्याला ऑफिसमधल्या काही लोकांनी विचारले पण . काही नाही म्हणून तो त्याला टाळू लागला .


    त्याच्या चेहऱ्यावर कसला तरी तणाव दडपण दिसत होते .न राहवून त्याचा मित्र विकास परत त्याच्याकडे आला .


       सुयोग . असा दोनदा आवाज दिला . का रे काय झालं तुला तू इतका अपसेट का आहे घरी काही झाले का 

 वेदिका ठीक आहे ना, असे प्रश्न त्याने सुयोग ला केले .

  

    काही नाही रे रात्री झोप झाली नाही त्यामुळे थोडं डोकं दुखतंय बाकी काही नाही .


   अरे मग घरी जाऊन आराम कर ना .


    हम्म


    त्याला अनामिका चा तो सुंदर चेहरा डोळ्यासमोर दिसत होता .जणू तो तिच्या मोहातच पडला . व दुसरीकडे रात्रीला घडलेल्या घटनेने तो चिंतेत पडला होता .


    ते स्वप्न होते की मलाच भास झाला होता .


   वेदिका घरी एकटीच असते तिला याबद्दल सांगायला हवं की नको ? असा सारखा विचार त्याच्या मनात यायचा .


   कामावर त्याचं अजिबात लक्ष लागत नव्हते . त्याला वेदीकाची काळजी वाटू लागली .


   त्याने ऑफिसमधून सुट्टी घेऊन घरी गेला व दार वाजविणारचं तितक्यात ……

(क्रमशः)


Rate this content
Log in