क्षण
क्षण
1 min
238
असती क्षण असेही
विसरता येत नाही
असती क्षण असेही
साठविता येत नाही ||१||
असती क्षण असेही
हसविता येत नाही
असती क्षण असेही
हसणच जात नाही ||२||
असती क्षण असेही
आठवावे न वाटती
असती क्षण असेही
अश्रूंना न आवरती ||३||
असती क्षण असेही
आठवाया येत नाही
असती क्षण असेही
निभावता येत नाही ||४||
असती क्षण असेही
आयुष्य मावत नाही
असती क्षण असेही
आयुष्य राहात नाही ||५||