VINAYAK PATIL

Abstract Inspirational

3.8  

VINAYAK PATIL

Abstract Inspirational

पर्यावरण

पर्यावरण

3 mins
222


पर्यावरण म्हणजे – आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व गोष्टी म्हणजेच झाडे, प्राणी, पशु – पक्षी, डोंगर, नद्या, वायू, भूमी ह्या सर्व म्हणजे ‘पर्यावरण’ होय. या सृष्टीत आपण असे मानतो की पृथ्वी हा एकमेव असा ग्रह आहे जो सर्व गुण संपन्न आहे कारण हा पर्यावरणाने आणि मानवी जीवनाने संपन्न आहे. पर्यावरणात खूप गोष्टींचा समावेश आहे जसे झाडे झुडपे, पर्वत, डोंगर, नदी, समुद्र, प्राणी, पक्षी, मानव, जल, वायू, अग्नी आणि इतर अनेक काही.


पृथ्वीवर सर्वात जास्त बुद्धिमान असलेला प्राणी म्हणजे मानव आहे त्यामुळे हे आपले आद्य कर्तव्य आहे की आपण आपले पर्यावरण सुंदर बनवले पाहिजे. पर्यावरण जीव जीवांना प्रगती करण्यास मदत करतो आणि मानवांना देखील खूप मदत करतो त्यामुळे मानवाचे देखील महत्त्वाचे कार्य आहे की पर्यावरणाला सुरक्षित ठेवायला हवे.


मानवाच्या सुखी आणि आनंदी जीवनासाठी सभोवतालचे वातावरण, पर्यावरण सुंदर आणि स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. आणि मानवी जीवनात पर्यावरणाची गोष्ट केली तर त्याचा मानवी जीवनात खूप मोलाचा वाटा आहे. पर्यावरण आहे महणून आपण आहोत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

आजकाल हे आपण कायम ऐकत असतो की जर आपण पर्यावरणाचा समतोल नाही ठेवला तर आपल्याला पुढे भारी नुकसान सोसावे लागू शकते. का झाले पर्यावरण दूषित तर वाढत्या प्रदूषणाने आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर जास्त केल्यामुळे. तंत्रज्ञानाच्या युगात मानव खूप पुढे गेला आहे परंतु पुढे जातांना तो मात्र हे विसरला की आपल्या काही चुकींमुळे निसर्गाला हानी होऊ शकते ज्याने नंतर जीव सृष्टीला त्रास होईल.


जगात सर्वात जास्त प्रदूषण हे वाहनांच्या मधून निघणारा धुरमुळे होतो. ह्या प्रदूषणाला वायू प्रदूषण असे म्हटले जाते. कारखाना मधून निघणारा धूर आणि सांडपाणी मधून सुद्धा प्रदूषण होते ज्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढतच जात आहे. त्याचबरोबर पाणी दूषित करणे जसे नदीत कपडे भांडी धूने, नदी समुद्रात कचरा करणे. तर ह्या गोष्टी आपण रोखायला हव्या ज्याने पर्यावरण सुरक्षित राहील. गाड्यांचा धूर, कारखान्याचा धूर आणि सांडपाणी, मोठा प्रमाणात आवाज अश्या अजून काही गोष्टींमुळे वायू प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदुषण अधिक प्रमाणात वाढून पर्यावरणाला हानी पोचवतात.


पर्यावरण टिकवण्यासाठी झाडे खूप महत्वाची आहेत आणि आजकाल मनुष्य झाडांना नष्ट करत आहेत ज्यामुळे निसर्गाला मोठा धक्का बसला आहे. जर आपल्याला पर्यावरण टिकवायचे असेल तर झाडे नष्ट न करणे आणि झाडे लावणे आत्मसात करायला हवे. निसर्गातील विविध सुंदर गोष्टींमधून झाडे हे एक निसर्गाची सुंदर देणं आहे जिला आपण मनापासून जपले पाहिजे. माणसांना जगण्यासाठी झाडांची गरज असते कारण झाडांपासून आपल्याला ऑक्सिजन प्राप्त होते ज्यामुळे आपण जिवंत राहू शकतो.


नुसती झाडे लावून काही होत नाही तर त्यांना जगवणे देखील महत्वाचे आहे. झाडे झुडपे निसर्गाची शान आहे ज्याने निसर्गाला सौदर्य प्राप्त होते. मानवाने नवीन वस्तूचा शोध लावण्याआधी हे लक्षात घ्यायला हवे की याच्यामुळे पर्यावरणाला काही हानी तर नाही होत आहे ना. आणि जर होत असेल तर ते तिथेच थांबवायला हवे कारण जर ही सृष्टी राहील तेव्हाच ती वस्तू आपल्या कामात येईल नाहीतर आपल्याला बघायला देखील मिळणार नाही.


अजून एक मुख्य मुद्दा म्हणजे मनुष्य सध्या पर्यावरणाच्या विरूद्ध जात आहे. जसे पर्यावरणाने मानवाला खाण्यासाठी खूप काही नैसर्गिक गोष्टी दिल्या आहेत जे फळांच्या रुपात आपल्याला मिळतात. परंतु मनुष्य मांसाहारी होऊन निसर्गातील जीवांना मारून त्यांचे मास खात आहेत. त्याच्या व्यतिरिक्त लोकं कृत्रिम पदार्थ खात आहेत जे एका निर्जीव स्वरूपात येतात. ह्या गोष्टींनी पर्यावरणाला, प्राण्यांना आणि मानवांना धोका निर्माण झाला आहे. प्राण्यांची शिकार करून त्यांना मृत्यू देणे हे मनुष्याच्या हातात नाही आहे परंतु तरीही हे मनुष्याला समजत नाही. आजकाल तुम्ही ऐकलं असेल की काही प्राणी लुप्त होत आहेत आणि त्यांची पिढी देखील नष्ट झाली आहे तर त्या मानव मुळेच झाले आहे.


वाढती लोकसंख्या देखील पर्यावरणाला दूषित करते कारण जेवढी संख्या तेवढे जास्त प्रमाणात प्रदूषण होते. लोकं कुठे फिरायला गेले की लगेच कचरा करतात आणि प्लास्टिकचे वस्तू तर जागोजागी फेकलेली दिसतात ज्याने भूमी प्रदूषण निर्माण होते. नदी किनारी आणि समुद्र किनारी फिरायला गेल्यावर पर्यटक पाण्यात कचरा टाकतात आणि प्लास्टिकचे वस्तू, पिशव्या, बाटल्या अती फेकलेल्या असतात ज्याने जल प्रदूषण होते. तर हे रोखण्यासाठी आपण आपला कचरा आपल्या बॅगेत भरुन एका ठिकाणी कचरा कुंडीत टाकायला हवा ज्याने प्रदूषण नियंत्रित होईल. 


निष्कर्ष : पर्यावरण हा आपला एक मित्र आहे ज्याची काळजी आपण प्रदूषण मुक्त करून घ्यायला हवी. निसर्गाने पृथ्वीवर मनुष्याला सर्वांत हुशार आणि बुद्धिमान जीव बनवला आहे परंतु तो त्या बुद्धीचा दुरुपयोग करू लागला आहे असे दिसत आहे तर जे प्रयोग पर्यावरणाच्या विरूद्ध आहेत ते रोखून जे प्रयोग पर्यावरणासाठी योग्य आहेत तेच करायला हवे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract