Amruta Shukla-Dohole

Inspirational

4  

Amruta Shukla-Dohole

Inspirational

मुर्खपणा

मुर्खपणा

6 mins
318


माझ्या मुलीचे लग्न होते आणि मी काही दिवस सुट्टी घेऊन लग्नाच्या तयारीत व्यस्त होतो. त्या दिवशी प्रवासातून घरी आलो तर पत्नी ने माझ्या हाती एक पाकीट दिलं. पाकीट अनोळखी होतं पण पाठविणाऱ्याचे नाव पाहून मला आश्चर्यमिश्रित उत्सुकता लागली. ‘अमर विश्वास’, एक असे नाव, ज्याला भेटून काही वर्षे उलटली होती. मी पाकीट उघडले तर त्यात एक लाख डाॅलर चा चेक आणि एक पत्र होतं. इतकी मोठी रक्कम, ती ही माझ्या नावावर? मी घाईत पत्र उघडले आणि एका दमात पुर्ण वाचून काढले. पत्र एखाद्या परी कथेसारखं मला अचंभित करुन गेले. लिहिले होते,


'आदरणीय सर, मी एक छोटीशी भेंट आपल्याला देत आहे. आपल्या उपकारांचे ओझे मी कधी उतारू शकेल असे मला वाटत नाही. ही भेट मी माझ्या न बघीतलेल्या बहिणीसाठी आहे. घरी सर्वांना माझा नमस्कार.

आपला,

अमर.


माझ्या डोळ्यांसमोर खुप वर्षांपुर्वीच्या घटना एकाद्या चित्रपटासारख्या सरकू लागल्या. एक दिवस मी गावात फिरत एका पुस्तकांच्या दुकानात आपली आवडती मासिकं चाळत होतो. माझे लक्ष बाहेर पुस्तकांच्या एका छोट्या ढिगाऱ्याजवळ उभ्या असलेल्या मुलावर पडली. तो पुस्तकांच्या दुकानात घुसणाऱ्या प्रत्त्येक व्यक्तिला काही विनंती करत होता व काही प्रतिसाद न मिळाल्यावर परत आपल्या जागी जाऊन उभा रहात होता.


मी बराच वेळ मुकाट्याने हे दृश्य बघत राहिलो. पहिल्या नजरेत हे फुटपाथवर दुकान लावणाऱ्या विक्रेत्यांसारखे वाटत होते, परंतु त्या मुलाच्या चेहऱ्यावरची निराशा सामान्य वाटत नव्हती. प्रत्त्येक वेळी तो नव्याने प्रयत्न करायचा, परत तीच निराशा. बऱ्याच वेळ त्याला बघीतल्यावर मी आपली उत्सुकता थांबवू शकलो नाही आणि त्या मुलाजवळ जाऊन उभा राहिलो.


तो मुलगा काही साधी विज्ञानाची पुस्तकें विकत होता. मला बघून त्याच्यात परत आशा संचारली आणि उत्साहाने त्याने मला पुस्तकं दाखवायला सुरुवात केली. मी त्या मुलाला लक्षपूर्वक बघीतले. स्वच्छ, चेहऱ्यावर आत्मविश्वास पण कपडे अगदीच साधारण. थंडीचे दिवस होते व तो केवळ एक हलकेसे स्वेटर घातलेला होता. पुस्तकं माझ्या काहीच कामाची नव्हती तरी मी जसे काही सम्मोहीत होऊन त्याला विचारले,


‘बेटा, ही सारी पुस्तकं केवढ्याची आहेत?’


‘तुम्ही किती देऊ शकता, सर?’


‘अरे, तु काही तरी किंमत ठरवली असशीलच ना.’


‘आपण जे द्याल ते,’ मुलगा थोडा निराश होऊन बोलला.


तुला किती पाहिजेत?’ तो मुलगा समजून चुकला की मला काही पुस्तकं घ्यायची नाहीत व मी त्याच्यासोबत टाईम पास करीत आहे.


पाच हजार रुपये,’ तो मुलगा वाकडं तोंड करून बोलला.


‘या पुस्तकांचे कोणीही पाचशे पण दिले तरी जास्त होतील,’ मला त्याला दुःखी करायचे नव्हते तरी माझ्या तोंडून सहज निघून गेले.


आता त्या मुलाचा चेहरा पहाण्यासारखा झाला होता. जशी की कुणी खूप सारी उदासी त्याच्या चेहऱ्यावर ओतून दिली आहे. मला माझ्या बोलण्याचा खुप पश्र्चाताप झाला. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला व त्याला धीर देत विचारले, ‘बघ बाळ, मला तु पुस्तके विकणारा वाटत नाहीस, काय कारण आहे. स्पष्ट सांग की तुझी काय गरज आहे?’


त्या मुलाच्या मनाचा धीर सुटला. बहुतेक बऱ्याच वेळचा नैराश्याचा चढ-उतार आता त्याच्या सहनशिलतेच्या पलीकडे गेला होता.


‘सर, माझी बारावी झालेली आहे. माझे वडील एका छोट्या हाॅटेलात काम करतात. माझी वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झालेली आहे. आता मला प्रवेश घेण्यासाठी पैशाची गरज आहे. माझे वडील काही पैसे देण्यास तयार आहेत, बाकी अजून पैशांची व्यवस्था करणे त्यांना शक्य नाही.' मुलाने एका दमात इंग्रजीत हे सर्व सांगितले.


तुझे नाव काय आहे ?’ मी मंत्रमुग्ध होऊन विचारले.


‘अमर विश्वास.’


तु विश्वास आहेस आणि मन छोटं करतोस? किती पैसे पाहिजेत?’


‘पाच हजार,’ या वेळी त्याच्या स्वरात करुणा होती.


‘जर मी हे पैसे तुला दिलेत तर परत करू शकशील का? या पुस्तकाची तर इतकी किंमत नाही,’ या वेळी मी थोडं हसून विचारले.


‘सर, तुम्हीच तर म्हणालात की मी विश्वास आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास करू शकता. मी गेल्या चार दिवसांपासून येथे येत आहे, तुम्ही पहिल्या व्यक्ती आहात ज्याने एवढे तरी विचारले. जर पैशांची व्यवस्था होऊ नाही शकली तर मी ही आपल्याला एखाद्या हाॅटेलात कप-बशा धूतांना दिसेल,’ त्याच्या स्वरात आपले भविष्य बुडण्याची शंका होती.


त्याच्या स्वरात असे काय होते माहीत नाही, जे माझ्या अंतःकरणात त्याला मदत करण्याची भावना उपजू लागली. मेंदू त्याला एक धोकेबाज पेक्षा जास्त काही मानण्यास तयार नव्हता, परंतू हृदय हा विचार स्विकारत नव्हते. शेवटी हृदय जिंकले. मी पर्स मधून पाच हजार रूपये काढले, ज्यांना मी शेयर मार्केट मध्ये लावण्याचा विचार करीत होतो, त्याच्या हातात दिले. तसे एवढे रूपये माझ्यासाठी ही महत्त्वाचे होते, परंतू न जाने कोणत्या मोहाने माझ्याकडून ते पैसे काढून घेतले.


‘बघ बाळा, तुझ्या बोलण्यात, तुझ्या इच्छाशक्ती मध्ये किती दम आहे हे मला माहीत नाही, परंतू माझे मन म्हणते की तुला मदत केली पाहिजे, त्यामुळे करतो आहे. तुझ्यापेक्षा चार-पाच वर्षांनी लहान मुलगी मिनी आहे मला. तिला काही खेळणं घेऊन दिले असे समजेल,’ मी अमर कडे पैसे देत म्हणालो.


अमर स्तब्ध होता. त्याला बहुतेक विश्वास बसत नव्हता. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने माझ्या पायांना स्पर्श केला तर त्याच्या डोळ्यातून निघालेल्या दोन थेंबांनी पायांचे चुंबन घेतले.


‘ही पुस्तकं मी तुमच्या गाडीत ठेवून देवू ?’


काही गरज नाही. यांना तु तुझ्या जवळच ठेव. हे माझे कार्ड आहे, केव्हाही कधी गरज पडली तर मला सांग.’


तो पुतळ्यासारखा उभा होता. मी त्याच्या खांद्यावर थोपटले, कार चालू करून निघालो.


ती घटना माझ्या डोळ्यांसमोर फिरत होती आणि मी खेळलेल्या जुगारा विषयी विचार करत होतो, ज्यात अनिश्चितताच ज्यास्त होती. कोनी दूसरा ऐकेल तर मला एक "भावुक मूर्ख व्यक्ती'' पेक्षा जास्त समजला नसता. म्हणून ही घटना कुणाला न सांगण्याचा मी निर्णय घेतला. दिवस पुढे सरकत गेले. अमर ने आपल्या मेडिकल मधील प्रवेशाची माहीती पत्र पाठवून दिली होतीच. मला आपल्या मुर्खपणात माणूसकी दिसली. एक गुप्त शक्ति किंवा माझ्यात बसलेल्या माणसाने मला प्रेरित केले की मी हजार दोन हजार रुपये त्याच्या पत्त्यावर पुन्हा पाठवून देऊ. भावना जिंकल्या आणि मी पुन्हा आपला मुर्खपणा गिरवला. दिवस पुढे सरकत गेले. त्याचे संक्षिप्त पत्र यायचे ज्यात चार ओळी लिहिलेल्या असायच्या. दोन माझ्यासाठी, एक आपल्या अभ्यासाविषयी, आणि एक मिनी साठी, जिला तो आपली बहीन म्हणत होता. मी आपली मुर्खता गिरवायचो व विसरून जायचो. मी कधी त्याच्याकडे जाऊन आपल्या पैशांचा विनियोग बरोबर होतोय का हे बघण्याचा प्रयत्न ही केला नाही, तो ही कधी माझ्या घरी आला नाही.


काही वर्षांपर्यंत हा दिनक्रम चालू राहिला. एक दिवस त्याचे पत्र आले की तो उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलिया ला जात आहे. शिष्यवृत्तीं विषयी ही लिहिले होते व एक ओळ मिनी साठी पण लिहायला तो विसरला नव्हता. मला आपल्या माझ्या मुर्खपणा वर दुसऱ्यांदा गर्व झाला, त्या पत्राचा खरेपणा जाणून न घेता. दिवस पंख लागल्यासारखे उडत राहीले. अमर नी आपल्या लग्नाचे निमंत्रण पाठविले. तो बहुतेक ऑस्ट्रेलिया मध्येच स्थायीक होण्याच्या विचारात होता. मिनीचे ही शिक्षण पुर्ण झाले होते. एका प्रतिष्ठित परिवारात तिचे लग्न ठरले. आता मला मिनीचे लग्न मुलाच्या घराण्यास शोभेल असे करायचे होते. सरकारी नोकरीतला का एक मोठा अधिकारी कागदी सिंहच असतो. लग्नाच्या तयारी साठी खुपशा पैशांची व्यवस्था… डोक्यातील विचार… आणि आता तो चेक? मी परत आपल्या दुनियेत व वापस आलो. मनात परत अमरची आठवण काढली आणि मिनीच्या लग्नाची पत्रिका अमरला ही पाठवून दिली. लग्नाची गडबड चालली होती. मी आणि माझी पत्नी तयारीत व्यस्त होतो आणि मिनी आपल्या मैत्रीणींमध्ये. एक मोठी गाडी दरवाज्यात येऊन थांबली. एका प्रतिष्ठित दिसणाऱ्या व्यक्तीसाठी ड्रायवरने गाड़ीचे दार उघडले, तर त्या व्यक्तीच्या सोबत लहान मुलाला कडेवर घेऊन त्याची पत्नीही गाड़ीतून उतरली. मी आपल्या दरवाजावर जाऊन उभा राहिलो तर त्या व्यक्तीला आधी कुठेतरी बघीतल्या सारखे वाटले. त्याने येऊन माझी पत्नी व माझ्या पाया पडला.


‘‘सर, मी अमर…’’ तो मोठ्या श्रद्धेने बोलला.


माझी पत्नी आश्र्चर्य चकित होऊन उभी होती. मी मोठ्या अभिमानाने त्याला आलिंगन दिले. त्याचा मुलगा माझ्या पत्नीच्या कडेवर आरामात बसला होता. मिनी अजूनही संशयाने बघत होती. अमर खुप भेटवस्तू सोबत घेऊन आला होता. मिनीला त्याने मोठ्या प्रेमाने आलिंगन दिले. मिनीला भाऊ मिळाल्याने ती खुप खुश होती. अमर लग्नात मोठ्या भावाच्या प्रत्त्येक परंपरा निभावण्यात व्यस्त होता. त्याने माझ्यावर कोणतीही मोठी जबाबदारी येऊ दिली नाही की मला एकही पैसा खर्च करु दिला नाही. त्याचे भारत प्रवासाचे दिवस पंख लागल्या सारखे उडून गेले. या वेळी जेव्हा अमर ऑस्ट्रेलिया ला परत चालला होता तेव्हा विमानतळावर त्याला निरोप देताना फक्त माझेच नाही तर माझी पत्नी, मिनी सर्वांचे डोळे पाणावले होते. विमान ऊंचच ऊंच आकाशाला स्पर्श करण्यासाठी निघाले आणि त्यासोबतच माझा विश्वासही आकाशाला स्पर्श करीत होता. मला आपल्या मुर्खपणावर परत एकदा गर्व झाला आणि विचार करीत होतो की या विनाशी सृष्टी ला चालवणारा कोणी भगवान नाहीं, आमचा विश्वासच आहे.... आत्ता आपल्या कडे कितीका पैसे असेनात पण आपल्या अडचणीच्या वेळी आपल्याला हात दिला.. साथ दिली .. सावरले... ते विसरु नका... पैसे परत देता येतीलही पण ती वेळ परत देता येणार नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational