Ashvini Duragkar

Tragedy

4.5  

Ashvini Duragkar

Tragedy

नवा गडी... नवा राज्य भाग - ३

नवा गडी... नवा राज्य भाग - ३

7 mins
260


तेवढ्यात मल्हार तिथे आला...

बऱ्याच गोष्टी त्याच्या कानावर पडल्या होत्या. तेजु रागाने लाल झाली होती. तो मात्र स्वतःला कुल ठेवायचा प्रयत्न करित होता. तिने त्याच्याकडे खूप रागात बघीतले.

“How dare you Malhar ?”

“What happened Teju.... ohhh sorry ... ma’am”.

“How dare you change everything Without my permission.”

 “Listen to me Teju”.

“Shut up Malhar .”

“अग ऐक तर.”

“Get out now”

  मल्हार रागा रागात कॅबिनमधन बाहेर निघुन गेला. त्याने सरळ गाडी काढली आणि घरी गेला. तिकडे तेजु अजुनही रागातच होती. अक्षरशा: तिने तिच्या private cabin च्या वस्तु टेबलवरन धडाधड फेकल्या. आॅफिसमध्ये सगळे चिडीचुप होते. ती विणाकारण नुसतीच कॅबिनमध्ये एकतार बघत बसली होती. दिवसभर कोणाशीच बोलली नाही. लंच पण केला नाही. 

     तिकडे मल्हार तावातावात घरी आला. आल्या आल्या गाडीची चाबी झरकन खाली फेकली. 

“अरे देवा काय झाल. एवढा संताप कसला?”

“आज त्या तेजुने हदच केली आई.”

“अरे सांग तरी?”

   ऑफिसमध्ये घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती त्याने आईला सांगीतीली. आई खूप चिडली.

“तिची हिम्मत कशी झाली तुझा अपमान करायची”.

“माज आला आहे तिला तिच्या पदाचा - पैश्यांचा.”

“आज बघ तू जिरवतेच तिची”.

   

     सगळे ऑफिसमधन गेल्यानंतर ती लेट नाईट १० वाजता घरी आली. 

  घरच दार लागलेल होत. बाहेरचे दिवे बंद होते. तिने बेल वाजवली पण कोणी दार उघडेना. तिने मल्हारला खूप फोन केलेत पण तो ही उचलेना. 

  आत बसुन सगळे तिची मजा बघत होते आणि ती कपकपत्या थंडीत घराबाहेर दार उघडायच्या प्रतीक्षेत होती. ऐवढ्या रात्री ती घराबाहेर सतत सतत फोन करत उभी होती पण कोणीच फोन उचलेना.

सासु-सासरे सगळयांना फोन करुन झाल होत पण प्रतिसाद शुन्यच.      

   ती अगदीच घाबरली काही झाल तर नाही ना अस कस कोणीच फोन उचलेना?, कोणीच दार उघडेना?, दार आतुन लावलेल होत म्हणजे घरात सगळीच मंडळी आहे पण मग काय झाल असाव?.घाबरुन चिंतेस्तव तिने बाबांना फोन केला. ते लागलीच धावत पळत आले. बाबा आल्या आल्या ती त्यांना बिलगली. सरसर डोळयांना धारा लागल्या. पहिल्यांदाच ती एवढी गयावया होवुन रडत होती. तिला एवढ दु:खी बघुन त्यांच काळीज हादरल. ज्याची भिती त्यांना सुरवाती पासन होती तेच झाल होत. कधीही न रडणारी न खचणारी तेजु

ढसाढसा रडत होती. 

   आत बसलेल्या मल्हार व सासु-सासऱ्यांना तिचे बाबा आल्याची भनक लागली ते आता दार ठोठावणार तेवढ्यात त्यांनी झोपेच सोंग घेतल आणि हळुच येवुन मल्हारनी दार उघडल. तो अशी अॅक्टिंग करित होता जणू खूप वेळचा झोपलेला होता. 


  दार उघडताच तेजुने झरकण त्याला मिठीत घेतल आणि ढसाढसा रडु लागली. 

“तू ठीक तर आहे ना?”

“अग एवढ काय झालय रडायला?”

“अरे मी किती वेळची दार ठोठावते आहे. कोणीच उघडेना. फोनही केले पण त्याला हि प्रतिसाद नाही. मी जाम घाबरली होती रे. तू ठीक तर आहेस ना?”

“अग माझा डोळा लागुन गेला नेमका त्यात मोबाईल ही सायलेंट मोडवर होता.... so sorry तुला त्रास झाला मला वाटल तू जरा रागात आहे तर जाशील बाबांकडे.”

“मी का म्हणून जाव बाबांकडे.”

“बाबा मला वाटल हि एवढी रागात आहे कदाचीत तिकडेच येईल”.

  तेजुच्या बाबांना मात्र खूप राग आला होता. आपल्या मुलीला अस प्रेमापोटी विवश बघुन खचले. मुलीला घरात सोडुन ते स्वघरी परतले. पण त्यांच्या मनात घुसमळ कायम सुरु होती. 

  ईकड़े मल्हारच आणि त्याच्या घरच्यांच काय शिजलय तेजुला त्याची तिळभर ही कल्पना नव्हती. 

  रात्रभर ती मल्हारच्या कुशीत अशी शिरली होती ज़शी लहान बाळ आपल्या रुसलेल्या आईच्या कुशीत हरवत पण मल्हार मात्र निवांत झोपी गेला होता. झालेल्या घटनेबद्दल तिला खूप वाईट वाटत होत आणि मल्हार मात्र मनातल्यामनात गुज करित होता त्याच षड्यंत्र मार्गी लागल होत. तेजु त्याच्या प्रेमाच्या जाळयात कळकळुन अडकली होती.

   दुसऱ्या दिवशी ती मुद्दामच ऑफिसला उशीरा गेली. मल्हार मात्र आपल्या वेळेवरच गेला. तिने आधीच फोन करून मॅनेजरला कळवल होत काल झालेली घटना विसरुन जावी आणि नव्याने मल्हारने केलेल्या बदलाचे स्वागत करावे. 

      तो गेल्या गेल्या सगळच नाॅर्मल होत. मॅनेजरनी त्याला आत सी॰ई॰ओ॰ च्या कॅबिनमध्ये त्याने हलवलेल्या डेस्कवर बसण्याची विनंती केली. मल्हारला जणु होणाऱ्या प्रत्येक पावलाची पूर्वकल्पना होती त्याने आखलेल्या षड्यंत्राप्रमाणेच सगळ घडत होत. त्याचा दुसराही डाव यशस्वी झाला होता. सी॰ई॰ओ॰ च्या कॅबिनमध्ये त्याची एंट्री झाली होती. 

   तिकडे मल्हारने शिकवल्याप्रमाणे सासुबाईही आपले पैतरे यशस्वी करण्याचा डाव रचीत होत्या. काही ना काही कारण काढुन तिच्याकडन मोठी रक्कम ऐठायच्या तर कधी लग्ना समारंभाचे बहाने करून लाडी गोडीने तिचे दागिने आपल्या ताब्यात घेत होत्या. मुद्दाम त्या तिला घर कामात व ईतर फालतु कामात अडकवुन ठेवायच्या जेणे करून तिला ऑफिसमध्ये जायला उशिर होईल. त्याच संधीचा पूरेपुर फायदा मल्हारला व्हायचा. त्याने पुर्ण ऑफिस आपल्या ताब्यात घेवुन घेतल अगदी सगळेच निर्णय तो आपल्या मताने घ्यायचा.

एकदा त्याच्या एका छोट्या चुकीमुळे कम्पनीच करोडोच नुकसान झाल. शेवटी अनुभव तो अनुभव असतो. कोटेशन वर सही करायचा विसरला अन् गेल सगळच पाण्यात. तेजु चे बाबा मल्हारवर जाम चिडले होते. एक मोट्ठ प्रोजेक्ट त्यांच्या हातुन चुटकी सरशी निसटल होत. त्यांनी ताबडतोब तेजुला ऑफिसमध्ये बोलावुन घेतल. बाबांची सगळी बाजु एकुन घेतली आणि मग रागाने फणफणुन ती मल्हारशी बोलायला गेली. त्यांचात खूप वाद झाले. तो नेहमीप्रमाणे ताव खाऊन ऑफिसमधन निघुन गेला. ती ही बसली ऑफिसच्या फ़ाईल आवरत. अर्ध्या रात्री काम आवरुन ज़ेव्हा ती घरी परतली तेव्हा परत तेच सोंग त्यांनी रचल होत. आतुन दार लावुन घेतल. ती आवाज़ देवुन देवुन हैरान. मध्यरात्र झाली होती त्यात थंडी रक्त गारठवणारी. मग कराव तरी काय? सहा महिन्यात हि दुसरी घटना होती. 

   बाबांना तरी कस सांगाव आणि त्यांच्याकडे जाव तरी कस? ते आधीच चिडले होते असल काही कळल तर ते अजुन चिड़तील. शेवटी मन खंबिर करुन ती गाड़ीत जावुन बसली.


“हरवतो सुखाचा चेहरा का पुन्हा...

एकटी मी तुझ्या शोधते का खुणा...

हरवते हातुनी पाहिजे जे मला....

 जिंकुनी हारते खेळ हा जुना....


साजना तुझी याद,

जाळी जीवाला या पुन्हा,

मानत नाही, ये जिया,

बैरी प्रीत मोहे छोड़े ना”


  तिची अवस्था बिकट होती. करोड़ोची मालकीण एका कवड़ीच्या माणसाच्या प्रेमासाठी तळमळत होती. तो येईल अन् तिला कवेत घेवुन घरात घेवुन जाईल ती या प्रतिक्षेत होती पण आक्खी रात्र विसतरली तो मात्र आला नाही. पहाटे दुधवाला आला तेव्हा दार उघडल्या गेल. दुधवाला जाताच त्याच्या मागोमाग तिने घरात प्रवेश घेतला. तिला बघुन सासुबाईंचा प्रतिसाद शून्य होता. ती सरळ रूममध्ये गेली. मल्हार गाढ़ झोपला होता. ती फ़्रेश होवुन त्याच्या शेजारी लेटली. त्याच्याकडे एक ट्क बघत अश्रु गाळीत होती.

  “हा असा कसा ईतका निवांत झोपु शकतो? माझी काहीच काळजी नाही? मी आले - नाही आले याच्याशी काही देणघेणच नाही? कुठे हरवलय ते प्रेम? माझ्या एका आह्ह्ह वर ज्याचा जीव जायचा त्याला आज काहीच फ़रक नाही पडतोय?” शेकडो प्रश्नांची गर्दी हृदयात दाटली होती अन् ती एकटक त्याला न्याहारत होती. तेवढ्यात त्याने चटकण डोळे उघडले आणि शरीरात होत तेवढ बळ लावुन त्याने तिच्या पोटावर लात मारली. ती पुर्ण force ने खाली पडली.जोरात किंचाळली. आयुष्यात पहिल्यांदा कोणी तरी तिच्यावर हात उचलला होता. तिच्या पोटाला जोरदार धक्का बसला होता. तिच्या किंचाळण्याच्या आवाजाने सासु सासरे धावत आले. ती ज़मीनीवर लोळलेली होती. तिचा कंठ अगदीच स्थिरावला होता. डोळयातील अश्रु तडपुन तडपुन खाली कोसळत होते. 

    सासुबाई तिला बघताच मल्हारवर काचकळुन ओरडल्या “ लेका नालायका, हरामss करोडो-अरबोच्या संपत्तिले लाता मारुन रायला. कुss तुया अस्या स्वभावापायी सार वाया गेल आहे. पहिले बी तुन असच केल. चांगल्या चांगल्या पोरी हातातुन सुटल्या अन् आता चांगला ग़ल्ला हाती आला त तुले नखरे सुचुन रायले. पोरीले काही झाल तर मारुन टाकण तिचा बाप मग रायजो जेल मंधी सडत. “


क्रमशः

     प्रेमाला आता वेगळ वळण आलय. पुढ़े काय होईल? 

   तेजुच्या बाबांना घडलेला प्रकार कळल्यास ते काय करतील? 

    तेजुच्या आयुष्यावर या सगळयांचा काय परिणाम होईल...


बघुया लवकरच पुढल्या भागात.तब तक Stay tune... वाचत राहा... आणि हो लेख आवडल्यास लाईक व कमेंट करायला विसरु नका.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy