Rajesh Varhade

Drama

3  

Rajesh Varhade

Drama

पहिली भेट

पहिली भेट

1 min
204


   प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी व्यक्ती किंवा निसर्गाची देण म्हणता येणारी संधी. मात्र त्याच सोनं त्या क्षणात करून घेणे. किंवा नाही त्याला समजेल किंवा नाही. ह्या गोष्टीशी निगडीत ज्याच्या त्याच्या वर्तनाशी आहे. म्हणजेच एखादी स्त्री असू शकते किंवा पुरुष. अशीच माझ्या आयुष्यात एक भाग्यश्री नावाची मुलगी आली. तिची पहिली भेट बँकेमध्ये झाली

 

माझं पुस्तक प्रिंट करताना मशीनमध्ये अडकले आणि मॅनेजरशी बोलायला गेलो. ते पुस्तक माझ्यामागे घेऊन उभी असणारी मुलगी म्हणजेच भाग्यश्री. ती ते घेऊन आली आणि त्या दिवशी माझी 59 हजार येणार असा मेसेज मोबाईलवर आला परंतु जेव्हा खात्यावर जमा झाले तेव्हा 65000 आले. मग हा त्या मुलीच्या हात लागण्याचा भाग्याचा विषय तद्वतच माझा वाढदिवस माझ्या ऑफिसमध्ये झाला. ती बाजूच्या ऑफिसमध्ये आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच तिने माझ्याशी हस्तांदोलन केलं. आणि ती भविष्यात आयुष्यात पहिल्यांदा एखाद्या स्त्रीने माझ्या हातात घेतला आणि म्हणाली बिलेटेड हॅपी बर्थ डे. मी भारावून गेलो वरून म्हणाली मला पार्टी लागेल.


मग तुला पार्टी म्हणजे दारू मटण...

अंहं... हे आपल्याला चालत नाही.

मग ती म्हणाली मी गंमत केली तुम्ही मला नाही दिले तरी चालेल.

म्हटलं नाही आपण नाश्ता करू मस्तपैकी


आणि तेव्हापासूनच मी कविता लेख उत्कृष्ट पद्धतीने लिहू लागलो. त्या दिवसापासून माझं आयुष्य पालटून गेलं आणि ती माझ्या आयुष्यातून निघून गेली. माझी आणि त्या मुलीची आयुष्यातली भेट माझं भाग्य उजळून गेली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama